घायपात
घायपात : अनेक मोठ्या, लांब, जाडजूड व काटेरी पानांची गुच्छासारखी ही बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारी) ⇨ओषधी मूळची मेक्सिकोतील आणि अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील दक्षिणेकडील संस्थानांतील असून दक्षिण यूरोप, आफ्रिका, वेस्ट इंडीज, ईस्ट इंडीज, मध्य अमेरिका, हवाई, भारत, श्रीलंका या देशांत तिचा प्रसार झाला आहे.