जगातील सर्व सजीवांची गणती अजूनही चालू आहे... कीटकांच्या नव्या प्रजाती अद्यापही सापडत आहेत ! जगातील माहित असलेल्या सजीवांपैकी ७८ टक्के प्रजातींची नोंद आपल्याकडे आढळते. या विविधतेची माहिती सर्वांपर्यंत पोहोचावी यासाठी हा ‘बायोडायव्हर्सिटी डे’ जगभर साजरा केला जातो.
पृथ्वीवरील जैवविविधता खरोखरीच थक्क करणारी आहे. तिच्याबाबत योग्य माहितीचा प्रसार झ्ल्यास तिचे संरक्षण करण्याबाबतही जागृती करता येईल; अशा विचाराने हा दिवस, सन २००० च्या आधीपासूनच साजरा केला जातो. २०१५ ते २०३० ह्या काळातील विकासाची संभाव्य दिशा लक्षात घेऊन संयुक्त राष्ट्रसंघाने ‘शाश्वत विकासासाठी जैवविविधता संकल्पना’ ठरवली आहे.
जैवविविधतेचे स्थान लक्षात घेऊन तिच्या संवर्धनासाठी भारत सरकारने २००२ मध्ये कायदा बनवला आहे. तर महाराष्ट्रात २००८ पासून जैवविविधता नियम लागू आहेत. त्यामध्ये रहिवाशांनीच आपल्या परिसराची जैवविविधता नोंदवही बनविण्याची संकल्पना आहे. सरकारी तसेच संस्थात्मक पातळीवर या दिवसानिमित्त अनेक उपक्रम राबविले जातात.
जैवविविधतेला मार्क बाबी समजून घेऊन वैयक्तिक पातळीवरही त्या टाळल्याने फरक पडू शकतो. उदा. अधिवास जपणे, प्रदूषण घ्त्व्ने, शाश्वत विकास शेतीच्या पद्धती अवलंबणे इ.
माहिती स्रोत: वनविभाग महाराष्ट्र शासन, वनदर्शिका २०१६
अंतिम सुधारित : 8/20/2020
खारफुटी वनांचे संरक्षण – संवर्धन होण्यासाठी व त्या...
संयुक्त राष्ट्रसंघाच्या पर्यावरण कार्यक्रमानुसार (...
अपारंपरिक आणि पुनर्वापर करण्यायोग्य ऊर्जेवर भर देण...
जंगलतोडीला अटकाव करण्यासाठी अक्षरशः स्वत:चे प्राण ...