लिन्लिथगो, लॉर्ड व्हिक्टर अलेक्झांडर जॉन होप
लिन्लिथगो, लॉर्ड व्हिक्टर अलेक्झांडर जॉन होप : (२४ सप्टेंबर १८८७-५ जानेवारी १९५२). दुसऱ्या महायुद्ध काळातील ब्रिटिशांकित हिंदुस्थानचा गव्हर्नर जनरल व व्हाइसरॉय (१९३६-४३). त्यांचा जन्म खानदानी घराण्यात ॲबरकॉर्न (पश्चिम लोथिअन-स्कॉटलंड) येथे झाला.