कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना देण्यात येणार्या शासकीय(खुल्या)गुणवत्ता शिष्यवृत्त्या | ||
---|---|---|
१.योजनेचे नाव व प्रस्तावना | कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना देण्यात येणार्या शासकीय (खुल्या)गुणवत्ता शिष्यवृत्त्या | |
२. योजना/कार्यक्रमाचे स्वरूप/माहिती व व्याप्ती | नवीन आकृतिबंधानुसार वर्ष १९७६-७७ पासून कनिष्ठ महाविद्यालयीन टप्पा अस्तित्वात आल्यापासून या स्तरावरील विद्यार्थ्यांना खुल्या गुणवत्ता शिष्यवृत्त्या देण्यात येतात .माध्यमिक शालान्त परीक्षेत कमीत कमी ६० टक्के गुण मिळविणार्या विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार ही शिष्यवृत्ती देण्यात येते.समाधानकारक प्रगती आणि कनिष्ठ महाविद्यालय पहिल्या वर्षाच्या (११ वी च्या ) अखेरीस घेण्यात येणार्या परीक्षेत किमान ४५ टक्के गुण मिळविणार्या विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्त्या इयत्ता १२ वी मध्ये पुढे चालू रहातात .शासन निर्णय,शालेय शिक्षण ,विभाग दिनांक १५ ऑक्टोंबर १९९६ अन्वये सदर शिष्यवृत्तीचे दर रुपये २५ ऐवजी दरमहा रुपये ५० याप्रमाणे सुधारले आहेत.त्याचप्रमाणे शिष्यवृत्तीच्या संचातही वाढ केलेली आहे.सन १९९८-९९ पासून या योजनेखाली एकूण ४८०० संच मंजूर आहेत. | |
३.योजनेचा उद्देश | विद्यार्थ्यास उच्च शिक्षण घेण्यास उत्तेजन मिळावे या उद्देशाने हि शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. | |
४. अंमलबजावणी यंत्रणा | विभागीय शिक्षण उपसंचालक यांचेमार्फत. |
अनु.क्र | इयत्ता | मंजूर संच | दर |
---|---|---|---|
१ | कनिष्ठ महाविद्यालयीन स्तर इयत्ता ११ वी १२ वी | ४८०० | रुपये ५०/-द.म दहा महिन्यासाठी |
माहिती संकलक : अतुल पगार
अंतिम सुधारित : 7/8/2020
डॉक्टर्स आणि नर्सेस एवढेच मनुष्यबळ गृहीत धरून स्वा...
साक्षरतेच्या राष्ट्रीय प्रमाणापेक्षा स्त्री साक्षर...
राष्ट्रीय संरक्षणासाठी ज्या जवानांनी लष्करी सेवा क...
2007 साली स्वातंत्र्यदिनी प्रधानमंत्र्यांनी केलेल्...