रस्पूट्यिन, ग्रिगॉऱ्यई यिफ्यीमव्ह्यिच
रस्पूट्यिन, ग्रिगॉऱ्यई यिफ्यीमव्ह्यिच : (७ जुलै १८७२−३१ डिसेंबर १९१६). रशियन लब्धप्रतिष्ठित साधू व झार राजदंपतीचा घनिष्ठ मित्र. त्याचे मूळ नाव ग्रिगॉऱ्यई यिफ्यीमव्ह्यिच न्योव्हख; पण त्याच्या भ्रष्ट जीवनामुळे रस्पूट्यिन (बदफैली) हे नाव त्यास प्राप्त झाले.