অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

शून्य ऊर्जा वापरणारा शीत-कक्ष

भाजीपाला इ. थंड स्थितीत साठवण्यासाठी शून्य ऊर्जा वापरणारा शीत-कक्ष म्हणजेच झीरो एनर्जी कूल चेंबर हा एक चांगला व कमी खर्चाचा पर्याय आहे. हा शीत-कक्ष शेतावरच उभारता येतो व ताजी फळे, फुले व भाज्या त्यात साठवून बाजारात नेईपर्यंत चांगल्या अवस्थेत ठेवता येतात. अंगभूत दमटपणामुळे फळे व भाज्या फार लवकर खराब होतात. शिवाय ह्या सर्व जिवंत वनस्पती असल्याने तोडणीनंतरही त्यांची पिकण्याची तसेच बाष्प बाहेर टाकण्याची क्रिया चालूच असते. मात्र त्यांच्या साठवणुकीच्या तापमानावर नियंत्रण ठेवून खराबीचे प्रमाण घटवता येते. ह्या शीत-कक्षाची बांधणी विटा, वाळू, बांबू, गवत, पोती अशी नेहमी मिळू शकणारी साधने वापरून करता येते. ह्या कक्षातील तापमान बाहेरील तापमानापेक्षा सुमारे १०-१५ डिग्री से. ने कमी असल्याने व तुलनात्मक आर्द्रता ९०% राहात असल्याने कोरड्या ऋतूत त्याचा जास्त उपयोग होतो.

उभारणी

  • जवळच पाणी असलेली उंचावरची जमीन निवडा
  • विटांनी 165 सेंमी x 115 सेंमी आकाराचा पृष्ठभाग तयार करा
  • 67.5 सेंमी उंचीची दुहेरी भिंत घाला, ह्या दोन भिंतींमध्ये 7.5 सेंमी. अंतर (पोकळी) ठेवा.
  • कक्ष पाण्याने व्यवस्थित ओला करा.
  • नदीपात्रातून आणलेली बारीक वाळूही पाण्याने भिजवा.
  • भिंतींमधील 7.5 सेंमी च्या पोकळीत ही वाळू भरा.
  • कक्षावर बांबूचे व कोरड्या गवताचे छप्पर बनवा (165 सेंमी x 115 सेंमी)
  • थेट सूर्यप्रकाश किंवा पावसापासून कक्षाला संरक्षण देण्यासाठी वर छप्पर घाला.

कार्यचालन

  • वाळू, विटा व वरचे छप्पर सतत ओले ठेवा.
  • विशिष्ट तापमान व दमटपणा टिकवून ठेवण्यासाठी दररोज दोनदा पाणी मारा. किंवा शक्य असल्यास पाण्याच्या टाकीला जोडलेली ठिबक सिंचन यंत्रणा वापरा.
  • भोके पाडलेल्या प्लास्टिकच्या डब्यांमधून फले व भाजीपाला भरून ते डबे ह्या कक्षात ठेवा.
  • हे डबे पातळ पॉलिथिनच्या शीटने झाका.
  • दर वर्षी हा शीत-कक्ष नव्याने बांधणे आवश्यक आहे. जुन्या विटा दुसरीकडे वापरा.

इतर महत्त्वाचे मुद्दे

  • वाहता वारा असलेली जागा निवडा
  • पाणी साठू देऊ नका
  • स्वच्छ, नव्या व अखंड विटा वापरा.
  • स्वच्छ वाळू वापरा, त्यामध्ये सेंद्रीय द्रव्ये, माती इ. नको
  • वाळू तसेच विटा पाण्यात पूर्णपणे भिजवा
  • वर छप्पर घाला, थेट सूर्यप्रकाश आत जाऊ देऊ नका
  • भाज्या इ. साठवण्यासाठी प्लास्टिकचेच डबे वापरा. बांबू, कागद, लाकूड ह्यांपासून बनवलेली खोकी, टोपल्या इ. वापरू नका
  • साठवलेल्या मालापाशी पाण्याच्या थेंबाचाही थेट संपर्क होऊ देऊ नका.
  • कक्ष स्वच्छ ठेवा. ठराविक काळाने योग्य कीटकनाशके, बुरशीनाशके, रसायने इ. वापरून जंतू व किडींचा संसर्ग तसेच सरपटणार्याे प्राण्यांचा वावर टाळा

कक्षाचा उपयोग

  • ताजी भाजी, फळे, फुले इ. काही काळपर्यंत साठवण्यासाठी
  • व्हाइट बटन मशरूम वाढवण्यासाठी
  • केळी व टोमॅटो पिकवण्यासाठी
  • रोपटी बनवण्यासाठी
  • फळांचे टिकाऊ पदार्थ साठवण्यासाठी

फायदे

  • फळे, भाज्या इ. साठवण्याची सोय असल्याने मातीमोल भावाला विकून टाकावे लागत नाहीत
  • माल जास्त ताजा राहात असल्याने तो चांगल्या दरात  विकला जाण्याची शक्यता जास्त
  • पोषणमूल्ये टिकून राहतात
  • प्रदूषण व ऊर्जावापर शून्य असल्याने साठवणीची पर्यावरणपूरक पद्धत
  • उत्पादन क्षमता: 100 क्विंटल/कक्ष, 6-7 टन/कक्षापर्यंत वाढवता येईल

आवश्यक साधने

इमारत: मोकळी शेड (वायुवीजनासहित)
जमीन: 100 चौरस मीटर
पाणी: दररोज 25-50 लिटर (जागेनुसार)
मनुष्यबळ: 2 - 1 कुशल, 1 अकुशल

किंमती व खर्च

एकूण: एका कक्षासाठी रु. 3000/- सुमारे

अंतिम सुधारित : 1/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate