অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

क्रीडा प्रबोधिनी

राज्यात पुणे, कोल्हापूर, सांगली, ठाणे, अमरावती, अकोला, नाशिक, नागपूर, प्रवरानगर, औरंगाबाद, व गडचिरोली अशा ११ ठिकाणी क्रीडा प्रबोधिनी कार्यरत आहेत.

योजनेचा उद्देश:

महाराष्ट्रातून जास्तीत जास्त आंतरराष्ट्रीय व ऑलिम्पिक दर्जाचे खेळाडू घडवण्यासाठी राज्यातील प्रतिभावान खेळाडूंची निवड करून त्यांना शास्त्रोक्त प्रशिक्षण, संतुलित आहार व अद्ययावत क्रीडा सुविधा पुरवून त्यासाठी सुसंघटीत प्रयत्न करण्याच्या दृष्टीने व क्रीडा संस्कृती रुजविण्याच्या हेतूने सदर योजना राबविण्यात येत आहे.  क्रीडा प्रबोधिनी प्रवेश प्रक्रिया नियमात सुधारणा करण्यासाठी शासनाने तज्ज्ञांची समिती गठीत केलेली आहे. ८ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांची शारीरिक क्षमता आजमावून प्रवेश दिला जातो.प्रवेश दिला जातो.

क्रीडा प्रबोधिनी खेळ व ठिकाण:

राज्यात पुणे, कोल्हापूर, सांगली, ठाणे, अमरावती, अकोला, नाशिक, नागपूर, प्रवरानगर, औरंगाबाद, व गडचिरोली अशा ११ ठिकाणी क्रीडा प्रबोधिनी कार्यरत आहेत.

ज्युदो, जिम्नॅस्टिक्स, हॉकी, शुटींग, फुटबाल, जलतरण, डायव्हिंग, अॅथलेटिक्स, कुस्ती, बॅडमिंटन, आर्चरी, हॅन्डबॉल, टेबल टेनिस, वेटलिफ्टिंग व बॉक्सीग अशा १५ क्रीडा प्रकारात मार्गदर्शन केले जाते.

पुरवण्यात येणाऱ्या सुविधा:

प्रशिक्षणार्थीना विविध खेळांचे तज्ज्ञ क्रीडा मार्गदर्शकांकडून तंत्रशुद्ध प्रशिक्षण सकाळ व सायंकाळ अशा दोन सत्रात दिले जाते.

प्रशिक्षणार्थी खेळाडूंना निवास, भोजन, शिक्षण, खेळ, गणवेश याबाबतचा संपूर्ण खर्च शासनामार्फत केला जातो.

लाभार्थी:

क्रीडा प्रबोधिनीमध्ये एकूण ७७२ प्रशिक्षणार्थी (५७४ मुले व १८८ मुली) प्रशिक्षण घेत आहेत. अद्ययावत व्यायामशाळा विकास व कुस्ती, ज्युदो, कराटे, जिम्नॅस्टिक्स, अॅथलेटिक्स, वेटलिफ्टिंग व स्विमिंग खेळांचे अद्ययावत साहित्य अनुदान

 

माहिती संकलक : अतुल पगार

स्त्रोत : https://sports.maharashtra.gov.in/sportsmh/marathi/prabodhini_m.html

अंतिम सुधारित : 5/28/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate