थायलंड द्वीपकल्पाच्या पूर्व किनाऱ्यावरील एक प्रमुख बंदर व याच नावाच्या प्रांताचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या २१,७४५ (१९७०). हे मलाया सरहद्दीपासून उत्तरेस सु. १०४ किमी. थायलंडच्या आखाताला मिळणाऱ्या पाट्टानी नदीमुखासी वसले आहे.
सोळाव्या शतकात आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी खुले केलेले हे पहिले थाई बंदर होय. येथून मुख्यतः नारळ, रबर, कथिल यांची निर्यात, तर तांदूळ व पक्का माल यांची आयात केली जाते.
लिमये, दि. ह.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 7/8/2020
तेल आवीव्ह–जाफा : इझ्राएलची जुनी राजधानी व प्रमुख ...
अॅस्ट्राखान : रशियातील अॅस्ट्राखान प्रांताची राज...
पा ले र्मो : प्राचीन पॅनॉर्मस, अरबी खालेसा. इटलीमध...
ब्रिटिश बेटांपैकी आयरिश समुद्रातील एक बेट, क्षेत्र...