रेवा संस्थान
रेवा संस्थान : ब्रिटिशांकित हिंदुस्थानातील मध्य भारतातील एक भूतपूर्व मोठे संस्थान. कैमूर टेकड्यांमुळे नैसर्गिक दृष्ट्या संस्थानचे दोन भाग झाले होते. क्षेत्रफळ ३३,२८० चौ.किमी. लोकसंख्या सु. १८,२०,४४५ (१९४१). जहागीरदारांच्या उत्पन्नासह वार्षिक उत्पन्न सुमारे सव्वा कोटी रूपये.