राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना | ||
---|---|---|
१. | सेवेचे नाव/ उपक्रम(विषय) . | राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना केंद्र पुरस्कृत असून शासकीय अनुदानित शाळेतील इयत्ता ८ वी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्याची परीक्षा घेऊन राज्यस्तरीय परीक्षेतून जिल्हानिहाय तयार केलेल्या गुणवत्ता यादीतून राज्याला ठरवून दिलेल्या कोट्यानुसार जिल्हानिहाय निवडलेल्या उमेदवारांची निवड यादी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत केली जाते.व शिष्यवृत्तीस निवड झालेल्या विदयार्थ्यांना इयत्ता ९ वी पासून इयत्ता १२ वी पर्यंत केंद्र शासनाकडून बँकेमार्फत शिष्यवृत्ती दिली जाते.विद्यार्थ्याला दरमहा रुपये ५०० प्रमाणे(वार्षिक रुपये ६०००/- )शिष्यवृत्ती मंजूर केली जाते. |
२. | त्याची आवश्यकता काय आहे | इयत्ता ८ वी च्या असलेल्या आर्थिकदृष्टया मागास विदयार्थ्यांमधून प्रज्ञावान विदयार्थ्यांचा शोध घेऊन बुद्धिवान विदयार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने त्यांना आर्थिक साहाय्य करावे या सहाय्यातून त्यांची बुद्धिमत्ता विकसित व्हावी,आणि त्या विकसित बुद्धिमत्तेने त्या विद्यार्थ्याने आपली विद्याशाखा व राष्ट्र यांची सेवा करावी हे या योजनेचे उद्धीष्ट आहे. |
३. | कोणत्या नियमानुसार कार्यवाही केली जाते | केंद्र शासनामार्फत सन २००७-०८ पासून सुरु करण्यात आली आहे .अखिल भारतीय पातळीवर शिष्यवृत्तीची संख्या एनसीईआरटी नवी दिल्ली यांनी निश्चित करून दिलेल्या कोट्यानुसार केली जाते.त्याला जिल्हानिहाय वैधानिक आरक्षण आहे. |
४. | कोणत्या कार्यालयाशी संपर्क करावा | शिक्षणाधिकारी(माध्यमिक)जिल्हा परिषद कार्यालय. |
५. | माहितीसाठी अर्ज कशाप्रकारे असावा | सदर शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षेच्या आधारे देण्यात येत असल्याने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने परीक्षेसंदर्भात प्रसिद्धी दिल्यानंतर त्यात नमूद केल्यानुसार शाळेमार्फत अर्ज करण्यात यावा. |
६. | अर्ज कोठे सादर करावा | शाळेमार्फत संबंधित जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी(माध्यमिक)जिल्हा परिषद कार्यालय. |
७. | सेवा मिळण्यास कालावधी | परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्याने बँकेच्या खात्याबाबतची माहिती सादर केल्यानंतर केंद्र शासनामार्फत शिष्यवृत्ती वितरीत करण्यात येते. |
८. | उपक्रमाची माहिती न मिळाल्यास तक्रार निवारणासाठी कोठे अर्ज करावा | परीक्षेसंदर्भात असल्यास शाळेकडून शिक्षणाधिकार्यामार्फत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचेशी संपर्क साधावा तसेच शिष्यवृत्तीबाबत असल्यास शाळेकडून संबंधित जिल्ह्याचे शिक्षणाधिकार्यामार्फत शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे. |
अ.क्र | विषयाचे नाव | एकूण गुण | एकूण प्रश्न | कालावधी | वेळ | पात्रता/गुण |
---|---|---|---|---|---|---|
१ | सामान्य बौद्धिक क्षमता चाचणी | १०० | १०० | ९० मिनिटे(अपंगासाठी ३० मिनिटे जादा) | ११.०० ते १२.३० | ४० |
२ | शालेय क्षमता चाचणी | १०० | १०० | ९० मिनिटे(अपंगासाठी ३० मिनिटे जादा) | १३.३० ते १५.०० | ४० |
माहिती संकलक : अतुल पगार
अंतिम सुधारित : 4/23/2020
2007 साली स्वातंत्र्यदिनी प्रधानमंत्र्यांनी केलेल्...
अकोल्यातील मुर्तीजापूर तालुक्याच्या निंभा गावातील ...
साक्षरतेच्या राष्ट्रीय प्रमाणापेक्षा स्त्री साक्षर...
राष्ट्रीय संरक्षणासाठी ज्या जवानांनी लष्करी सेवा क...