অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

शेतीसाठी सोलर उत्पादने

थ्री इन-वन सोलर एकात्मिक उपकरण

Solar for Agri 1 हे अद्वितीय एकात्मिक सोलर उपकरण हिवाळ्यात पाणी गरम करण्‍यासाठी सोलर वॉटर हीटरच्‍या स्‍वरूपात, निरभ्र दिवसांमध्‍ये सोलर कुकरच्‍या स्‍वरूपात आणि फळे व भाज्‍या सुकविण्‍यासाठी सोलर ड्रायरच्‍या स्‍वरूपात वापरता येते. हिवाळ्यात सूर्याच्‍या अती-दक्षिणेकडे (दक्षिणायन) असण्याच्या स्थितिचा वापर करून ५०-६० डिग्री सेल्सियस तपमानापर्यंत ५० लीटर पाणी गरम करता येते आणि सोलर कुकरसारखा वापर केल्‍यास एका कुटुंबासाठी 2-3 तासांमध्‍ये जेवण शिजविता येते ते सुध्‍दा सूर्याच्‍या दिशेचा विचार न करता. ड्रायरच्‍या  स्‍वरूपात ह्याचा वापर करण्‍यासाठी तपमानाचे नियमन करून दिवसाच्‍या दरम्‍यान पाण्‍याचा उपयोग करून तपमानाचे नियमन करणार्‍या सिंकच्‍या स्‍वरूपात करता येतो आणि रात्रीच्‍या वेळी सोलरद्वारा गरम झालेल्‍या पाण्‍याच्‍या मदतीने फळे व भाज्‍या सुकविण्‍याची प्रक्रिया सतत चालू ठेवता येते.

पीव्ही विनोवर कम ड्रायर

Solar for Agri 2सोलर पीव्‍ही विनोवर (पाखडण्‍याचे साधन) कम ड्रायर हे झोडपून ठेवलेले शेतकी उत्पादन पाखडण्‍यासाठी एक सोयीस्‍कर उपकरण आहे, विशेषत: वारा पडलेला असण्याच्‍या काळात तसेच फळे व भाज्‍या सुकविण्‍यासाठी वार्‍याच्‍या मुद्दाम चालविलेल्‍या परिभ्रमणाचा वापर करता येतो. ह्या प्रणालीमध्‍ये एक पीव्‍ही मोड्यूल, एक योग्‍य विनोवर (पाखडण्‍याचे उपकरण), एक विशेष स्‍वरूपात डिझाइन केलेले सौर सुकवणी-कपाट (सोलर ड्राइंग कॅबिनेट) आहे ह्यामध्‍ये उपयुक्‍त आंतरिक जोडण्यांसह उत्पादन सुकविण्‍यासाठी वापरण्‍यात येणार्‍या विनोवरचा पंखा चालविण्‍यासाठी वर्धित वायू परिभ्रमण देखील आहे. पाखडण्‍यासाठी विनोवर म्‍हणून वापर केल्‍यास ह्या यंत्रांने एका तासात ३५-४० किलोग्राम स्‍वच्‍छ धान्‍य/बियाणे मिळविता येते.

ह्यामध्ये विविध फळे व भाज्‍या सुकविण्‍यासाठी, मोकळ्या हवेत सूर्यप्रकाशात सुकवण्यापेक्षा देखील, अर्धा वेळच लागतो. जास्‍त प्रकाशासह पंख्‍याच्‍या वेगात केलेली वाढ तपमानाचे नियमन करते तर विस्‍तार केलेल्‍या टनेलमधील प्री-एअर हीटिंग ड्रायर कॅबिनेटमधील हवेचे तपमान कमी करते. अशा प्रकारे सुवास व रंग कायम राखून सर्वोत्‍कृष्‍ट गुणवत्तेचे सुकलेले/वाळविलेले पदार्थ मिळविता येतात. ह्या प्रणालीमध्‍ये एक बॅटरी आणि चार्ज रेग्‍युलेटर लावल्‍यास ह्यापासून प्रकाश देखील मिळविता येईल. अशा प्रकारे हे उपकरण शेती उत्पादांच्‍या विविध प्रक्रियासाठी अत्‍यंत उपयोगी आहे आणि पीव्‍हीद्वारे निर्मित वीजेचा वापर देखील कोणत्‍या ही कामासाठी संपूर्ण वर्षभर करता येतो.

बागांसाठी पीव्ही जनरेटर

Solar for Agri 3ही प्राथमिकरीत्‍या एक सोलर पीव्‍ही पंपाने संचालित होणारी ठिबक सिंचन प्रणाली आहे. हिच्यामध्‍ये ९००W श्रृंखला ८०० W DC मोटर पंप मोनोब्‍लॉक आणि OLPC ड्रिपर्स आहेत ज्‍यायोगे पाण्‍याचा वापर काटकसरीने करता येतो आणि अति-जलसिंचनाशी संबंधित असलेल्‍या बहुतेक सर्व समस्‍या दूर करता येतात तसेच बागांच्‍या सिंचनासाठीसुध्‍दा हे उपयुक्‍त आहे. शेतामध्‍ये पाण्‍याच्‍या समान वाटपाची खात्री करून घेण्‍यासाठी प्रकाशयोजनेतील परिवर्तनामुळे चढत्‍या-उतरत्‍या दाबाची भरपाई आणि उर्जेची गरज तसेच रोपाची पाण्‍याची आवश्‍यकता ह्याच्‍यावर ह्या प्रणालीची संरचना आधारित असण्‍याची आवश्‍यकता आहे. ह्याच्‍या मदतीने 4-5 हेक्‍टरच्‍या डाळिंबाच्‍या बागेवरील नियंत्रणासाठी 2 पेक्षा जास्‍तीच्‍या खर्च आणि नफ्याच्या प्रमाणासह हे अशा प्रकारच्‍या शेतांसाठी एक वरदान ठरू शकते विशेषत: जेथे पाणी व जमीन दोन्‍ही ही उपलब्‍ध असतील पण त्‍या क्षेत्रात वीज नसेल.

पाणीपुरवठा किंवा जलसिंचनासाठी असलेल्‍या पीव्‍ही प्रणालीचे रूपांतर आता DC-DC कन्‍व्‍हर्टर, स्‍टोरेज बॅटरीज् आणि अनुरूप इन्‍व्‍हर्टरसारख्‍या उप-घटकांसह असलेल्‍या जनरेटरमध्‍ये करण्‍यात आले आहे ज्‍यायोगे त्‍याचा वापर पंपाच्‍या स्‍वरूपात तर करता येईलच पण कापणी नंतरची कामे करणार्‍या लहान यंत्रांना चालविण्‍यासाठी देखील करता येईल.

सोलर पीव्ही डस्टर

Solar for Agri 4शेतीच्‍या कामांमध्‍ये रोपांचे संरक्षण हा एक महत्‍वाचा घटक आहे. पिकांवर कीटकनाशके आणि जंतुनाशके फवारण्‍यासाठी सोलर पीव्‍ही डस्‍टर एक अत्‍यंत उपयुक्‍त उपकरण आहे. ह्यामध्‍ये एक पीव्‍ही पॅनल कॅरियर, एक स्‍टोरज बॅटरी आणि एक विशेष स्‍वरूपात डिझाइन केलेले अनुरूप डस्टिंग युनिट असणे फार आवश्‍यक आहे. पीव्‍ही पॅनल, कॅरियरच्‍या मदतीने डोक्‍याच्‍या वर धरतात ज्‍यामुळे कामगारास सावली मिळते आणि त्‍यावेळी डस्‍टर चालविण्‍यासाठी बॅटरी देखील चार्ज होत असते. ह्या प्रणालीचा उपयोग करून एक अत्यंत कमी क्षमतेचा (ULV) स्‍प्रेयर देखील चालू शकतो. त्‍याच बरोबर, प्रकाश देणारा डायोड (LED) प्रज्‍वलित करण्‍यासाठी देखील ह्याचा वापर करता येतो. ह्या उपकरणाचा वापर पूर्ण वर्षभर घरामध्‍ये उजेड करण्‍यासाठी तसेच गरज पडेल त्‍यावेळी डस्‍टर/स्‍प्रेयर चालविण्‍यासाठी करता येईल.

पीव्ही मोबाईल युनिट

Solar for Agri 5 सेल्‍फ प्रोपेलिंग पीव्‍ही मोबाईल युनिट (स्वबळावर आपोआप चालणारे उपकरण) – हे एक असे उपकरण आहे ज्‍याचा उपयोग घरगुती, शेतीविषयक आणि ग्रामीण क्षेत्रातील एकाकी/दुर्गम वस्‍त्‍यांमधून, विशेषत: धाणी (खेडेगांवे) क्षेत्रांमध्‍ये जेथील भूभाग निर्जल आहे, अशा क्षेत्रातील कामे करण्‍यासाठी करता येईल. ह्या युनिटमध्‍ये 70W चे 2 पॉलिक्रिस्‍टलाइन पीव्‍ही मॉड्यूल्‍स एका चार्ज रेग्‍युलेटरला जोडलेले असतात, एक घडी करण्याजोगी यंत्रणा असते. तसेच ह्यामध्‍ये पीव्‍ही पॅनल्‍सना (70W) उपयुक्‍त कोनात ठेवण्‍यासाठी ऑटो लॉकिंग सिस्‍टम असते. एक इन्‍व्‍हर्टर आणि एक डीसी मोटर असतात जे ड्राइव्‍ह सिस्‍टमच्‍या मदतीने संचालित करता येतात. हे युनिट सहजतेने हाताळता येते आणि AC व DC दोन्‍ही प्रकारचा भार संचालित करता येतो. लोणी काढण्‍यासाठी घुसळणे किंवा रवीसारखा वापर करणे, ब्‍लोअरप्रमाणे वापरणे, पाखडण्‍यासाठी विनोवर म्‍हणून वापर करणे, कोरफडीचा रस काढणे इत्‍यादींसारखी कामे करण्‍यासाठी ह्या सिस्‍टमची चाचणी यशस्‍वीरीत्‍या झालेली आहे. अशा प्रकारच्‍या पीव्‍ही मोबाईल युनिटचा उपयोग गावांमध्‍ये भाड्याने किंवा उसने देऊन केला जातो.

जास्त माहितीसाठी संपर्क साधा

सेंट्रल एरिड झोन रीसर्च इंस्टिट्यूट
जोधपुर - 342003ए राजस्‍थान (भारत)
दूरध्‍वनी: *91 291 2786584, फॅक्‍स: *91 291 2788706

स्त्रोत: अक्षय उर्जा, खंड 4अ अंक 4

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate