ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
Login
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
भारत – नद्या सरोवर समुद्र बंदरे
या विभागात भारतातील नद्या, सरोवर, समुद्र, व बंदरे यांची माहिती देण्यात आली आहे.
जागतिक - बंदरे व आखात
या विभागात जगातील विविध बंदरे व आखते यांची माहिती देण्यात आली आहे.
खुले बंदर व खुला प्रदेश
खुले बंदर व खुला प्रदेश या ठिकाणी परदेशातून आयात केलेला माल जकात न भरता उतरविता येतो व मालाचे संस्करण आणि उत्पादन करून पक्का माल जकात न भरता परदेशास निर्यात करता येतो.
मिऱ्या बंदर
मिऱ्या बंदर : (भगवती बंदर). महाराष्ट्राच्या रत्नागिरी जिल्ह्यातील बंदर. ते रत्नागिरीजवळ असून तेथील भगवती मंदिरावरून त्यास भगवती बंदर असे नाव देण्यात आले आहे. रत्नागिरीचा किल्ला असलेला, समुद्रात घुसलेला सु. ८० मी. उंचीचा भूभाग व त्याच्या उत्तरेचा सु. ४ किमी. अंतरावरील, तसाच समुद्रात घुसलेला सु. १४५ मी. उंचीचा मिऱ्या डोंगर यांच्या दरम्यानचा सागरी भाग मिऱ्या उपसागर (मिऱ्या बे) होय.
सिरिमाओ बंदरनायके
श्रीलंकेच्या पंतप्रधान (१९६०-६५ व १९७०-७७) आणि मुत्सद्दी. जगातील पहिल्या स्त्री पंतप्रधान होण्याचा मान त्यांना मिळाला.
दरबान
दरबान : दक्षिण आफ्रिकेतील नाताळ प्रांताची राजधानी व हिंदी महासागरावरील एक महत्त्वाचे बंदर. लोकसंख्या ७,२९,८५७ (१९७०). नाताळ प्रांतातील सर्वांत मोठे व दक्षिण आफ्रिकेतील तिसऱ्या क्रमांकाचे शहर.
नागोया
नागोया : (चुक्यो). जपानचे एक प्रमुख औद्योगिक शहर व बंदर व आयची जिल्ह्याची राजधानी. लोकसंख्या २०,७९,६९४ (१९७५ अंदाज). हे होन्शू बेटावर ईसे उपसागराच्या उत्तरेस टोकिओच्या नैर्ऋत्येस २६० किमी. व ओसाकाच्या ईशान्येस १४४ किमी. वर टोकैडो या प्रमुख महामार्गावर आहे.
सुएझ
सुएझ : ईजिप्तमधील एक महत्त्वाचे औद्योगिक शहर व बंदर. लोकसंख्या ४,८८,१२५ (२०११). हे कैरोच्या पूर्वेस १३० किमी. वर सुएझ कालव्याच्या दक्षिण प्रवेशद्वाराजवळ वसलेले आहे. बुर इब्राहिम आणि बुर तौफिक ही दोन बंदरे आणि पूर्वेकडील वाळवंट मिळून हा एक ॲस सुएझस ( महकजह ) नावाचा राखीव सरसुभा आहे.
नागोया
जपानचे एक प्रमुख औद्योगिक शहर व बंदर व आयची जिल्ह्याची राजधानी.
फॉल रिव्हर
फॉल रिव्हर : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील मॅसॅचूसेट्स राज्याच्या ब्रिस्टल प्रांताची राजधानी व बंदर. लोकसंख्या ९६,६९८; महानगरीय लोकसंख्या १,४९,९७६ (१९७०). हे बॉस्टनच्या दक्षिणेस सु. ८० किमी.वर मौंट होप उपसागरावर टाँटन नदीमुखापाशी वसले आहे.
पालें बांग
पालें बांग : इंडोनेशियाच्या सुमात्रा बेटावरील द. सुमात्रा प्रांताची राजधानी व नदीबंदर. लोकसंख्या ५,८३,००० (१९७१). हे सुसी नदीच्या दोन्ही तीरांवर वसलेले आहे. हे लोहमार्गाने तलुक्बटुंगशी, तर रस्त्यांनी इतर मोठ्या शहरांशी जोडलेले असून येथे विमानतळही आहे.
बेडी
बेडी : गुजरात राज्यातील कच्छच्या आखातावरील वर्षभर खुले राहणारे बंदर. लोकसंख्या १३,३२४ (१९८१). हे जामनगरच्या वायव्येस ८ किमी. असून सडकेने व मीटर मापी लोहमार्गाने जामनगरशी जोडलेले आहे.
योकोहामा
योकोहामा : जपानमधील प्रसिद्ध औद्योगिक शहर व बंदर. टोकिओ उपसागराच्या पश्चिम किनाऱ्यावर होन्शू बेटावर,टोकिओच्या नैऋत्येस सु. ३० किमी.वर ते वसले आहे. लोकसंख्या २७,७३,८२२ (१९८१). लोकसंख्येच्या दृष्टीने ते जपानचे चौथ्या क्रमांकाचे शहर असून कानागावा विभागाची येथे राजधानी आहे. योकोहामा व कावासाकी या दोन शहरांमुळे औद्योगिक संकुलनिर्माण झाले आहे.
कानो
कानो : उत्तर नायजेरियातील प्रमुख व्यापारी शहर. लोकसंख्या ३,५७,०९८ (१९७१ अंदाज). राजधानी लागोस या बंदरापासून हे ८८० किमी. ईशान्येस असून मूळच्या सात हौसा राज्यांपैकी एक आहे. या तटबंदी शहरात हौसा, बिगर हौसा व बिगरअफ्रिकी लोकांचे स्पष्ट वेगळे विभाग असून व्यापारी विभागही वेगळा आहे.
फॉर्तालेझा
फॉर्तालेझा : दक्षिण अमेरिकेतील ब्राझील देशाच्या सीआरा राज्याची राजधानी व अटलांटिक महासागरावरील बंदर. लोकसंख्या ११,०९,८३७ (१९७५ अंदाज). हे पाहेयू नदीच्या दोन्ही तीरांवर वसले असून येथील किनारा दंतुर व चंद्रकोरीच्या आकाराचा आहे.
English to Hindi Transliterate