एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत किशोरींना सक्षम बनविण्यासाठी सन २००० पासून "किशोरी शक्ती" योजना चालविण्यात येत आहे. यामुळे किशोरवयीन मुली आपली वाढ व पूर्ण क्षमतेचा विकास करून आपल्या जीवनातील जबाबदाऱ्या पार पाडू शकतील
या योजनेची प्रमुख उद्दिष्टे
- ११ ते १८ वर्ष वयोगटातील किशोरवयीन मुलींचा पोषण व आरोग्य विषयक दर्जा सुधारणे
- किशोर वयातील मुलींना घरगुती व व्यवसायभिमुख प्रशिक्षण देऊन त्यांना प्रशिक्षित करणे व अर्थार्जनासाठी सक्षम बनवणे
- किशोरवयींन मुलींना आरोग्य, पोषण, कुटुंब कल्याण, गृह व्यवस्थापन, बाल संगोपन व व्यक्तिगत आणि परिसर स्वच्छता इ. विषयीचे शिक्षण देऊन त्यांना जागृत करणे व बालविवाहास प्रतिबंध करणे.
- किशोरवयीन मुलींना निर्णयक्षमता वाढविण्याच्या दृष्टीकोनातून अनौपचारिक शिक्षण देणे
अधिक माहितीसाठी महिला व बालविकास विभागाचा १४ सप्टेंबर २००६ चा शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा
स्त्रोत : महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र शासन
अंतिम सुधारित : 7/20/2020
0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या
तार्यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.
© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.