पूर्व माध्यमिक व माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांसाठी खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती | ||
---|---|---|
१ | सेवेचे नाव किंवा उपक्रम(विषय) | पूर्व माध्यमिक व माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांसाठी खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,पुणे यांच्या मार्फत घेण्यात येणार्या पूर्व माध्यमिक इयत्ता ४ थी च्या स्पर्धा परीक्षेच्या आधारे इयत्ता ५ वी ते ७ वी व माध्यमिक स्तरावर इयत्ता ७ वी च्या स्पर्धा परीक्षेच्या आधारे इयत्ता ८ वी ते १० वी पर्यंत गुणवत्तेनुसार शिष्यवृत्ती दिली जाते. |
२ | त्याची आवश्यकता काय? | गुणवान विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणास प्रोत्साहन देण्यासाठी पूर्व माध्यमिक व माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते. |
३ | कोणत्या नियमानुसार कार्यवाही केली जाते? | शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्रमांक एससीएच -२००९ /(९०/०९) केंपुयो दिनांक २२/७/२०१० नुसार पूर्व माध्यमिक स्तरावर दर रुपये १०० द.म.(दहा महिण्यासाठी)व माध्यमिक स्तरावर दर रुपये १५० द.म.(दहा महिण्यासाठी)सदर शासन निर्णयानुसार सन २००९-१० या शैक्षणिक वर्षात शिष्यवृत्ती पात्र लाभार्थ्यांना बँकेमार्फत शिष्यवृत्ती अदा करण्यात येते. |
४ | कोणत्या कार्यालयाशी संपर्क करावा? | शिक्षणाधिकारी (प्राथमिक /माध्यमिक)जिल्हा परिषद कार्यालय |
५ | माहितीसाठी अर्ज-किती प्रती,कोणाकडे,किती कागदपत्रे जोडावीत | आवश्यक असलेल्या माहितीबाबतची नोंद व सविस्तर तपशिल अर्जात करणे आवश्यक आहे.सबंधित शाळेच्या मुख्याध्यापकां मार्फत शि.अ.(माध्य.)जि.प. यांचेकडे |
६ | अर्ज कोठे सादर करावा? | सबंधित शाळेच्या मुख्याध्यापकां मार्फत सबंधित जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) जिल्हा परिषद कार्यालय |
७ | सेवा मिळण्यास कालावधी ? | अनुदान उपलब्धतेनुसार |
८ | उपक्रमाची माहिती न मिळाल्यास तक्रार निवारणासाठी कोठे अर्ज करावा ? | सबंधित जिल्ह्याचे विभागीय शिक्षण उपसंचालक अथवा शिक्षण संचालनालय (माध्यमिक व उच्च माध्यमिक )महाराष्ट्र राज्य पुणे -१ |
माहिती संकलक : अतुल पगार
अंतिम सुधारित : 6/21/2020
2007 साली स्वातंत्र्यदिनी प्रधानमंत्र्यांनी केलेल्...
अकोल्यातील मुर्तीजापूर तालुक्याच्या निंभा गावातील ...
राष्ट्रीय संरक्षणासाठी ज्या जवानांनी लष्करी सेवा क...
साक्षरतेच्या राष्ट्रीय प्रमाणापेक्षा स्त्री साक्षर...