निरनिराळ्या कामधंद्यांमुळे वेगवेगळ्या प्रकारचे धोके आणि आजार संभवतात. त्यांची पुढीलप्रमाणे एक यादी करता येईल.
इजा किंवा शारीरिक तणाव यांमुळे दुष्परिणाम (भौतिक घटकांचे दुष्परिणाम)
काम करताना हातोडयाचा किंवा कु-हाडीचा घाव बसणे, पडणे, लागणे वगैरे अपघात तर अनेक वेळा होतात. अशा प्रत्यक्ष माराऐवजी अप्रत्यक्ष शारीरिक ताणाचाही त्रास असतो. टाइपिंग करणा-याला होणारा बोटांचा व पाठीचा त्रास, शेतात काम करणा-या स्त्रियांना होणारी कंबरदुखी, वाहतूक-नियंत्रक पोलिसांना होणारा पायांचा त्रास वगैरे बरीच उदाहरणे आहेत.
याशिवाय उष्णता, गारठा, किरणोत्सर्ग,हवेचा दाह, ध्वनिप्रदूषण-गोंगाट, सतत कंपन सहन करणे, विद्युत धक्के इ. हे सर्व इजांचे प्रकार आहेत.
गिरणीमध्ये श्वासावाटे पीठ शरीरात जाणे,कापड गिरणीत कापसाचे जंतू फुप्फुसात जाणे, हळदीच्या कामगारांना हळद धुळीचा श्वसनात त्रास होणे,खडी कारखान्यात सिलिकॉसिसचा त्रास, इ.
व्यवसायजन्य परिस्थितीत काही घटक ताबडतोब परिणाम करणारे असतात (ऍसिड अंगावर उडणे,विषारी वायू फुप्फुसात जाणे). याउलट काही रसायने शरीरावर हळूहळू परिणाम करतात. उदा. फॉस्फरस.
प्राणी, जीवजंतूंपासूनचे धोके साप,विंचू, कुत्रे यांचे दंश, गाईगुरांपासून होणा-या जखमा, जंतकृमी,लिंगसांसर्गिक आजार हे सर्व या गटात मोडतात.
कामाच्या ठिकाणी मानसिक ताणतणाव सतत राहिल्याने कायमस्वरूपी विकार जडू शकतात. व्यसनांचे मूळही यात असू शकते. अपघाताचा धोका असलेल्या कामांतही मनावर मानसिक ताण असतो (उदा. वाहनचालक)
अनेक क्षेत्रांत निरनिराळे व्यवसायजन्य आजार असतात. यांतल्या काहींची दखल घेतली जाते पण बहुतेकांकडे दुर्लक्ष होते. अर्थव्यवस्थेचा भाग म्हणून हे स्वीकारावे लागते. तरी जेथे जमेल तेथे व्यवसायजन्य आजार-धोके कमी करणे किंवा टाळणे यासाठी चांगले प्रयत्न हवेत. याबद्दल काय काय करता येते हे पुढे दिले आहे.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्याविद्या
अंतिम सुधारित : 10/7/2020
कुशल व्यवस्थापन, तरुण नेतृत्व, प्रभावी योजना यामधू...
मनीषा व देवनाथ जाधव या दांपत्याने तुती लागवड आणि र...
कपाशीत सापळा पीक म्हणून वापर होणाऱ्या अंबाडी पिकाप...
वर्धा येथील अभियंता विनोद राजगुरे हीच अंबाडी शेतकऱ...