অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

जम्मू आणि काश्मीर

जम्मू आणि काश्मीर

सामाजिक माहिती केंद्र - सीआयसी भारत सरकारने जम्मू-काश्मीर राज्यासाठी ‘सामाजिक सूचना केंद्र - सीआयसी’ प्रकल्प सुरू केला आहे. ह्यामागील योजना आहे “संगणकीय संज्ञापनाच्या अत्याधुनिक सेवासुविधांची उभारणी करणे”. सीआयसी हे वैयक्तिक संगणकावर म्हणजे पीसीवर आधारित नागरी सुविधा केंद्र असते. ह्यामधील माहितीचा उपयोग नागरिकांना हव्या त्या सेवा पुरवणे, इ-प्रशासन, इ-शिक्षण आणि इ-व्यापारासाठी करता येतो. राज्यामधील प्रत्येक १३४ गटांमागे एक सीआयसी (सामाजिक सूचना केंद्र) उपलब्ध आहे. ह्याद्वारे खालील माहिती आणि सेवा मिळू शकतात - शेतीमालाचे विपणन आपत्ती व्यवस्थापन रोजगारांच्या संधी सार्वजनिक आरोग्य सामाजिक-आर्थिक माहिती संगणक प्रशिक्षण कार्यक्रम नागरिक-केंद्रित सेवा निविदा अधिसूचना इ-रोजगार अधिसूचना दुर्गम भागांमध्ये इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे वर्तमानपत्र पोहोचवणे तक्रार-निवारण इ. रोजगार विनिमय केंद्राची माहिती ऑनलाइन उपलब्ध सेवा - नोकरी मागणार्‍या अर्जदारांची नोंदणी रोजगार बाजारविषयक माहितीची आकडेवारी व्यवसाय मार्गदर्शन आणि रोजगार समुपदेशन विविध खाजगी क्षेत्रांकडे पुरस्कृत उमेदवार पाठवणे सेनादलांमधील भरतीसाठी विशेष कार्यक्रम स्वयं-रोजगार योजनांची माहिती स्पर्धात्मक परीक्षांसाठी प्रशिक्षण / मार्गदर्शन रोजगार विनिमय केंद्रामध्ये नाव नोंदवणे ह्या सेवांचा लाभ घेण्यासाठी http://jakemp.nic.in ह्यावर क्लिक करा. मोटारवाहनांची ऑनलाइन माहिती उपलब्ध सेवा - अर्जाचे नमुने कर आकारणी नोंदणीचा शोध घेणे परवान्यासाठी केलेल्या अर्जाची स्थिती अंतरांची सूची ड्रायव्हिंग स्कूल्सची यादी ह्या सेवांचा लाभ घेण्यासाठी http://jaktrans.nic.in ह्यावर क्लिक करा. अर्ज आणि कार्यपद्धतींशी संबंधित माहिती जम्मू-काश्मीर राज्याच्या खालील विभागांमार्फत नागरिकांना पुरवल्या जाणार्‍या सेवा / योजनांसंबंधीची माहिती - ग्राहकविषयक व्यवहार आणि सार्वजनिक वितरण, रोजगार, सामाजिक स्वास्थ्य, परिवहन कोणीही व्यक्ती ह्यांपैकी कोणत्याही विभागाची निवड करून ह्या सेवांचा लाभ घेण्यासाठी त्यांची कार्यपद्धती जाणून घेऊ शकते आणि जरूर त्या अर्जांचे नमुने डाउनलोड करू शकते. ह्या सेवांचा लाभ घेण्यासाठी http://jakschemes.nic.in ह्यावर क्लिक करा.

अंतिम सुधारित : 6/17/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate