डाल्मेशिया
डाल्मेशिया : पूर्व यूरोपातील यूगोस्लाव्हियाच्या एड्रिॲटिक समुद्रकिनारपट्टीचा चिंचोळा भाग. लोकवस्ती सु. ५,००,००० (१९७१). यात किनारपट्टीचा मध्यभाग व एड्रिॲटिक समुद्रातील ब्राच, क्व्हार, पाक, कॉर्चूला, राप, मल्येट, व्हीस, डूगी ऑटॉक वगैरे सु. ३०० बेटांचा समावेश होतो.