অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मराठी विज्ञान परिषद

परिषदेविषयी

विज्ञान प्रसार - विज्ञान प्रसारक संस्था.

स्थापना : २४ एप्रिल, १९६६ रोजी मराठी विज्ञान परिषदेची मुंबईत स्थापना झाली.

नोंदणी : सोसायटी रजिस्ट्रेशन अॅक्ट: 1860 नुसार क्र.: BOM 81/66/GBBSD (दिनांक 12-8-1966) / बॉम्बे पब्लिक ट्रस्ट अॅक्ट: 1950 नुसार क्र.: F-1429/BOM (दिनांक 6-9-1966)

परिषदेला दिल्या जाणार्‍या देणग्या या कलम 80-जी नुसार आयकर सवलतीस पात्र आहेत.)

परिषदेची उद्दिष्टे



  • विज्ञानाचा प्रसार प्रामुख्याने मराठी भाषेतून करणे.
  • विज्ञान मांडण्यासाठी मराठी भाषा समृद्ध करणे.
  • विज्ञानाचे जीवनातले महत्त्व वाढवणे.
  • लोकांमध्ये वैज्ञानिक साक्षरता वाढवणे आणि वैज्ञानिक दृष्टी विकसित करणे.

ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी परिषद मध्यवर्तीद्वारे तसेच विविध विभागांद्वारे नानाविध उपक्रम करीत असते. शहरांमध्ये आणि खेडयांमध्ये, विद्यार्थ्यांत आणि नागरिकांमध्ये परिषद काम करते. परिषदेतर्फे अंध आणि मूकबधिरांसाठी विविध प्रकारचे उपक्रम राबविले जातात.

समाजातील सर्व व्यक्तींमध्ये विज्ञानाबद्दल जागरुकता आणि जाणीव निर्माण करणे, तसेच त्यांचा सहभाग कामामध्ये मिळवणे अशा रितीने परिषदेची कामे चालतात. परिषदेच्या मध्यवर्ती संस्थेचे विविध वर्गाचे मिळून साडेतीन हजारांहून अधिक सभासद आहेत. परिषदेचे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात मिळून 66 ठिकाणी तर महाराष्ट्राबाहेर वडोदरा, गोवा, भोपाळ व बेळगाव या 4 ठिकाणी विभाग आहेत. या विभागांमार्फत मध्यवर्ती कडून निर्देशित केलेले तसेच अनेक स्वतंत्र कार्यक्रम वर्षभर घेतले जातात.

पुरस्कार

मराठी विज्ञान परिषदेला फाय फाऊंडेशन, इचलकरंजी आणि विज्ञान तंत्रज्ञान विभाग, भारत सरकार यांच्याकडून उत्तम कार्यासाठी पुरस्कार मिळाले आहेत. डिसेंबर 1998 मध्ये मराठी विज्ञान परिषद पत्रिकेला महाराष्ट्र फाऊंडेशनचा वैचारिक मासिक म्हणून पुरस्कार मिळाला; महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार 2007 सालच्या पत्रिकेच्या दिवाळी अंकाला मिळाला; तसेच महाराष्ट्र राज्य, साहित्य आणि संस्कृती मंडळाचा ‘दिवाळी अंक शताब्दी वर्ष 2008’ चा द्वितीय पुरस्कारही मिळाला आहे.

परिषदेचे विभाग


परिषदेचे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात मिळून ७० ठिकाणी तर महाराष्ट्राबाहेर ४ ठिकाणी विभाग आहेत. या विभागांची यादी भौगोलिक विभागणीनुसार पुढीलप्रमाणे आहे.

मुंबई व कोकण


1) ईशान्य मुंबई, 2) ठाणे, 3) डोंबिवली, 4) अंबरनाथ, 5) चिंचणी-तारापूर, 6) बोर्डी, 7) रोहा, 8) रत्नागिरी, 9) नारिंग्रे, 10) नवी मुंबई, 11) पनवेल

पश्चिम महाराष्ट्र


1) लोणावळा, 2) तळेगाव, 3) पुणे, 4) बारामती, 5) अहमदनगर, 6) श्रीरामपूर, 7) संगमनेर, 8) कराड, 9) राजारामनगर, 10) सांगली, 11) कोल्हापूर, 12) गडहिंग्लज, 13) आजरा, 14) चंदगड, 15) बिद्री, 16) बार्शी, 17) सोलापूर, 18) सांगोला

उत्तर महाराष्ट्र


1) धुळे, 2) चाळिसगाव, 3) नंदुरबार, 4) खांडबारा, 5) साक्री, 6) नाशिक, 7) जळगांव

मराठवाडा


1) औरंगाबाद, 2) जालना, 3) उदगीर, 4) उमरगा, 5) नांदेड, 6) किनवट, 7) बीड, 8) हिंगोली, 9) उस्मानाबाद, 10) नळदुर्ग, 11) उमरी, 12) माजलगांव

विदर्भ


1) नागपूर, 2) वरोरा, 3) वणी, 4) अमरावती, 5) गडचिरोली, 6) अहेरी, 7) नवरगाव, 8) वाशिम, 9) अकोला, 10) मुर्तिजापूर, 11) बुलढाणा, 12) पारस, 13) पुसद, 14) उमरखेड, 15) भंडारा, 16) वडसा, 17) चंद्रपूर, 18) आर्वी, 19) आरमोरी, 20) मानोरा, 21) गोंदिया, 22) मालेगाव

महाराष्ट्राबाहेर


1) वडोदरा, 2) गोवा, 3) बेळगाव, 4) निप्पाणी

उपक्रम सर्वांसाठी

  • विज्ञान अधिवेशन 1966 सालापासून परिषदेतर्फे प्रत्येक वर्षी विज्ञान अधिवेशन घेण्यात येते. नामांकित मराठी भाषिक शास्त्रज्ञ या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून परिषदेतर्फे निवडले जातात. अधिवेशनाच्या अध्यक्षांचे भाषण हे या अधिवेशनांचे वैशिष्ठ्य मानले गेले आहे. वेगवेगळ्या विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या व्यक्ती/संस्था यांचा अधिवेशनात विशेष सन्मान करण्यात येतो.
  • व्यासपीठावरील दोन दिवसांच्या कार्यक्रमांत परिसवांद, व्याख्याने, कथा-कथन, शास्त्रज्ञांशी वार्तालाप, आदींचा समावेश असतो. अधिवेशनाला जोडून शैक्षणिक सहल आयोजित केली जाते. अधिवेशन हे परिषदेचे विभाग असलेल्या ठिकाणी आयोजित केले जाते. वर्धापन दिन परिषदेची स्थापना 24 एप्रिल 1966 रोजी झाली आहे. त्यानुसार दरवर्षी एप्रिल महिन्याच्या शेवटच्या रविवारी विज्ञान भवनांत परिषदेचा वर्धापन दिन विशेष पाहुण्यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात येतो. या वेळी परिषदेतर्फे देणाऱ्या विविध पुरस्करांचे वितरण केले जाते.
  • सौरऊर्जा वर्ग स्वरूपः सूर्यचूल तयार करण्याचे प्रशिक्षण अवधीः दोन दिवस (रोज 6 तास)
  • शहरी शेती स्वरूपः घरात निर्माण होणारा जैविक कचरा वापरून गच्ची किंवा सज्ज्यासारख्या छोट्या जागेत करता येणारी विविध प्रकारच्या भाज्या आणि फळांची लागवड अवधीः एक दिवस (3.5 तास) - दर महिन्याच्या पहिल्या रविवारी
  • व्याख्याने/व्याख्यानमाला परिषदेतर्फे विविध विषयांवर व्याख्याने/व्याख्यानमाला आयोजित केल्या जातात. सुर्यग्रहणासारख्या विशिष्ट घटनांशी निगडीत वा विशिष्ट माहिती सर्वत्र पोचवण्याच्या दृष्टीने ही व्याख्याने/व्याख्यानमाला विविध विभागांत आयोजित करण्यात येतात.
  • राष्ट्रीय विज्ञान दिन दिनांक 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून देशभर साजरा केला जातो. यानिमित्ताने परिषदेतर्फे फेब्रुवारी महिन्यात राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
  • मुरली चुगानी संदर्भालयःपूर्णपणे संगणकीकृत आणि फोटो कॉपिंगची सुविधा असलेले संदर्भालय परिषदेत आहे. या संदर्भालयात मराठी व इंग्रजी भाषेतील विज्ञान तंत्रज्ञानाच्या विविध शाखांतील सुमारे 4,500 पुस्तके उपलब्ध आहेत. यांत भारतीय सरिता कोश, कृषिज्ञान कोश व विश्वकोश यासारखे संदर्भ कोशांचाही समावेश आहे. संदर्भालयातील सुमारे साडेतिनशे पुस्तके ही दुर्मिळ स्वरूपाची आहेत. हे संदर्भालय मंगळवार ही परिषदेची साप्ताहिक सुटी वगळता रोज 11 ते 5 या वेळात उघडे असते. परिषदेच्या सभासदांना याचा लाभ मिळतो.
  • डॉ. रामभाऊ म्हसकर सी.डी. संग्रहालय बदलत्या काळानुसार परिषदेने सी.डी. संग्रहालय सुरू केले असून त्यात विविध वैज्ञानिक विषयांवरील सुमारे 300 सी.डी. उपलब्ध आहेत. या सी.डी. शुल्क भरून घरी नेता येतात. यातील बहुतांश सी.डी. या इंग्रजी भाषेतील असल्या तरी काही सी.डी. मराठी भाषेतही आहेत.
  • प्रदर्शनेः परिषदेच्या संदर्भालयात विविध विषयांवरची विविध प्रदर्शने उपलब्ध असून ती शाळांना व संस्थांना सशुल्क दिली जातात.
  • एड्स (दृकश्राव्य कार्यक्रम) स्वरूपः एडस्‌बद्दलची माहिती, शंका-समाधान (मुलां-मुलींसाठी स्वतंत्र वर्ग) स्तरः मुलींसाठी (नववी) आणि मुलांसाठी (नववीच्या पुढे) अवधीः सुमारे दीड तास
  • विज्ञान परिक्षा स्वरूपः पुस्तिका आणि प्रश्नपत्रिका टपालाद्वारे (उत्तरपत्रिका व इतर प्रकल्प अहवालाची टपालाद्वारे स्वीकार)स्तरः सातवी ते नववी (माध्यम - मराठी आणि इंग्रजी)नोंदणीः ऑगस्ट अखेरपर्यंत अवधीः उत्तरपत्रिका डिसेंबर अखेरीपर्यंत अपेक्षित अवधीः एक दिवस (एकूण 7 तास)
  • दहावी प्रयोग सराव वर्ग स्वरूपः प्रयोग प्रात्यक्षिक, शंका-निरसन स्तरः दहावी अवधीः एक दिवस (सुमारे 7 तास)
  • विज्ञान मित्र स्वरूपः विविध वैज्ञानिक तत्त्व, संकल्पनांची ओळख. अवधीः 7 दिवस (रोज 5 तास)
  • संकल्पना विकसन अभ्यासक्रम स्वरूपः शालेय अभ्यासक्रमातील वैज्ञानिक संकल्पनांची विविध माध्यमांद्वारे सर्वंकष पद्धतीने ओळख स्तरः पाचवी ते आठवी (प्रत्येक इयत्तेचा वेगळा गट) अवधीः वर्षभर (शनिवार - रविवार, अर्धवेळ)
  • वयांत येताना (दृकश्राव्य कार्यक्रम) स्वरूपः स्वतःच्या शरीराची ओळख, शंका-समाधान (मुलां-मुलींसाठी स्वतंत्र वर्ग) स्तरः मुलींसाठी (नववी) आणि मुलांसाठी (नववीच्या पुढे) अवधीः सुमारे दीड तास
  • एड्स (दृकश्राव्य कार्यक्रम) स्वरूपः एडस्‌बद्दलची माहिती, शंका-समाधान (मुलां-मुलींसाठी स्वतंत्र वर्ग) स्तरः मुलींसाठी (नववी) आणि मुलांसाठी (नववीच्या पुढे) अवधीः सुमारे दीड तास
  • विज्ञान मंडळं (पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून परिसराचा अभ्यास) स्वरूपः शास्त्रज्ञांची माहिती, विज्ञान कोडी, प्रात्यक्षिकं, (1 कि.मी. परिसराच्या फेरफटक्याचा समावेश) स्तरः सातवी ते नववी अवधीः वर्षभर (ठरावीक दिवशी)
  • बालविज्ञान संमेलन 1995 सालापासून विद्यार्थ्यांसाठी परिषदेतर्फे बालविज्ञान संमेलन आयोजित केले जाते. हे संमेलन दर तीन वर्षांतून एकदा राज्यपातळीवर तर दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणी तालुकापातळीवर घेतले जाते. यांत विद्यार्थ्यांचे प्रकल्प सादरीकरण आणि वेगवेगळ्या कृतीसत्रांचा समावेश असतो. या संमेलनांबरोबरच शैक्षणिक सहलींचेही आयोजन केले जाते. असद शालेय विद्यार्थ्यांसाठी
  • बालोद्यान वर्ग स्तरः इ. पहिली ते तिसरी स्वरूपः विविध प्रकारचे खेळ आणि प्रयोग अवधीः दोन किंवा तीन दिवस (एकूण 6 तास)
  • विज्ञान प्रयोग मेळावा स्वरूपः विविध प्रकारची प्रात्यक्षिकं स्तरः इ. सहावी ते नववी अवधीः एक दिवस (एकूण 3 ते 3.5 तास)
  • निरंतर विज्ञान कक्ष स्वरूपः विविध प्रकारची प्रात्यक्षिकं, चर्चा स्तरः इ. सहावी ते नववी अवधीः एक दिवस (एकूण 3 तास)
  • विज्ञान खेळणी स्वरूपः वैज्ञानिक खेळणी तयार करणे स्तरः (1) इ. तिसरी ते पांचवी आणि (2) इ. सहावी ते दहावी अवधीः (1) एक दिवस (6 तास) आणि (2) दोन दिवस (एकूण 12 तास)
  • विज्ञान सफर >स्वरूपः वैज्ञानिक चर्चा, खेळ, प्रयोग, इ. स्तरः सहावी ते दहावी अवधीः एक दिवस (एकूण 4 तास)
  • प्रयोग कार्यशाळा स्वरूपः विज्ञान विषयांतील विविध प्रात्यक्षिके आणि चर्चा स्तरः (1) पांचवी ते सांतवी आणि (2) आठवी ते नववी

 

माहिती संकलन - छाया निक्रड

अंतिम सुधारित : 8/27/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate