महाराष्ट्रातील लोकजीवनात ज्वारीचे महत्व फार मोठे आहे. ज्वारी हे महाराष्ट्राचे प्रमुख अन्नधान्य पीक आहे. याशिवाय वैरण म्हणुनही ज्वारीचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. सध्याच्या दुष्काळी परिस्थितीमध्ये कमी ओलाव्यावर धान्य व कडबा देणारे ज्वारी हे एकमेव पीक आहे. विद्यापीठाने प्रसारीत कलेला संकरित व सुधारित वाणांच्या जोडीला सुधारित तंत्रज्ञानाचा वापर केल्यास खरीप ज्वारीच्या उत्पादनात भरघोस वाढ होईल. वाढत्या लोकसंख्येची अन्नधान्याची गरज भागविण्यासाठी व जनावरांना लागणारा चारा पुरवण्यासाठी खरीप ज्वारीची मदत होईल.
ज्वारी हे सरासरी ५oo ते ९00 मि. मी. पावसाच्या भागात घेतले जाणारे व पावसाचा ताण सहन करणारे पीक आहे. पोटरी अवस्था ते असतो. याउलट दाणे पक्र होण्याच्या अवस्थेत पावसाचे प्रमाण कमी असायला हवे, अन्यथा दाणे पावसात सापडुन बुरशीरोगाने काळे पडतात. यासाठी ज्वारीची वेळेवर काढणी आणि बुरशीरोगास प्रतिबंधक असणा-या जातींची निवड करावी. ज्वारी पिकास मध्यम ते भारी, उत्तम निच-यांची जमिन चांगली असते. जमिनीचा सामुद्द् ६.५ ते ८ पर्यंत असावा.
उन्हाळयामध्ये एकदा नांगरणी करुन दोन ते तीन उभ्या - आडव्या वखराच्या पाळ्या द्याव्यात. शेवटच्या पाळीपुर्वी १० ते १२ गाड्या चांगले पेरणीचा कालावधी नैऋत्य मौसमी पाऊस झाल्याबरोबर वापसा येताच पेरणी करावी. जुनचा दुसरा आठवडा ते जुलैचा पहिला आठवडा हा खरीप ज्वारीच्या लागवडीसाठी योग्य कालावधी आहे. पेरणीचा कालावधी लांबल्यामुळे खोडमाशीचा प्रादुर्भाव होवुन ताटांची संख्या घटते. उशिरा पेरणी करताना खोडमाशी नियंञणासाठी थायोमेथोक्झेंॉम (७o टक्के) या किटकनाशकाची ३ ग्रॅम प्रतिकिलो याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी.
पेरणी तिफणीने दोन चIडयाच्या पामरीने करावी. हेक्टरी ७,५ किलो संकरित व १० किलो सुधारित वाणाचे बियाणे पुरेसे होते. पेरणीसाठी मोहोरबंद व प्रमाणित बियाणे वापरावे. जर शेतकरी स्वत:चे बियाणे वापरणार असतील तर त्यांनी पेरणीपुर्वी बियाणे निवडून घ्यावे आणि बियाण्यास थायरमची बीज प्रक्रिया ३ ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात करावी. दोन ओळीतील अंतर ४५ सें.मी., तर दोन रोपातील अंतर १५ सें.मी. ठेवावे.
हा वाण २ooo साली वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथुन महाराष्ट्रासाठी शिफारस करण्यात आला. हा वाण दाण्यावर येणा-या काळ्याबुरशीस प्रतिकारक्षम आहे. या वाणाचे रुप संकरित वाणासारखे असुन तो जमिनीवर लोळत नाही. सोयाबीन व तुरीमध्ये आंतरपिकासाठी योग्य, दाण्याची व कडब्याची प्रत चांगली आहे. दाणे टपोरे व पांढरे शुभ्र आहेत. या वाणापासुन हेक्टरी ३२-३४ छिंटल धान्याचे व ९o-९५ झिंटल चान्याचे उत्पादन मिळते. ११५-१२0 दिवसात तयार होणा-या या वाणाच्या दाण्यामध्ये खरीप ज्वारीच्या इतर सुधारित वाणांपेक्षा लोह (४० पीपीएम) व जस्त (२२ पीपीएम) सर्वात जास्त आहे.
हा वाण २oo२ साली वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथुन मराठवाड्यासाठी शिफारस करण्यात आला. या वाणाचे दाणे मध्यम आकाराचे आहेत, हा वाण उंच वाढणारा असल्यामुळे दुहेरी उपयक्त आहे. या वाणास तयार होण्यास ११५-१२0 दिवस लागतात. धान्याचे उत्पादन ३२-३५ क्रॅिटल व कडब्याचे उत्पादन ११५-१२o क्रिटल प्रति हेक्टरी एवढे मिळते. दाण्याचा रंग मोत्यासारखा चमकदार असुन हे वाण काळया बुरशीरोगास प्रतिकारक्षम आहे.
या संकरित वाणाची २०१५ साली वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथुन महाराष्ट्रातील खरीप ज्वारी असलेल्या भागासाठी शिफारस करण्यात आली. हा संकरित वाण उंच वाढत असल्यामुळे या वाणापासुन कडब्याचे व धान्याचे भरपुर उत्पादन मिळते. तसेच दाण्याची व कडब्याची प्रत चांगली आहे. हा वाण ११५–११८ दिवसात पक्र होत असुन धान्य उत्पादन ४५-५0 क्रॅिटल प्रति हेक्टर तर कडबा उत्पादन १४२ ते १४५ क्रॅिटल प्रति हेक्टर मिळते.
या संकरित वाणाची २oo७ साली वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथुन भारतातील ज्वारी असलेल्या राज्यामध्ये खरीप हंगामासाठी शिफारस करण्यात आली. हा वाण मावा किडीस प्रतिकारक्षम असुन दाण्यावर येणा-या काळया बुरशीस प्रतिकारक्षम आहे. हा संकरित वाण उंच वाढत असल्यामुळे या वाणापासुन कडब्याचे व धान्याचे भरपुर उत्पादन मिळते. तसेच दाण्याची व कडब्याची प्रत चांगली आहे. या वाणास तयार होण्यास ११५-१२o दिवस लागतात. धान्याचे उत्पादन ४२-४५ क्रॅि./हे. तर कडब्याचे उत्पादन११o-११५ क्रॅि./हे. मिळते.
खरीप ज्वारीस १० ते १२ टन शेणखतासोबत ८o किलो नत्र, ४० किलो स्फुरद आणि ४० किलो पालाश प्रति हेक्टरी शिफारस केलेली आहे. पेरतेवेळी अर्धे नत्र, संपूर्ण स्फुरद व पालाश जमिनीत खोल पेरावेत. शक्यतो पहिली मात्रा संयुक्त अथवा मिश्रखतातुन द्यावी. राहिलेली अधीं नत्राची मात्रा पेरणीनंतर ३०-३५ दिवसांनी युरियाव्दारे द्यावी.
खरीप हंगामात तणाचा प्रादूर्भाव जास्त असतो. पेरणीनंतर ४०-४५ दिवसापूर्वी दोन खुरपण्या व दोन कोळपण्या कराव्यात. अॅट्राझीन हे तणनाशक हेक्टरी एक किलो १००० लिटर पाण्यात मिसळून पेरणीनंतर परंतु बियाणे उगवण्यापुर्वी जमिनीवर सारख्या प्रमाणात फवारल्यास तणांचा प्रादूर्भाव बराच कमी होतो.
अ.क्र. | किडीचे नाव | आर्थिक नुकसान पातळी | शिफारस केलेले कीटकनाशक व त्याची मात्रा (प्रती १० लिटर पाण्यासाठी) |
---|---|---|---|
१ | खोडमाशी | टक्के अंडी असलेली झाडे किंवा १० टक्के पोगेमर झालेली झाडे | निंबोळी अर्क ५ टक्के (५०० मी.ली.) किंवा सायपरमेथ्रीन १० टक्के प्रवाही , २० मी.ली.किंवा डेल्टामेथ्रीन २.८ टक्के प्रवाही , १२.५ मी.ली. किंवा क्वीनॉलफॉस २५ टक्के प्रवाही , २० मी.ली. किंवा क्लोरपायरीफॉस २० टक्के प्रवाही , २५ मी.ली. |
२ | खोडकिडा | १० टक्के झाडांच्या पानावर छिद्रेकिंवा ५ टक्के पोगेमर झालेली झाडे | निंबोळी अर्क ५ टक्के (५०० मी.ली.)किंवा क्वीनॉलफॉस २५ टक्के प्रवाही , २० मी.ली. किंवा क्लोरपायरीफॉस २० टक्के प्रवाही ,२५ मी.ली. |
३ | पोग्यातील ढेकुण व मावा | प्रादुर्भाव आढळून येताच | डायमेथोएट ३० टक्के प्रवाही , १० मी.ली.किंवा थायमेथोक्झाम २५ टक्के (दाणेदार) , ३ ग्रम किंवा इमीडॅक्लोप्रीड १७.८ टक्के प्रवाही , ३ मी.ली. |
४ | कणसातील | २० अळ्या प्रती कणीस |
कार्बरील ५० टक्के भुकटी, किंवा ४० ग्रॅम कविनोलफोस २५ टक्के प्रवाही , किंवा २० मी.ली. मोनोक्रोटोफॉस ३६ टक्के प्रवाही , किंवा २० मी.ली. किंवा मॅलाथीऑन ५० टक्के प्रवाही , २० मी.ली. धुरळणी - २० किलो कीटकनाशक प्रती हेक्टरी किंवा मॅलाथीऑन ५ टक्के भुकटी किंवा कार्बारील १० टक्के भुकटी किंवा मीथाइल पॅराथीऑन २ टक्के भुकटी |
किटकनाशकांच्या अती वापरामुळे माती व वातावरण प्रदुषित होते तसेच मानवाला सुध्दा अपाय होऊ शकतो. त्यामुळे किटकनाशकांचा वापर अत्यंत आवश्यक असेल तेव्हाच (किडींच्या आर्थिक नुकसान पातळीवर) व कृषि विद्यापीठाने शिफारस केलेल्या तिव्रतेचे द्रावण वापरुन करावा. खाली दिलेल्या तक्त्याप्रमाणे किडींच्या आर्थिक नुकसान पातळीवर शिफारस केलेल्या किटकनाशकापैकी एकाची फवारणी केल्यास कमीतकमी खर्चात किडींपासुन होणारे नुकसान टाळता येते. आंतरपीक मध्यम ते भारी जमीन आणि हमखास पावसाच्या भागामध्ये खरीप ज्वारीच्या पिकामध्ये सोयाबीनची २ : ४ किंवा ३ : ६ या प्रमाणात दोन ओळीतील अंतर ४५ से. मी. ठेवून लागवड करण्याची शिफारस करण्यात आली आहे. या पध्दतीचा अवलंब केल्यास अधिक उत्पादकता, नफा व शाश्वत उत्पादन मिळेल. तसेच तुरीचे अंतरपिक ३ : ३ किंवा ४ : २ या प्रमाणात घेतल्यास हेक्टरी २000 रु. अधिक फायदा मिळेल. त्याचबरोबर रोग व किडींचा प्रादूर्भाव कमी होऊन जमिनीची सुपीकता टिकून राहते. त्यामुळे शेतक-यांनी या पीक पध्दतीचा जरुर उपयोग करावा. ज्या शेतक-यांना सोयाबीन, मुग, उडीद ही कमी कालावधीची पीके आंतरपिके म्हणून घ्यावयाची आहे त्यांनी २:४ या पीक पध्दतीचा अवलंब करावा.
पिकाच्या परिपक्र अवस्थेत काढणी करावी. दाण्यामध्ये ८ टक्के आद्रता राहिल अशा प्रकारे उन्हात वाळवुन साठवण करावी. कडब्याची कुट्टी करुन साठवणुक करावी. ज्वारी लागवडीच्या सुधारित तंजाचा अवलंब केल्यास संकरित वाणापासुन ४० ते ४५ किं. तर सुधारित वाणापासुन ३२ ते ३५ किं. प्रती हेक्टरी धान्य उत्पादन त्याचबरोबर ८ ते १0 टन कडब्याचे उत्पादन मिळते.
संपर्क क्र. ७५८८0८२१६३
स्त्रोत - कृषी विभाग महाराष्ट्र शासन
अंतिम सुधारित : 10/7/2020
सध्याच्या काळात गहू, ज्वारी, करडई पिकांच्या वाढीच्...
चांगले उत्पन्न मिळवून देणारे पीक’ म्हणून ज्वारीचे ...
पूर्वहंगाम उसात बटाटा अंतरपीकावर प्रादेशिक उस संश...
बऱ्याच वेळा ओलाव्याची कमतरता व खोडमाशीचा प्रादुर्भ...