या आजाराचे नेमके कारण माहीत नाही. यामध्ये आतून तपासल्यावर गर्भाशयाच्या तोंडाचा भाग खरबरीत लालसर व सुजलेला दिसतो. हे दुखणे खूप स्त्रियांमध्ये आढळते. हे आजार दुर्लक्षित राहिले तर त्यातून कर्करोग होण्याची शक्यता असते.
या आजाराबरोबर जंतुदोष होऊन योनिदाह होऊ शकतो. यामुळे खाज,पाणी जाणे (स्राव), इत्यादी लक्षणे येतात. तसेच हा जंतुदोष आत पसरून ओटीपोटात (गर्भाशय व भोवतालचे अवयव) सूज येण्याची शक्यता असते. त्यामुळे कंबरदुखी, वरचेवर बारीक ताप येणे, लैंगिक संबंधाच्या वेळी पोटात दुखणे, पांढरा स्राव, पाळीचे वेळी खूप पोटदुखी, इत्यादी लक्षणे आढळतात.
जास्त त्रास होत असेल तर डॉक्टरांकडे पाठवावे. कॉटरीच्या (एक विद्युत उपकरण) साहाय्याने मांसल भाग 'जाळणे' हा यावर चांगला उपाय आहे. पण सर्वच स्त्रियांना याचा उपयोग होत नाही. आता यावर लेझर, क्रायो, इ. नवीन तंत्राने उपचार केला जातो. काही स्त्रियांच्या बाबतीत या अवयवाचा काही भाग शस्त्रक्रियेने छाटावा लागतो. उपचारानंतर 4-6आठवडयाने हा भाग बरा होतो.
आयुर्वेदिक टिपणात सांगितल्याप्रमाणे 'योनिधावन' इत्यादींचे उपाय करून पाहावेत.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्याविद्या
अंतिम सुधारित : 10/7/2020
अंड्यांचे निषेचन (फलन) ज्यांच्या शरीराच्या आत होते...
गर्भाशयात अनेक प्रकारच्या गाठी येऊ शकतात.
गर्भाशय बाहेर पडणे म्हणजेच अंग बाहेर पडणे. ही तक्र...
गर्भाशयातून ठराविक काळानंतर योनिमार्गे जो रक्तस्रा...