অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

बायोमास चारकोल ब्रिकेटिंग

आपल्याकडील खेड्यांमध्ये पिकाची कापणी झाल्यानंतर शेतीशी संबंधित अनेक प्रकारच्या वस्तू शिल्लक राहतात. विशेष उपयोगी नसलेल्या गोष्टी आपण उघड्यावर जाळून टाकतो. परंतु कोळसा (चारकोल) ब्रिकेटिंग तंत्रज्ञानाचा वापर करून ह्याच जैववस्तूंपासून (बायोमास) पर्यावरणासंवादी व फायदेशीर पर्यायी इंधन तयार करता येते. ह्यामधून एखाद्या कुटुंबास उत्पन्नाचे साधनही मिळू शकते.

ब्रिकेटिंग म्हणजे काय?


कमी घनतेच्या जैववस्तूचे रूपांतर उच्च घनतेच्या व ऊर्जायुक्त इंधन-विटांमध्ये करण्याची प्रक्रिया म्हणजे ब्रिकेटिंग.

कामाची पद्धत

  • लोणारी कोळसा (चारकोल) बनवण्याच्या दोन पद्धती आहेत.
  1. थेट पद्धत - ह्यामध्ये सेंद्रीय पदार्थ तापवतात व त्यांच्या अर्धवट जळण्याद्वारे लोणारी कोळसा तयार होतो.
  2. अप्रत्यक्ष पद्धत - हवेचा संपर्क होणार नाही परंतु वायुविजन राहील अशा बंद मोठ्या डब्यामध्ये सेंद्रीय पदार्थ ठेऊन त्यांस उष्णतेच्या एका बाहेरील स्रोताने तापवले जाते. ह्या अप्रत्यक्ष पद्धतीमुळे कमी धूर व प्रदूषके उत्पन्न होऊन उच्च दर्जाचा लोणारी कोळसा मिळवता येतो.

एम.सी.आर.सी. च्या पद्धतीने चारकोल ब्रिकेटिंग करणे

आवश्यक वस्तू


१. स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार्या जैववस्तू (झाडांची पाने, उसाचे पाचड, भाताची तुसे, नारळाच्या शेंड्या, भुईमुगाची टरफले इ.)
२ कार्बनायझिंग चेंबर (भट्टी)
३ बंधक म्हणजेच सर्व घटक धरून ठेवणारा पदार्थ (स्टार्च अथवा रताळ्याचे पीठ)
4 ब्रिकेटिंगचे छोटे यंत्र (१० किग्रॅ प्रति तास)

लोणारी कोळसा बनवण्याची क्रमशः पद्धत

  • जैववस्तू गोळा करणे

स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या जैववस्तू गोळा करून त्यांची वर्गवारी करणे, मोठ्या आकाराच्या वस्तूंचे जरूरीप्रमाणे छोटे तुकडे करणे व हे सर्व सूर्यप्रकाशात वाळवणे

  • कार्बनायझेशन (कार्बनीकरण)
  • भट्टीची रचना करणे
  • बाहेरील ड्रम - तेलासाठी वापरला जाणारा २०० लि क्षमतेचा धातूचा ड्रम उर्फ बॅरल (पिंप) घेऊन वरील झाकण कापून टाका व खालील बाजूस १२ इंच रुंद व १० इंच उंचीचे भोक पाडा.
  • ह्या ड्रममध्ये, खालील बाजूस, प्रत्येकी ८ इंच लांबीचे दोन लोखंडी दांडे एका बाजूकडून दुसर्या बाजूकडे असे एकमेकास समांतर बसवा. ह्या बॅरलच्या आतमध्ये बसणार्या स्टीलच्या बॅरलला आधार म्हणून ह्या दांड्यांचा उपयोग होतो.
  • आतील ड्रम - ह्या १०० लि क्षमतेच्या स्टेनलेस स्टीलच्या ड्रमला झाकण असावे. त्याच्या तळास ३/८ इंच व्यासाची ६ छिद्रे पाडा.
  • हा ड्रम बाहेरील मोठ्या ड्रममध्ये ठेवतात.
  • जैववस्तूंचे कार्बनीकरण करणे -
    • आतील ड्रममध्ये जैववस्तू ठासून भरल्या जातात व जैववस्तूंच्या आकारमाना नुसार त्या ४५ मिनिटे ते १ तासापर्यंत, जैववस्तूंच्याच वापराने, तापवल्या जातात. ह्यास फायरिंग म्हणतात.
    • फायरिंगनंतर आतील ड्रममधील कार्बनीकरण झालेल्या जैववस्तू गोळा करून त्यांचे वजन करा. ह्या पद्धतीने कार्बनीकरण झालेला ३०% कोळसा मिळवता येतो.
  • बंधक पदार्थ तयार करणे -

बंधक द्रव्य उर्फ बाइंडरचा उपयोग ब्रिकेट्सना मजबूत बनवण्यासाठी करतात. एकूण १०० किलोग्रॅम वजनाच्या कार्बनीकरण केलेल्या कोळशाच्या भुकटीसाठी ६० ते १०० लि पाण्यामध्ये ५ ते ६ किलो स्टार्च अथवा कसावाचे (तवकील) पीठ मिसळून बाइंडर तयार केला जातो. हे प्रमाण अर्थात् कच्च्या मालाच्या वजनावर अवलंबून असते.

  • मिसळणे -

मिसळण्याच्या क्रियेनंतर कार्बनीकरण केलेल्या कोळशाच्या कणाकणावर बाइंडरचा थर बसणे गरजेचे आहे. त्यामुळे कोळशाचा चिकटून राहण्याचा गुणधर्म वाढून एकसमान विटा तयार करणे शक्य होते.

  • विटा बनवणे (ब्रिकेटिंग) - कोळशाच्या ह्या मिश्रणापासून विटा एकतर हाताने अथवा यंत्राच्या साहाय्याने बनवल्या जातात. विटा बनवण्यासाठीच्या साच्यामध्ये (मोल्ड) अथवा यंत्रामध्ये हे मिश्रण थेट ओतून एकसारख्या आकाराच्या विटा बनवता येतात.
  • वाळवणे व पॅकिंग करणे -

विटा ट्रेमध्ये ठेऊन सूर्यप्रकाशात वाळवल्या जातात. वाळल्यानंतर प्लास्टिकच्या पिशव्यामध्ये ठेऊन सीलबंद केल्या जातात.

  • विटांचे सर्वसाधारण गुणधर्म -
  • आर्द्रता (दमटपणा)     ७.१%-७.८%
    ज्वलनशील पदार्थ       १३.0%-१३.५%
    स्थिर कार्बन                 ८१.०%-८३.०%
    राख                             ३.७%-७.७%
    गंधक                           0.0%
    ऊष्मांक मूल्य                ७,१००-७,३०० किलोकॅलरी/किग्रॅ
    घनता                          ९७० किग्रॅ/घनमीटर

ह्या तंत्रज्ञानाचे फायदे

धूरविरहित - कोळशाच्या ह्या विटा पेटवल्यावर तसेच जळताना अजिबात धूर करीत नाहीत.
२ राखेचे कमी प्रमाण - कमीतकमी राख शिल्लक राहाते (कोळशाच्या मूळ ५%  वजना पेक्षाही कमी).
३. स्थिर कार्बन व ऊष्मांक-मूल्याचे अधिक प्रमाण - सामान्यतः स्थिर कार्बनचे प्रमाण ८२%  च्या आसपास असते. कोळशाच्या अशा विटांचे ऊष्मांक-मूल्य ७५०० किलोकॅलरी/किग्रॅ असते.
४. वास रहित - कोळशाच्या अशा विटांमध्ये बाष्पीभवन होण्याजोग्या पदार्थांचे प्रमाण अत्यंत कमी असल्याने त्या वास रहित असतात.
५. अधिक वेळपर्यंत जळतात - लाकडी कोळशाच्या तुलनेमध्ये ह्या विटा दुप्पट वेळ जळतात.
६. ठिणग्या उडत नाहीत - लाकडी कोळशाच्या तुलनेमध्ये ह्या कोळशामधून ठिणग्या उडत नाहीत.
७. तुकडे होण्याचे कमी प्रमाण व अधिक मजबुती - ह्यामुळे हा कोळसा अधिक काळ जळतो.

 

अधिक माहितीसाठी येथे संपर्क करा -

संचालक
श्री एएम्एम् मुरुगप्पा चेट्टियार संशोधन संस्था
तारामणि
चेन्नई ६०० ११३
तामिळनाडू, भारत
फोन – ०४४-२२४३०९३७
फॅक्स - ०४४-२२४३४२६८
web : www.amm-mcrc.org

स्त्रोत : पोर्टल कंटेंट टीम

अंतिम सुधारित : 7/23/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate