অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सूर्यफुलावरील रोगांचे नियंत्रण

सूर्यफूल हे खरिपातील महत्वाचे पीक मानले जाते. या पिकाला रोगांचा प्रादुर्भाव झाल्यास मोठ्या प्रमाणावर उत्पादनात घट होते. सूर्यफुलावरील रोगांची ओळख करून योग्य वेळी नियंत्रण केल्यास आर्थिक नुकसान टाळता येऊ शकते.

केवडा रोग

दमट वातावरणात कोवळ्या रोपाव्या दलपत्रावर पांढुरकी बुरशी वाढलेली दिसते. बुरशीची वाढ पानाच्या खालच्या बाजूवर असते. मुळांना रोगाची बाधा झाल्यास बुरशी झाडाच्या प्राथमिक मुळावर गाठी तयार झाल्यामुळे झाडे कमजोर होऊन खाली लोळतात. भारी जमिनीतील पाण्याचा वाईट निचरा या रोगाव्या वाढीला पोषक असतो. या रोगाचा प्रसार बियाण्याष्ट्रारे, जमिनीतून तसेच हवेतून होत असतो.

नियंत्रण
  1. पिकाचा फेरपालट करावा.
  2. शेतातील रोगट झाडे उपटून गोळा करून जाळून टाकावीत.
  3. रोगप्रतिकारक जातीची लागवड करावी.
  4. या रोगाला-३ हा संकरित वाण सहनशील आहे. त्याची लागवड करावी. प्रमाणित शुद्ध बियाणे वापरावे
  5. पेरणीपूर्वी बियाण्यास प्रति केिली ४ ग्रॅम मेटॅलॅक्झील (रिट्टोमील) याप्रमाणे बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करावी.
  6. रोगाची लक्षणे दिसताच ४o ग्रॅम रिट्टोमील प्रति १o लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

भुरी रोग

सुरवातीस बुरशीची पांढरट वाढ पानांवर ठिपक्याव्या स्वरूपात दिसते. दमट हवामानात ठिपक्याचा आकार वाढ्त जाऊन संपूर्ण पान व्यापले जाते. त्यामुळे पानावर पांढरट राखाडी धूळ साचल्यासारखे दिसते. रोगाचा प्रादुर्भाव जास्त असेल, तर पाने करपल्यासारखी दिसतात व नंतर पानगळ होते. पांढरट बुरशी प्रामुख्याने पाने, खोइ. फांद्या व तबकावर वाढते. या रोगाचा प्रसार प्रामुख्याने बियाण्याद्वारे व हवेतून होत असतो. रोगाची वाढ ७० ते ८० टक्के सापेक्ष आर्द्रतेत जोमाने होते.

नियंत्रण
  1. या रोगाच्या नियंत्रणासाठी ३00 मेश गंधकाची भुकटी हेक्टरी २o किलो या प्रमाणात पिकावर धुरळावी किंवा पाण्यात मिसळणारे गंधक २५ ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
  2. रोगप्रतिबंधक जातीची लागवड़ीसाठीं निवड़ करावी रोगग्रस्त झाडांचा नायनाट करावा.
  3. तांबेरा/तांबोरा: हा रोग प्रामुख्याने पिकांच्या रोपावस्था ते पीक फुलावर आल्यानंतरसुद्धा आढ्ळून येतो. रोपांच्या पानावर, पानांच्या देठावर आणि खोडावर तांबूस रंगाचे ठिपके येतात. हे ठिपके जुने झाल्यावर

काळ्या रंगाचे दिसू लागतात. हा रोग उष्ण व दमट हवामानात जास्त प्रमाणात दिसून येतो. रोगाचा प्रसार वारा, कीटक व पावसाच्या पाण्याच्या थेंबाद्वारे एक झाड़ापासून दुसया झाड़ाला होती. हवामानानुसार पावसाळ्यात रोगाचा प्रादुर्भाव कमी-अधिक प्रमाणात होतो.

नियंत्रण
  1. आधीच्या पिकाची कापणी झाल्यानंतर शेतातील सर्व प्रकारची तसेच तांबेरा रोगाची बाधा झालेली रोपे उपटून जाळून नष्ट करावीत.
  2. पेरणीपूर्वी बियाण्यास  प्रति किलो २.५ ग्रॅम 'कॅप्टन' किंवा 'थायरम' किंवा 'बाविस्टीन' या बुरशीनाशकाची बीजप्रक्रीया करावी.
  3. या रोगाच्या नियंत्रणासाठी डाथथेन -४५ किंवा मॅन्कोझेख हे किटकनाशक  प्रति १० लिटर पाण्यात २५ ग्रॅम या प्रमाणात मिसळून फवारणी करावी.
  4. रोगप्रतिकारक जातींचा वापर करावा उदा. 'मॉर्डेन', 'सूर्या'

मुळकूज रोग (चारकोल रॉट)

जमिनीतून उद्भवणा-या बीजाणूमुळे मुळांना बुरशीची बाधा होऊन मुळे तपकिरी होतात. सुरवातीच्या अवस्थेत बुरशीची बाधा झाल्यास रोपे लवकर मरतात. रोगाची बाधा उशिरा झाल्यास झाडाचा गळा (तबकाच्या खोडाचा भाग) तपकिरी व काळसर होऊन कुजतो. मुळे करडी होऊन खुरटी राहतात. त्यानंतरच्या अवस्थेत तबक अकाली पक्व होते. दाणे लहान राहतात.फुलांचे  तबक दाण्यांनी पूर्णपणे भरत नाही; त्यामुळे उत्पादन घटते.

नियंत्रण

पेरणीपूर्वी प्रति कि.ग्रॅ. बियाण्यास ३ ते ४ ग्रॅम थायरमची बीजप्रक्रिथा करावी. पिकाचा फेरपालट करावा.

स्तंभकूज

या रोगाची लागण साधारणपणे पावसाळ्यात पीक स्तंभक अवस्थेत असताना आढळून येते. फुलाचे देठ व छेदमंडल (फुलाचा पाठीमागचा भाग) यावर अनियमित ओलसर अशा चट्टयांनी या रोगाची सुरवात होते. रोगट भागावर बुरशीची कापसाप्रमाणे पांढरी वाढ झालेली आढळते. पुढील अवस्थेत बुरशीची मुळे, रोगट भाग काळसर होतो. रोगाची लागण छेदमंडल व देठाच्या संपूर्ण भागावर होत असल्यामुळे स्तंभक सडल्यासारखे होऊन बरेचदा गळून पडते. स्तंभकाच्या फुलो-यावर तसेच रोगाची तीव्रता जास्त असल्यास बीजावरदेखील या रोगाच्या बुरशीची वाढ झालेली दिसते. त्यामुळे झाडावरील फुले सडतात व अशा स्तंभकात बीज भरत नाहीत.

नियंत्रण
  1. या रोगाची लागण तसेच प्रसार मुख्यत्चे पक्षी, कीड़ व आंतरमशागत करताना छेदमंडलास आणि देठाला झालेल्या इजेमुळे होते. म्हणून या रोगाच्या नियंत्रणाकरिता पक्ष्यापासून पिकांचा बचाव करावा.
  2. पिकावर रोगाचा प्रादुर्भाव दिसताच ताम्रयुक्त औषध (कॉपर ऑक्सिक्लोराईड) २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

पानावरील ठिपका

हवेतील व जमिनीतील बुरशीच्या बीजांकुरणापासून या रोगाचा प्रसार अधिक प्रमाणात होत असतो. पानावरील ठिपके पिकाच्या कोणत्याही अवस्थेत येऊ शकतात. ते पानावर गोलाकार अथवा वेडेवाकडे वाटोळे, राखाडी किंवा तपकिरी रंगाचे दिसतात.

नियंत्रण

डाथथेन- ७८ किंवा मॅन्कोझेब २o ग्रॅम प्रति १० लिटर

नेक्रोसीस (उतिक्षय)

तंबाखूवरील विषाणू रोगाची बाधा झालेल्या पानांच्या शिरावर पिवळ्या रेषा असतात. कोवळी पाने विकृत आकाराची, खडबडीत, लहान, अनियमित रेषा असलेली किंवा त्यांच्था कड़ा अतिक्षयी असतात. या रोगाची लक्षणे पानावरून देठ, फांदी, खोड़ यांवर दिसू लागतात. या रोगाचा प्रसार प्रामुख्याने बियाण्याद्वारे आणि कीटकांमार्फत होतो.

नियंत्रण
  1. या विषाणू रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सूर्यफुलाच्या शेजारी सहा ओळी ज्वारीच्या पेराव्यात. सूर्यफुलाच्या पेरणीच्या १५ दिवस आधी ज्वारीची पेरणी करावी.
  2. कीटकाचा प्रादुर्भाच दिसू लागताच 'मोनोक्रोटोफॉझ' २० मिलि प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.


 

स्त्रोत - कृषी विभाग महाराष्ट्र शासन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate