आंतरदेहगुही संघ ( Coelenterata )
अपृष्ठवंशी प्राण्यांचा एक संघ. या संघात सु. ९,००० जाती आहेत. हे प्राणी बहुपेशीय आणि द्विस्तरी असतात. त्यांचे शरीर पेशींच्या बाह्यस्तर आणि अंत:स्तर यांनी बनलेले असते. शरीरामध्ये जठरवाहिनीगुहा अथवा आंतरगुहा अथवा आंतरदेहगुहा असते. ही गुहा म्हणजे पोकळी.