स्वयंरोजगार
महाराष्ट्र शासन, केंद्र शासन, केंद्र व राज्य शासन अंगीकृत व्यवसाय, महामंडळे आणि बँका याच्यामार्फत नोकरीउत्सुंक उमेदवारांना उत्तेजन देऊन स्वयंरोजगाराकरिता प्रवृत्त करण्या्करिता स्वयंरोजगाराच्या विविध योजनांची अंमलबजावणी केली जाते.
नोकरीउत्सुक उमेदवार तसेच समाजातील कोणताही प्रेरित घटक यांचेकरिता सध्या कार्यरत असलेल्या योजनांबाबतची माहिती येथे उपलब्ध आहे.
नोकरीउत्सुक उमेदवारांकरिता उपलब्ध सुविधा
- स्वयंरोजगाराच्या योजना राबविणा-या यंत्रणा (31+ यंत्रणा), विविध योजना (150+), प्रवर्गनिहाय योजना, नॉन-लोन योजना इ. बाबतची माहिती ऑनलाईन शोधण्याची व प्रिंट घेण्याची सुविधा.
- तुलनात्मक, विश्लेषणात्मक व सुयोग्य अशा वैयक्तिक अथवा गटांकरिताच्या योजनांचा प्रगत शोध ऑनलाईन घेण्याची सुविधा.
- भांडवल, गुंतवणूक तसेच क्षेत्रनिहाय सुयोग्य व्यवसायाचा शोध घेण्याचा व त्यांच्या प्रिंट घेण्याची ऑनलाईन सुविधा.
- 250 पेक्षा जास्त विविध व्यवसायांचे नमुना प्रकल्प अहवाल उपलब्ध.
- व्यवसायाकरिता आवश्यक असणारी विविध कागदपत्रे, लायसेन्स, परवाने तसेच ना-हरकत प्रमाणपत्रे इ. बाबतची माहिती ऑनलाईन पाहण्याची सुविधा.
- स्वयंरोजगाराकरिता कर्जप्रकरणे ऑनलाईन सादर करण्याची सुविधा.
- स्वयंरोजगाराची कर्ज प्रकरणांची सद्य:स्थिती पाहण्याची ऑनलाईन सुविधा.
- कर्ज हप्ता गणक (EMI Calculator) सुविधा.
या सुविधांचा लाभ घेण्याकरिता आजच नोंदणी करा अथवा यापूर्वी नोंदणी केली असल्यास Log In करा...
स्वयंरोजगार योजना अंमलबजावणी करणा-या यंत्रणांकरिता सुविधा
- स्वयंरोजगाराच्या योजनांची अंमलबजावणी करणा-या यंत्रणांकरिता त्यांच्या विविध योजनांची माहिती भरणे व वेळोवेळी अद्ययावत करणेकरिता ऑनलाईन सुविधा.
या सुविधांचा लाभ घेण्याकरिता आजच नोंदणी करा अथवा यापूर्वी नोंदणी केली असल्या्स Log In करा...
माहिती संकलक : अतुल पगार
स्त्रोत : रोजगार व स्वयंरोजगार संचालनालय, महाराष्ट्र शासन - वेबसाईट
अंतिम सुधारित : 7/27/2020
0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या
तार्यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.
© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.