1) पहिली खतमात्रा खोडवा ठेवल्यानंतर 15 दिवसांच्या आतच पूर्ण करावी. पहारीने बुडख्यांपासून 10 ते 15 सें.मी. अंतरावर 15 ते 20 सें.मी. खोल छिद्र घेऊन सरीच्या एका बाजूला पहिली खतमात्रा द्यावी. दोन छिद्रांमधील अंतर 30 सें.मी. ठेवावे.
2) दुसरी खतमात्रा विरुद्ध बाजूस त्याच पद्धतीने 135 दिवसांनी द्यावी आणि नेहमीप्रमाणे पाणी द्यावे.
1) वरील तक्त्यामधील शिफारस 1 आणि शिफारस 2 यापैकी कोणत्याही एका शिफारशीचा वापर करावा.
2) जमिनीमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेनुसार हेक्टरी झिंक सल्फेट 20 किलो, फेरस सल्फेट 25 किलो, मॅगनिज सल्फेट 10 किलो व बोरॅक्स 5 किलो. याचा वापर करावा.
1. खत मुळांच्या सानिध्यात दिले जाते. त्यामुळे ते पिकास त्वरित उपलब्ध होते.
2. दिलेल्या रासायनिक खतांचा वातावरणाशी प्रत्यक्ष संबंध येत नसल्याने हवेद्वारे खतांचा ऱ्हास फारच कमी प्रमाणात होतो.
3. खत मातीने झाकल्यामुळे वाहून जात नाही. खत तणास न मिळाल्यामुळे तणांचा प्रादुर्भाव फारच कमी दिसून येतो. त्यामुळे खुरपणीवरील खर्चात बचत होते.
4. तणावाटे घेतल्या जाणाऱ्या रासायनिक खतांचे प्रमाण कमी राहते आणि जास्तीत जास्त खत मुख्य पिकास उपयोगी पडते.
5. रासायनिक खतांची उपलब्धता पिकांच्या गरजेनुसार हळूहळू होऊन खतांची कार्यक्षमता वाढते. उसाची वाढ जोमदार होऊन उसाचे भरघोस उत्पादन मिळते.
6. सर्व ठिकाणी सारख्या प्रमाणात खत वापरणे शक्य होते. त्यामुळे सर्वत्र एकसारखे पीक येते आणि ऊस उत्पादनात 10 ते 15 टक्क्यांनी वाढ होते.
1) रासायनिक खतांना पूरक म्हणून जैविक खतांचा वापर केल्यास रायायनिक खतात बचत होते.
2) ऍझोटोबॅक्टर, ऍझोस्पिरीलम, ऍसिटोबॅक्टर आणि स्फुरद विरघळविणारे जीवाणू यांचा प्रत्येकी 1.25 किलो प्रतिहेक्टरी या प्रमाणात एकूण पाच किलो जीवाणू खतांचा वापर करावा.
3) ही जीवाणू खते 25 किलो चांगल्या कुजलेल्या शेणखतात एकत्र करून उसाच्या ओळीच्या बाजूने टाकावीत किंवा पाण्यामध्ये किंवा शेणाच्या स्लरीमध्ये एकत्र करून वापरावीत.
4) जीवाणू खतांचा वापर केल्यास 25 टक्के नत्र आणि स्फुरद खतांची बचत होते. म्हणून शिफारशीत नत्र आणि स्फुरदाती खतमात्रा 25 टक्क्यांनी कमी करावी.
आंतरमशागत -
या पद्धतीमध्ये कोणत्याही प्रकारची आंतरमशागत करण्याची गरज नाही. म्हणजेच जारवा तोडण्याची किंवा बगला फोडून पिकाला भर देण्याची गरज नाही. पाचटाचे आच्छादन असल्यामुळे आणि खते पहारीच्या साहाय्याने दिल्यामुळे तणांचा प्रादुर्भाव फारच कमी प्रमाणात होतो. काही तणे उगवल्यास ती उपटून शेतातच पाचटावर पसरावीत.
पाणी नियोजन -
1) खोडवा व्यवस्थापनासाठी नेहमीच्या पद्धतीने 26 ते 28 पाण्याच्या पाळ्या लागतात; परंतु नवीन तंत्रामध्ये फक्त 13 ते 14 पाण्याच्या पाळ्या असल्या तरी खोडवा उसाचे चांगले उत्पादन मिळते.
2) खोडवा उसासाठी दोन पाण्यांच्या पाळ्यातील अंतर नेहमीच्या पद्धतीपेक्षा दीड पटीने वाढवावे.
3) उन्हाळ्यामध्ये पाण्याचा तुटवडा भासल्यास पारंपरकि पद्धतीमध्ये उसाच्या उत्पादनात फार मोठी घट येते; परंतु नवीन पद्धतीत पाचटाचा अच्छादनासाठी वापर केल्यामुळे 40 ते 45 दिवस पाणी नसले तरी उसाचे पीक चांगले तग धरू शकते.
संपर्क - 02169-265337
(लेखक मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव, ता. फलटण, जि. सातारा येथे कार्यरत आहेत)
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
कोव्हीएसआय - 03102 या जातीचे को 86032 या तुल्य जात...
आडसाली उसाची लागवड 15 जुलै ते 15 ऑगस्ट या कालावधीत...
उसाचे भरघोस उत्पादन घेण्यासाठी उसाला संतुलित खताचा...
दीडशे शेतकऱ्यांकडून मालाचे संकलन दररोज 800 किलो ...