प्रत्यक्ष आरोग्यशिक्षण करताना ब-याच अडचणी येतात. त्यापैकी नेहमी येणा-या अडचणी अशा असू शकतात.
या गोष्टी काही अंशी ख-या आहेत. पण आपणही त्यातून काही मार्ग शोधायला पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे आपल्या सोयीची वेळ ही लोकांच्या सोयीची असेल तरच ते वेळ देतील आणि ऐकून घेतील. त्यांच्या गडबडीच्या वेळात ते ऐकून घेण्याची शक्यता कमी. जेव्हा उभयपक्षी मोकळीक असेल तेव्हाच हे काम होऊ शकते. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या समोरच्या खरोखरच्या अडचणीत तुम्ही काही मदत करीत असाल, धावून जात असाल तरच ते इतरही बाबतीत तुमचे ऐकतील. समजा त्यांच्यापुढे आता दुष्काळाचा, पाणी नसल्याचा प्रश्न आहे, आणि तुम्ही शोषखड्डयांबद्दल बोलायला गेलात तर कोण ऐकेल? कदाचित ते ऐकतीलही पण फारसे लक्ष देणार नाहीत. यावेळी पाण्याबद्दलच काहीतरी केले पाहिजे. आरोग्य सोडून बरेच प्रश्न त्यांना जाचत असतात, तेही महत्त्वाचे असतात. अशा वेळी अलिप्तपणे वागू नका, योग्य वेळी त्यात भाग घ्या आणि प्रामाणिकपणे त्यात मदत करा. तुमचा विषय थोडा बाजूला राहिला तरी चालेल. तुम्हांला त्यांनी आरोग्याचा मित्र-भारतवैद्य म्हणून मनाने स्वीकारले असेल तर तुमचे काम सोपे होईल. हा विश्वास मिळवावा लागेल. एकदा असे स्वीकारल्यावर तुमची टीका पण ते मानतील. अजून हे नाते निर्माण झाले नसले तर मात्र शक्यतो टीका किंवा लागेल असे शब्द बोलू नका. आरोग्यशिक्षण हे थोडे अवघड व्रत आहे. आपल्या जुन्या परंपरेप्रमाणे 'उतू नको, मातू नको, घेतला वसा टाकू नको' हाच मंत्र उपयोगी पडेल.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर
संदर्भ : आरोग्यविद्या
अंतिम सुधारित : 10/7/2020
कोठल्याही विषयावर/समस्येवर आरोग्यशिक्षण करायचे असल...
निकोप शरीरसंवर्धनासाठी विद्यार्थांना जे शिक्षण दिल...
आरोग्यकारक विचारांचा,सवयींचा समाजात प्रसार व्हावा ...
निरनिराळया देशांत समाजाच्या आरोग्यमानात काय फरक पड...