छोटा नागपूर
छोटा नागपूर : पूर्व भारतातील एक पठारी प्रदेश व बिहार राज्याचा एक प्रमुख विभाग. बिहारचा दक्षिणेकडील डोंगराळ भाग धरून प्रामुख्याने यात पालामाऊ, हजारीबाग, धनबाद, रांची, मानभूम आणि सिंगभूम या जिल्ह्यांचा समावेश होत असून रांची हे मुख्य ठिकाण आहे. या विभागाचा आकार आयताकृती असून क्षेत्रफळ सु. ६५,४४२ चौ. किमी. आहे. यापैकी सु. ३६% प्रदेश जंगलव्याप्त आहे.