चालू वर्षी महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः मराठवाडा विभागामध्ये कमी पाऊस झाला, त्यामुळे पाण्याची कमतरता जाणवू लागली आहे. कारखाना कार्यक्षेत्रामध्ये नवीन ऊस लागवड फारच कमी प्रमाणात असली तरी तुटणाऱ्या उसाचा खोडवा ठेवावा लागणार आहे. त्यामुळे उपलब्ध मर्यादित पाण्यामध्ये ऊस पिकांची जोपासना करण्यासाठी ठिबक सिंचन फायद्याचे ठरणार आहे.
गळित हंगाम 2015-16 साठी साखर कारखान्यांना कार्यक्षेत्रात लागण व खोडवा उसाची जोपासना अतिशय काळजीपूर्वक करावी लागणार आहे. राज्यामध्ये उसाची लागण आडसाली, पूर्वहंगामी व सुरू हंगामामध्ये केली जाते. या पिकांचा कालावधी अनुक्रमे 18 महिने, 15 महिने आणि 13 महिने असतो. उसामध्ये उगवण, फुटवे येणे, जोमदार वाढ आणि पक्वता या प्रमुख वाढीच्या अवस्था आहेत. उगवण व फुटव्यांची अवस्था ऊस लागणीनंतर हंगामनिहाय 12 ते 16 आठवड्यांपर्यंत असते. उसासाठी ठिबक सिंचन वापरल्यास पिकाच्या वाढीच्या अवस्थेत कोटकोरपणे पाणी देणे शक्य होईल. भूगर्भातील उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर होऊन, त्याचा शेतकऱ्यांना व साखर कारखान्यांना फायदा होईल.
तपशील ---- सरी- वरंबा पद्धत ---- पृष्ठभागावरील ठिबक सिंचन पद्धत ---- पृष्ठभागांतर्गत ठिबक सिंचन पद्धत ---- ठिबक सिंचन वापरल्याचे फायदे
उसासाठी एकूण देण्यात आलेले पाणी (हे. सें.मी.) ---- 240 ते 300 ---- 130 ते 150 ---- 110 ते 120 ---- पाण्यात बचत - 50 टक्के ते 55 टक्के
ऊस उत्पादन (टन/हे.) ---- 100 ते 110 ---- 125 ते 140 ---- 140 ते 160 ---- उत्पादनात वाढ - 30 टक्के ते 35 टक्के
पाणीवापर क्षमता (टन/हे. सें.मी.) ---- 0.35 ते 0.40 ---- 0.80 ते 1.0 ---- 1.0 ते 1.20 ---- सरी- वरंबा पद्धतीच्या तुलनेत ठिबक सिंचनाची पाणीवापर क्षमता 2.25 ते 2.50 पट जास्त
पाणी देण्याची कार्यक्षमता (टक्के) ---- 60-70 ---- 90-95 ----95 ते 97 ---- पाणी देण्याच्या कार्यक्षमतेत 30 टक्के वाढ
रासायनिक खतमात्रा (सुरू) (कि./हे.) ---- 250ः115ः115 ---- 175ः80ः80 ---- 175ः80ः80 ---- खतमात्रेत 30 टक्के बचत
योग्य लागवड पद्धत ---- लांब सरी/ पट्टा पद्धत ---- जोड ओळ पट्टा पद्धत व 1.5 ते 2.10 मी. अंतरावरील सरी पद्धत ---- जोड ओळ पट्टा पद्धत व 1.5 ते 2.10 मी. अंतरावरील सरी पद्धत ---- मध्यम जमिनीसाठी जोड ओळ पद्धतीत 0.45-1.5 मी. अंतर जास्त खोलीच्या व भारी जमिनीसाठी 0.60-1.8 मी. अंतर. जास्त अंतरावरील सरी पद्धतीसाठी 1.5 ते 2.10 मी. अंतर
(लेखक नेटाफिम इरिगेशन इंडिया प्रा. लि.मध्ये ऊस विकास आणि प्रकल्प- वरिष्ठ व्यवस्थापक आहेत.)
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
आल्याचे विविध प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करण्यासाठ...
१५ ते ४० वयोगटातील स्त्रियांनी पाळणा लांबवण्याचा प...
या पध्दतीचा उपयोग केवळ पाळणा लांबवण्यासाठी नाही तर...
या वर्षीच्या कमी पावसामुळे सिंचनासाठी पाण्याची उपल...