অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

चला, जाऊया ट्रेकला

पावसाळ्यातील एक आनंदाचा भाग म्हणजे ट्रेकला जाणे. आपल्या ग्रुप बरोबर किंवा परिवारासोबत कोणी किल्ल्यावर तर कोणी डोंगरावर ट्रेकला जातात. हिरव्यागार व थंडगार वातावरणात निसर्गाची साथ आणि मित्रमैत्रिणींची संगत यात वेगळीच मजा असते. पण मजेबरोबरच आपण स्वतःचे व पर्यावरणाचे रक्षण केले पाहिजे. पर्यावरणाचा कोणत्याही प्रकारे ऱ्हास होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. आणि ट्रेक वर जात असताना आपली व आपल्या बरोबर असणाऱ्यांची काळजी घेणे गरजेचे आहे. मुंबई, ठाणे परिसरात बऱ्याच जागा आहेत जिथे आपण ट्रेकिंगला जाऊ शकतो .

माहुली किल्ला

ठाण्या जिल्ह्यातील सगळ्यात उंच असा 2,815 फूट उंचीवर असलेला हा माहुली किल्ला. ट्रेकिंगसाठी असा नावाजलेला किल्ला विशेषतः रॉक क्लाम्बर्ससाठी. 3 तासाच्या ट्रेक नंतर तुम्हाला शंकराचे मंदिर, 3 गुंफा आणि ऐतिहासिक 'कल्याण दरवाजा' पहावयास मिळेल. टेकडीवरील पसरलेल्या झाडांमुळे या किल्ल्याला अभयारण्य घोषित करण्यात आले आहे. या किल्ल्यावर जाण्यासाठी मध्यरेल्वेवरील आसनगाव स्टेशनला उतरावे लागते. तिथून किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी रिक्षा मिळतात.

ढाक - बहिरी

2700 फूट उंचीवर असलेल्या कर्जत तालुक्यातील ढाक किल्ल्याच्या अंतर्भागात बहिरी लेणी आहेत. ट्रेकिंगसाठी सगळ्यात कठीण असा हा किल्ला आहे. ज्यांना ट्रेकिंगची आवड आहे ते लेणीच्या बाजूला ट्रेक करू शकतात. या किल्ल्यावर जाण्यासाठी मध्य रेल्वेवरील कर्जत स्टेशनवर तिथून संदेशी गावापर्यंत जाण्यासाठी रिक्षा मिळतात.

कलावंतीण दुर्ग,पनवे

सह्याद्री रांगेतील ही ट्रेकिंग साठी सर्वात उत्कृष्ट अशी जागा आहे. कलावंतीण दुर्ग हे जुन्या मुंबई- पुणे रास्ता बंद मार्गावर 2300 फूट उंचीवर आहे. ट्रेकसाठी कठीण पातळी म्हणून याचा विचार करतात. आपण जवळच्या भीमशंकर पठाराच्या दृश्याचा आनंद घेऊ शकता तसेच जास्त ढग नसतील तर आपण मुंबई ही उंचीवरून बघू शकतो. पनवेल स्टेशनपासून रस्त्यामार्गे ठाकूरवाडी गावात पोहोचणे, तिथून पुढे किल्ल्यावर जाणे.

तुंगारेश्वर , वसई

वसईतील र्वात उंच ठार ज्याची उंची 2000 फुटपेक्षा अधिक आहे. तुंगारेश्वर पठार हे फिरण्यासाठी खूप प्रसिद्ध आहे. तुम्ही ट्रेक करीत शंकराच्या मंदिरापर्यंत जाऊ शकतात तसेच धबधब्याचाही आनंद घेऊ शकता. वसई स्टेशन पासून रिक्षा करून तुंगारेश्वर गेट पर्यंत जाता येते.

चंदेरी किल्ला, बदलापूर

मुंबई पासून सुमारे 60 किलोमीटर अंतरावर हा भव्य पर्वत शिखरांचा समुदाय 800 मीटर उंच आहे. समृद्धेने हिरवागार पालवी वेढलेला हा किल्ला त्याच्या टोकाशी पोहोचण्यासाठी सुमारे 2 ते 3 तास लागतात आणि तेथून बघितलेले दृश्य खरच खूप नयनरम्य असतं.
बदलापूर किंवा वांगणी स्टेशन पासून रिक्षेतून चिंचोली पर्यंत पोहोचणे. तिथून 45 मिनिटे चालत तुम्ही किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचाल. ट्रेकिंगसाठी जाताना आपल्याजवळ आवश्यक असलेल्या वस्तू म्हणजे जलरोधक ट्रेकिंग शुज, बळकट दोरी, टोपी/सनग्लासेस, कीटकनाशक, पाण्याची बाटली, कपडे, पेन चाकू, टॉर्च असणे आवश्यक आहे.

 

लेखिका - अस्मिता तांबे

स्त्रोत : महान्युज

अंतिम सुधारित : 5/21/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate