अश्रुग्रंथी ( Lachrymal glands )
मनुष्याच्या डोळ्याच्या वरच्या पापणीत वसलेली अश्रू तयार करणारी ग्रंथी. बदामाच्या आकाराची ही ग्रंथी सतत अश्रू तयार करून ६ ते १२ नलिकांवाटे वरच्या पापणीच्या श्लेष्म त्वचेवर पसरवते. हे अश्रू डोळ्याच्या पुढच्या भागावर पसरतात व डोळ्यांच्या नाकाजवळच्या भागातील दोन छिद्रांकडे जातात.