অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

चंदीगढमधील ई-प्रशासन

ई-जनसंपर्क

ई-जनसंपर्क योजनेमुळे चंदीगढच्या रहिवासींना ७० ई-जनसंपर्क केंद्रांतून विविध प्रकारची माहिती मिळवता येणार आहे तसेच अनेक सेवांचाही लाभ घेता येणार आहे. ही ई-जनसंपर्क केंद्रे चंदीगढच्या प्रत्येक सेक्टरमध्ये व गावामध्ये उभारली जाणार आहेत. या केंद्रांवरून रहिवाशी त्यांच्या तक्रारी देखिल नोंदवू शकतात आणि त्यांचे त्वरीत निवारणही केले जाते. आय.सी.टी.चे फायदे जनसामान्यांपर्यंत पोहोचावेत, विशेषतः ज्या व्यक्तींकडे माहिती तंत्रज्ञानाची सुविधा उपलब्ध नाही अशा व्यक्तींपर्यंत हे फायदे पोहोचावेत व त्यांना सुलभरितीने योग्य माहिती मिळावी तसेच तक्रार नोंदणी किंवा माहितीचा अधिकार वापरून माहिती मिळविणे यासारखी कामे त्यांना सहजरित्या करता यावीत या हेतूने ही योजना तयार करण्यात आली आहे.

जनसंपर्काचा दृष्टीकोन

 • प्रशासकीय यंत्रणेला सर्वसामान्य जनतेच्या जवळ आणणे.
 • एकाच माहिती प्रसारण यंत्रणेद्वारे नागरिकांना सरकारी सेवा उपलब्ध करून देणे व त्यांचा बहुमूल्य वेळ वाचविणे.
 • कमीतकमी वेळात अधिक चांगल्या तर्हेने सेवा पुरविणे.
 • आरामदायी वातावरणात माहितीसेवा पुरविणे व ही सेवा मिळविण्याचा अनुभवही आनंददायी बनविणे.
 • माहितीच्या अधिकाराला महत्त्व प्राप्त करून देणे.

संपर्क केंद्रांची पुढील पायरी म्हणुन नागरिकांना मोफत माहिती सेवा पुरविण्यासाठी ई-जनसंपर्क केंद्रे उभारण्यात आली आहेत. प्रत्येक केंद्रात माहिती मिळविण्याची आणि इतर मोफत सेवांचा लाभ घेण्याची सुविधा आहे.

या योजनेत खालील सेवांचा समावेश आहे:

माहिती सेवा

 • नागरिकांद्वारे नेहमी वापरल्या जाणार्या विविध खात्यांचे अर्ज व निरनिराळ्या प्रक्रियांची माहिती. उदा. जन्म/ मृत्यू नोंदणीसाठी अर्ज करणे, पोलिसांत तक्रार दाखल करणे, तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, महापालिका, इ. कार्यालयांशी संबंधित असणार्या प्रक्रिया आणि त्यासाठी लागणारे अर्ज.
 • शिक्षण आणि आरोग्यविषयक माहिती. उदा. सरकारी रुग्णालयांच्या रक्तपेढ्यांत उपलब्ध असणारे रक्त, परिक्षांचे निकाल, इ.
 • वाहतूक आणि पर्यटन विषयक माहिती. उदा. बसमार्ग, पर्यटनाच्या नव्या योजना, इ.
 • पासपोर्ट, रेल्वे आरक्षण यांची माहिती, रेल्वेचे वेळापत्रक, इ.
 • सर्व सरकारी वेबसाईटसवर जाण्याची सुविधा
 • प्रत्येक खात्याद्वारे पुरविल्या जाणार्या उपयुक्त सेवांची माहिती.
 • या सर्व सेवा विनामूल्य पुरविल्या जातात, मात्र या माहितीची छापील प्रत हवी असल्यास त्यासाठी नाममात्र शुल्क आकारले जाते.
 • ही सुविधा वापरून नागरिक कोणत्याही खात्या संबंधींच्या त्यांच्या तक्रारी दाखल करू शकतात किंवा माहितीच्या अधिकाराखाली अर्जही करू शकतात.

अधिक माहितीसाठी लॉग ऑन करा:

ई-संपर्क

ई-संपर्क हा माहिती तंत्रज्ञान खात्याने सुरू केलेला प्रकल्प आहे. प्रशासनाच्या विविध खात्यांच्या सेवा एका छताखाली उपलब्ध करून देण्यासाठी वेबपोर्टल उभारणे व त्या माध्यमातून १६ विविध सरकारी सेवा उपलब्ध करून देणे या हेतूने हा प्रकल्प सूरू करण्यात आला आहे. या प्रकल्पांतर्गत ८ ई-संपर्क केंद्रे उभारण्यात येणार आहेत. सर्व सरकारी सेवा विनासायास आणि पारदर्शकरित्या एकाच छताखाली उपलब्ध करून देऊन चंदीगढच्या नागरिकांना ’एक खिडकी- अनेक सेवा’ याचा अनुभव देण्यासाठी हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे.

ध्येय आणि उद्दिष्ठये

 • नागरिकांना एकाच छताखाली सेवा उपलब्ध करून देणे.
 • निरनिराळ्या प्रक्रियांतील टप्पे कमी करणे आणि त्यायोगे नागरिकांचा वेळ वाचविणे.
 • कमीतकमी वेळात अधिक चांगल्या तर्हेने सेवा पुरविणे.
 • सेवेत पारदर्शकता आणणे.

पूर्वी ज्या सेवा वेगवेगळ्या ठिकाणी उपलब्ध होत्या त्याच सेवा या प्रकल्पामुळे ई-संपर्क केंद्रांवर उपलब्ध करून देण्यात प्रशासन यशस्वी झाले आहे. माहिती तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे लांबचलांब रांगांत  तासनतास ताटकळण्याच्या त्रासातून नागरिकांची मुक्ती झाली आहे शिवाय सेवा पुरविण्याचा वेग वाढल्यामुळे प्रक्रियांसाठी लागणारा वेळही कमी झाला आहे.

सेवांची यादी

 

क्र.

खाते

सेवा

१.

कर आकारणी

कर भरणा

२.

चंदीगढ परिवहन

बसपास देणे

३.

समाजकल्याण

- ज्येष्ठ नागरिकांना ओळखपत्र देणे

- अपंगांना ओळखपत्र देणे

- वृद्ध नागरिक, विधवा आणि अपंग व्यक्तींना निवृत्तीवेतन देणे

४.

अभियांत्रिकी

वीजबिल भरणा

५.

जन्म व मृत्यू नोंदणी

जन्म व मृत्यूचे दाखले देणे.

६.

महापालिका पाणीबिल

मोकळ्या जागांचे व हॉल्सचे आरक्षण

७.

चंदीगढ पोलिस

भाडेकरू नोंदणी, घरातील नोकरांची नोंदणी, सामान्य, स्टिकर आणि पोस्टल चलन

८.

कोषागार

शिक्का पेपरची आणि खास चिकटवता येणा-या शिक्क्यांची विक्री

९.

चंदीगढ गृहनिर्माण महामंडळ

अर्जांची विक्री करणे व स्वीकारणे, महामंडळाच्या घरांचे अनामत

१०.

भारत सरकारच्या सेवा

पासपोर्ट अर्ज स्वीकारणे

११.

B2C सेवा

टेलिफोन बिल भरणे:

 1. एच.एफ.सी.एल.- कनेक्ट
 2. एअरटेल
 3. स्पाईस

फायदे


 • एकाच छताखाली अनेक कामे करता येत असल्याने नागरिकांचा होणारा त्रास व लागणारा वेळ कमी होतो.
 • नागरिकांना केंद्रस्थानी ठेऊन उभारण्यात आलेल्या या केंद्रांत अद्ययावत सेवासुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
 • रविवार वगळता सर्व दिवस सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत सेवा
 • सेवांमधील पारदर्शकता
 • कमीत कमी वेळेत अधिक चांगल्या तर्हेने सेवा पुरविणे.
 • एम.आय.एस. ची सोप्या तर्हेने देखभाल करता येते त्यामुळे तिजोरीत जमा झालेल्या पैशांचा योग्य मेळ घालता येतो.
अधिक माहितीसाठी लॉग ऑन करा: ग्रामसंपर्क ग्रामीण ज्ञान केंद्र चंदीगढमधील ग्रामीण लोकसंख्येला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी चंदीगढच्या केंद्रशासित प्रदेशात मोडणार्या सर्व गावांत मिळुन एकुण १७ ई-ग्रामसंपर्क केंद्रे उभारली जाणार आहेत. शहरातील संपर्क केंद्रांवर उपलब्ध असणार्या सर्व सेवा ग्रामसंपर्क केंद्रांवरही उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या केंद्रांमुळे ग्रामीण जनतेला माहितीचा अफाट खजिनाच उघडा होणार असुन त्यामुळे एका अर्थाने ही सर्व केंद्रे ग्रामीण जनतेसाठी ज्ञान केंद्रे बनणार आहेत. जनसंपर्क सेवांचे उदाहरण डोळ्यांसमोर ठेवून याही केंद्रांवर माहितीसेवा विनामूल्य पुरविली जाणार आहे. या केंद्रांवर नागरिक त्यांच्या तक्रारी दाखल करू शकतील तसेच माहितीच्या अधिकारा खाली अर्जही करू शकतील. ग्रामविकास खात्याच्या मदतीने ही केंद्रे उभारण्यासाठी १७ ठिकाणांची निवड करण्यात आली आहे. यांत पंचायतीच्या वापरात नसलेल्या इमारतींचा समावेश आहे ज्यांची डागडुजी करून नंतर तेथे केंद्रे उभारली जातील. संपर्क केंद्रांप्रमाणे आणि जनसंपर्क केंद्रांप्रमाणे या केंद्रांतही पिण्याचे पाणी, स्वच्छ शौचालये आदे सुविधा पुरविल्या जातील. या उपक्रमांतर्गत पालसोरा, मालोया, दादू माजरा, काझेरी, किशनगढ, मौली जाग्रण, दारिया, मखन माजरा, रायपूर कालन, रायपूर खुर्द, बहलाना, हालो माजरा, खुदा जासू, खुदा लाहोरा, खुदा अलिशर, सारंगपूर, काईम्बवाला, धानास इत्यादी गावांचा समावेश केला जाईल.अधिक माहितीसाठी लॉग ऑन करा: 
एस.बी.आय.एल.एल.

संदेशा द्वारे वीज/ पाणीबिलाचे तपशील मिळविणे.

एस.एल.ओ.सी.

शहरातील संपर्क केंद्रांचे पत्ते मिळविणे.

एस.सर्व्ह

संपर्क केंद्रांतर्फे पुरविल्या जाणार्या सेवांची यादी मिळविणे.

एस.डाँक

वयाचा दाखला आणि वास्तव्याचा दाखला म्हणुन ग्राह्य धरल्या जाणार्या कागदपत्रांची यादी.

अधिक माहितीसाठी लॉग ऑन करा:

ग्रामसंपर्क ग्रामीण ज्ञान केंद्र चंदीगढमधील ग्रामीण लोकसंख्येला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी चंदीगढच्या केंद्रशासित प्रदेशात मोडणार्या सर्व गावांत मिळुन एकुण १७ ई-ग्रामसंपर्क केंद्रे उभारली जाणार आहेत. शहरातील संपर्क केंद्रांवर उपलब्ध असणार्या सर्व सेवा ग्रामसंपर्क केंद्रांवरही उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या केंद्रांमुळे ग्रामीण जनतेला माहितीचा अफाट खजिनाच उघडा होणार असुन त्यामुळे एका अर्थाने ही सर्व केंद्रे ग्रामीण जनतेसाठी ज्ञान केंद्रे बनणार आहेत. जनसंपर्क सेवांचे उदाहरण डोळ्यांसमोर ठेवून याही केंद्रांवर माहितीसेवा विनामूल्य पुरविली जाणार आहे. या केंद्रांवर नागरिक त्यांच्या तक्रारी दाखल करू शकतील तसेच माहितीच्या अधिकारा खाली अर्जही करू शकतील. ग्रामविकास खात्याच्या मदतीने ही केंद्रे उभारण्यासाठी १७ ठिकाणांची निवड करण्यात आली आहे. यांत पंचायतीच्या वापरात नसलेल्या इमारतींचा समावेश आहे ज्यांची डागडुजी करून नंतर तेथे केंद्रे उभारली जातील. संपर्क केंद्रांप्रमाणे आणि जनसंपर्क केंद्रांप्रमाणे या केंद्रांतही पिण्याचे पाणी, स्वच्छ शौचालये आदे सुविधा पुरविल्या जातील. या उपक्रमांतर्गत पालसोरा, मालोया, दादू माजरा, काझेरी, किशनगढ, मौली जाग्रण, दारिया, मखन माजरा, रायपूर कालन, रायपूर खुर्द, बहलाना, हालो माजरा, खुदा जासू, खुदा लाहोरा, खुदा अलिशर, सारंगपूर, काईम्बवाला, धानास इत्यादी गावांचा समावेश केला जाईल. अधिक माहितीसाठी लॉग ऑन करा

अंतिम सुधारित : 1/28/2020© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate