गुजरात राज्यातील विद्यापीठीय दर्जा देण्यात आलेले एक निवासी विद्यापीठ. याची स्थापना महात्मा गांधींनी १९२० मध्ये अहमदाबाद येथे केली. या विद्यापीठात प्राथमिक शिक्षणापासून एम्.ए., पीएच्.डी.पर्यंत सर्व स्तरांवर शिक्षण दिले जाते. या विद्यापीठाच्या कक्षेत एक संशोधन संस्था, सामाजिक शास्त्राचे एक महाविद्यालय आणि दोन अध्यापक प्रशिक्षण महाविद्यालये आहेत.त्यास एक प्रायोगिक विद्यालय संलग्न केले असून त्यात ३६४ विद्यार्थी शिकत होते (१९७२). विद्यापीठाचे ग्रंथालय जुने असून त्यात १४ भाषांतील सु. १,७९,२१२ ग्रंथ होते (१९७२). विद्यापीठातील कोणत्याही पदवीधर विद्यार्थ्यास सामाजिक-आर्थिक विषयांवर प्रबंध लिहून एम्.ए. ही पदवी मिळविता येते. विद्यापीठाचे तांत्रिक कृतिनिकेतन असून तेथे खादी-ग्रामोद्योग विषयक एक वस्तुसंग्रहालय आहे. येथील अभ्यासक्रमात महात्मा गांधींचे तत्त्वज्ञान व शिकवण यांवर भर दिला जातो.
लेखक: सु. र. देशपांडे
माहिती स्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 7/27/2020
मध्य प्रदेशातील एक विद्यापीठ.
आंध्र प्रदेश राज्यातील एक विद्यापीठ.
तमिळनाडू राज्याच्या दक्षिण अर्काट जिल्ह्यातील अन्न...
उत्तर प्रदेश राज्यातील अलीगढ येथे १९२० मध्ये स्थाप...