অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

ऊर्जेचे उत्पादन

ऊर्जेचे उत्पादन

  • अणुकेंद्रीय परिचालन
  • अणुकेंद्रीय परिचालन : पेट्रोल, डीझेल तेल अथवा कोळसा यांसारखी इंधने जाळून निर्माण होणाऱ्या उष्णतेच्या साहाय्याने वाहनांना गती देता येते हे सर्वांच्या परिचयाचे आहे. अणुभंजन (अणुकेंद्र फुटणे) विक्रियेमध्येही उष्णता निर्माण होत असल्यामुळे याही उष्णतेचा वाहनांना गती देण्यास उपयोग करणे म्हणजे परिचालन तत्त्वत: शक्य आहे. उदा., अणुकेंद्रीय शक्तीवर मोटारी, आगगाड्या, आगबोटी आणि विमाने चालवणे.

  • उर्जा निर्मिती : जैव पदार्थापासून ११ के.व्ही.ऐ. विद्दुत निर्मिती प्रकल्प
  • जैव पदार्थापासून विद्दुत निर्मिती या प्रकल्पात ११ के.व्ही.ऐ. क्षमतेचे डाऊनड्राफ्ट पद्धतीचे गेंसीफायर वापरण्यात आलेले आहे. तसेच वेडीबाभूळ हि झुडूपसदृश्य वनस्पती बहुतांश ठिकाणी वाढलेली दिसून येते.

  • कमी पाणी वापरून जैववायू निर्मिती
  • पुनःनिर्मितीय (नवीकरण) उर्जा स्त्रोतावर आधारित अखिल भारतीय समन्वयक प्रकल्प, अकोला केंद्र येथे पाण्याचा कमी वापर करून जैववायू निर्मितीसाठी संयत्र विकसित करण्यात आले.

  • पवनचक्की
  • पवनचक्की : पृथ्वीच्या वातावरणामधील वाऱ्‍याच्या रूपातील गतिज ऊर्जेचा यांत्रिक ऊर्जा मिळविण्यासाठी उपयोग करणारे साधन. मानवाने यांत्रिक ऊर्जा मिळविण्याकरिता योजिलेल्या साधनांपैकी पवनचक्की हे एक मूलभूत साधन मानण्यात येते.

  • प्रदूषणविरहित इंधनासाठी बायोगॅस
  • बायोगॅस एक स्वस्त व प्रदूषणविरहित इंधन आहे. बायोगॅस सयंत्रापासून गॅस आणि उत्तम खताच्या स्वरूपात दुहेरी फायदा होतो.

  • बगॅस - सहवीजनिर्मिती
  • बगॅस म्हणजे उसाच्या चिपाडावर आधारित सहवीजनिर्मिती. देशातील सध्या चालू असलेल्या साखर कारखान्यांतून सुमारे ३५०० मेगावॅटइतकी सहवीजनिर्मिती होऊ शकते.

  • बायोगॅस आणि तो भरण्याचे (बॉटलिंग) तंत्रज्ञान – एक पथदर्शी प्रकल्प
  • गाझियाबाद जिल्ह्यातल्या करेरा खेड्यामध्ये श्रीकृष्ण गोशाळा आहे. तेथे दिल्लीच्या भारत सरकारच्या नवीन व पुनर्वापरयोग्य ऊर्जा मंत्रालयातर्फे, IIT च्या सहकार्याने, एक पथदर्शी प्रकल्प चालवला जात आहे.

  • बायोगॅस उभारणीबाबत माहिती द्यावी
  • बांधकामाच्या रचनेवरून तरंगती गॅस टाकी संयंत्र आणि स्थिर घुमट संयंत्र असे बायोगॅसचे प्रकार आहेत.

  • बायोमासपासून वीजनिर्मिती
  • जवळजवळ १५० ते २०० दशलक्ष टन बायोमासचा फारसा काही उपयोग केला जात नाही. त्यामुळे अगदी कमी खर्चात ह्या बायोमासचा वेगळा वापर करता येईल. बायोमासपासून सुमारे 100 000 मेगावॅट वीज तयार करता येईल.

  • वाफ
  • वाफ : समुद्रसपाटीला पाणी १०००से. तापमानाला उकळू लागते व त्याचे रूपांतर तप्त वायूत होते, त्याला वाफ म्हणतात. १००० से. हा पाण्याचा उकळबिंदू होय. उकळत्या पाण्याच्या उष्णतेइतकी वाफेची उष्णता असते. दुसऱ्या प्रकारे पाण्याचे रूपांतर वायूत होते. एका परातीत पाणी भरून ते वातावरणात उघडे ठेवले की, पृष्ठभागावरच्या पाण्याचे रूपांतर वायूत होते; परंतु हा वायू तप्त नसतो, या क्रियेस बाष्पीभवन व अशा वायूस बाष्प असे म्हणतात.

  • वायु टरबाइन
  • वायु टरबाइन : इंधनाच्या ज्वलनामुळे उत्पन्न होणाऱ्या ऊर्जेचे वायू ह्या कार्यद्रायूच्या मदतीने कार्यशक्तीत रूपांतर करणाऱ्या यंत्राला वायू टरबाइन म्हणतात. यातून मिळणारी कार्यशक्ती (यांत्रिक ऊर्जा) साधारणपणे परिभ्रमी (स्वतःभोवती फिरणाऱ्या) दंडाद्वारे प्रत्यक्ष वापरली जाते. वायू टरबाइन हे अंतर्ज्वलन एंजिन (एंजिनाच्या आतच इंधन जाळण्याची व्यवस्था असलेले एंजिन) आहे.

  • वारे
  • वारे : भूपृष्ठाच्या संदर्भात सरकणाऱ्या हवेस वारा किंवा हवेचा प्रवाह असे संबोधिले जाते. साधारणपणे वातावरणात ऊर्ध्व (उभ्या) दिशेतील प्रवाह अतिमंद असतात. त्यामुळे वातावरणातील क्षैतिज किंवा आडव्या दिशेतील प्रवाहास वारा असे समजले जाते. पृथ्वीवरील असमान तापमानामुळे हवेचा असमान दाब निर्माण होतो आणि असमान दाबामुळे पृथ्वीपृष्ठावर आणि निरनिराळ्या उंचींवर वारा निर्माण होतो.

  • वार्‍यापासून वीजनिर्मिती
  • वार्‍यापासून वीजनिर्मिती उर्फ पवनऊर्जा. सबंध जगातच वार्‍यापासून वीजनिर्मिती करण्याला विलक्षण महत्व आले आहे.

    © C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
    English to Hindi Transliterate