অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

जैवइंधनासाठी उपयुक्त 'फिस्टुलिफेरा सोलारिस' शेवाळ

जैवइंधनासाठी उपयुक्त 'फिस्टुलिफेरा सोलारिस' शेवाळ

पाण्यात वेगाने वाढणाऱ्या 'फिस्टुलिफेरा सोलारिस' या शेवाळामध्ये चांगले जैवइंधन पीक बनण्याची क्षमता असल्याचे फ्रान्स व जपान येथील संशोधकांच्या गटाने केलेल्या संशोधनामध्ये दिसून आले आहे. हे संशोधन "दी प्लॅंड सेल ऑनलाइन' मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

जैवइंधन हे खनिज तेलांसाठी अधिक पर्यावरणपूरक पर्याय ठरू शकतो. मात्र जैवइंधनासाठी घेतल्या जाणाऱ्या पिकांनी अधिक जमीन व्याप्त केल्यास त्याचा अन्नसुरक्षेवर परिणाम होणार आहे म्हणून जागतिक पातळीवर पाण्यात वाढणाऱ्या सूक्ष्म शेवाळामधून जैवइंधन निर्मितीच्या क्षमता जोखल्या जात आहे. त्यातून कार्बन उदासीन व व्यावसायिक रीतीने अधिक कार्यक्षम उत्पादन प्रक्रिया विकसित करण्याचे आव्हान शास्त्रज्ञांसमोर आहे. "टोकियो युनिव्हर्सिटी ऑफ ऍग्रिकल्चर अँड टेक्‍नॉलॉजी' व फ्रान्स येथील संशोधकांनी केलेल्या संशोधनामध्ये फिस्टुलिफेरा सोलारिस हे शेवाळ जैवइंधन निर्मितीसाठी उपयुक्त ठरू शकत असल्याचे दिसून आले आहे. या वनस्पतींचा जनुकीय अभ्यास करण्यात आला आहे. त्यातून त्यांची वेगाने वाढण्याची व अधिक तेलाची निर्मिती करण्याची क्षमता दिसून आली आहे.

येथे सापडले हे शेवाळ

जपान येथील दोन नद्यांच्या संगमातील शेवाळांच्या नमुन्यातून फ्रान्स व जपानी संशोधकांनी फिस्टुलिफेरा सोलारिस हे शेवाळ वेगळे केले आहे. ते अत्यंत वेगाने वाढते. परिणामी अधिक बायोमास उपलब्ध होऊन, अधिक तेल मिळू शकते. त्यासाठी त्याचा जनुकिय अभ्यास केला असून, त्याचे गुणधर्मही जाणून घेतले आहेत.

सूक्ष्म शेवाळाची उपयुक्तता

सूक्ष्म शेवाळ हे पृथ्वीवरील खाऱ्या व गोड्या पाण्यात प्रकाश संश्‍लेषण करतात. त्यांच्या वाढीचा वेग अधिक असून, त्यातून अधिक तेल मिळू शकते. वस्तूतः माशामध्ये आढळणारे ओमेगा-3 ही मेदाम्ले या सूक्ष्म शेवाळाची निर्मिती असते. जगभरातील संशोधन संस्था जंगली सूक्ष्म शेवाळांचा संग्रह करीत असून, त्यांच्या गुणधर्मांचाही अभ्यास केला जात आहे.

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate