उस्मानाबाद जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण. लोकसंख्या १३,४७७ (१९७१). लातूर-उमरगा रस्त्यावर हे लातूरच्या दक्षिणेस १९ किमी. आहे. मलिकंबरने बांधलेला किल्ला अप्रतिम असून सध्या तो पुरातत्त्व विभागाकडे आहे. लिंगायतांच्या मल्लनाथ महाराजांची समाधी येथे असल्याने हे त्यांचे तीर्थक्षेत्र बनले आहे. औरंगजेबकालीन जामे मशीद व औसाजवळील खरोसा लेणी प्रेक्षणीय आहेत. येथे कागद कारखाना व खादी केंद्र असून तालुक्याच्या शेतमालाची ही प्रमुख बाजारपेठ आहे.
लेखक :र.रू.शाह
स्त्रोत : मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 7/11/2020
लोकसहभागाने परिपूर्ण जलसंधारणाचा "मेडसिंगा पॅटर्न'...
लातूर जिल्ह्यातील औसा येथील बालाजी माळी यांनी मात्...
उस्मानाबाद जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण. लोकसंख्या...