ग्रामीण भागातील हुशार (प्रज्ञवान) विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजना | ||
---|---|---|
१ | सेवेचे नाव किंवा उपक्रम (विषय) | ग्रामीण भागातील हुशार (प्रज्ञावन) विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत घेण्यात येणार्या स्पर्धा परीक्षेच्या आधारे माध्यमिक स्तरावर घेण्यात येणार्या इयत्ता ७ वी परीक्षेवर गुणवत्तेनुसार इयत्ता ८ वी ते १२ वी पर्यंत शिष्यवृत्ती दिली जाते. |
२ | त्याची आवश्यकता काय ? | ग्रामीण भागातील हुशार व पात्र विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणास प्रोत्साहन देण्यासाठी शिष्यवृत्ती देण्यात येते. |
३ | कोणत्या नियमानुसार कार्यवाही केली जाते ? | शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्रमांक सदर शिष्यवृत्तीसाठी इयत्ता ८ वी ते १० वी द.म.३० रुपये इयत्ता ११ वी १२ वी साठी रुपये द.म.६० दहा महिन्यासाठी दिली जाते.शासन निर्णय दिनांक २२/७/२०१० नुसार सन २००९-१० या शैक्षणिक वर्षात शिष्यवृत्ती पात्र लाभार्थ्यांना बँकेमार्फत शिष्यवृत्ती अदा करण्यात येत आहे. |
४ | कोणत्या कार्यालयाशी संपर्क करावा ? | मुख्यध्यापकांमार्फत शिक्षणाधिकारी (माध्यमिक ) जिल्हा परिषद कार्यालय |
५ | माहितीसाठी अर्ज - किती प्रती ,कोणाकडे,किती कागदपत्रे जोडावे | आवश्यक असलेल्या माहितीबाबतची नोंद व सविस्तर तपशील अर्जात करणे आवश्यक आहे. |
६ | अर्ज कोठे सादर करावा? | सबंधित जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी (माध्यमिक ) जिल्हा परिषद कार्यालय |
७ | सेवा मिळण्यास कालावधी ? | अनुदान उपलब्धतेनुसार |
८ | उपक्रमाची माहिती न मिळाल्यास तक्रार निवारणासाठी कोठे अर्ज करावा ? | सबंधित जिल्ह्याचे विभागीय शिक्षण उपसंचालक अथवा शिक्षण संचालनालय,माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य, पुणे -१ |
माहिती संकलक : अतुल पगार
स्त्रोत :
अंतिम सुधारित : 4/22/2020
अकोल्यातील मुर्तीजापूर तालुक्याच्या निंभा गावातील ...
राष्ट्रीय संरक्षणासाठी ज्या जवानांनी लष्करी सेवा क...
2007 साली स्वातंत्र्यदिनी प्रधानमंत्र्यांनी केलेल्...
साक्षरतेच्या राष्ट्रीय प्रमाणापेक्षा स्त्री साक्षर...