माझ्या गावामध्ये सहा बचत गट तयार केले आहेत. सर्व गट सुरळीत चालू आहेत. आमच्या गावातील सर्व महिला मिटींगला येतात. बचत गटाच्या मीटिंग व इतर काही मीटिंग असतात त्या मिटींगला ही त्या हजर असतात. प्रत्येक मीटिंग मध्ये विविध विषयांवर चर्चा केले जाते. आरोग्य विषय, सामाजिक विषय व गावपातळीवरील काही प्रश्न सोडविणे इत्यादी विषयांवर चर्चा होत असते. महिलांमध्ये बोलण्याचे धाडस वाढले. ग्रामसभेमध्ये महिला जातात. महिलांना त्यांच्या अधिकारांची जाणीव झाली आहे.
आमच्या गावातून अमली मोहगाव येथे अभ्यास सहल नेली होती तेव्हा ४० महिला ह्या सहलीला गेल्या होत्या. त्या महिलांनी केलेले व्यवसाय व ते कसे बचत गट चालवितात हे पाहण्यात आले. त्यांचे बचत गट चांगले चालू आहे असे पाहून महिलांनी अजून बचत गट तयार केले व दर महिन्याला बचत गटाची मिटींगही सुरळीत चालू आहे.
सेंद्रिय शेतीचे महत्व महिलांना समजले आहे. कमी पाण्यावर कोणते पीक घेतले पाहिजे व पाण्याचे व्यवस्थापन कसे केले पाहिजे याचे महत्व कळल्यामुळे पाणी जपून वापरत आहे.
आशय लेखिका : सौ. सिंधुताई रामनाथ भागवत, गुंजाळवाडी (संगमनेर)
अंतिम सुधारित : 1/30/2020
महिलांनी जंगलात कोष उत्पादनच केले नाही तर त्यापासू...
महिलांना बचतगटाच्या माध्यमातून घरबसल्या रोजगार मिळ...
माझे नाव शबाना युनिस शेख आहे.सर्व प्रथम मी वाटरशेड...
एकदा काय झाले, गुंजाळवाडीतल्या तीन स्वयंसाहाय्य गट...