जोसेफ, दुसरा
जोसेफ, दुसरा : (१३ मार्च १७४१–२० फेब्रुवारी १७९०). पवित्र रोमन साम्राज्याचा १७६५–९० दरम्यानचा सम्राट आणि ऑस्ट्रियाचा राजा. ऑस्ट्रियन सम्राज्ञी माराया टेरिसाचा मुलगा. व्हिएन्ना येथे जन्म. प्रथम १७६५ ते १७८० ह्या काळात त्याने आपल्या आईबरोबर राज्य केले.