गरीब हे जास्त गरीबच होत चालले आहेत. ही परिस्थिती त्यांच्या जीवनात बदल घडवू शकत नाही. ते नेहमीच संकुचित होत जातात. हे गरीबीचे दुष्टचक्र सतत चालू राहिले, तर त्यांच्या बघण्याचा दृष्टीकोन तसाच संकुचित होत राहील. ‘गरीबीची ही प्रक्रिया, दारिद्रयाच्या दुष्टचक्रापेक्षा वेगळी आहे.
सत्र १:
या सत्रात आपण दारिद्रयाच्या जाणीवेतून परिस्थितीचे विश्लेषण करू :-
प्रशिक्षकाकरिता सूचना – या सत्रात २ भाग आहेत.
सत्र १ (अ)
i) लागणारा वेळ : १०-१५ मिनिटे
या सत्रात संपूर्ण गटाचा सहभाग असू शकतो.
ii) फळा / तक्त्यावर ‘घराच्या अर्थव्यवस्थेचे’ चित्र काढावे व गटातल्या सभासदांना ते चित्र पूर्ण करण्यास सांगावे..
- उत्पन्नाचे मार्ग -खर्चाच्या वाटा
वरील सत्र समजल्यानंतर आपण सत्र १(ब) पाहूया...
सत्र (ब)
i) लागणारा वेळ : गटचर्चेसाठी ३० मिनिटे. सामूहिक चर्चा २० मिनिटे.
ii) सोबत दिलेल्या ‘सखूबाईची गोष्ट’ या प्रकाराणाभ्यासाच्या प्रती कराव्यात.
iii) यापुढे दिलेल्या गरिबीच्या दुष्टचक्राचा मोठा तक्ता तयार करावा.
iv) ७ ते १० महिलांचा एक गट करावा. प्रत्येक गटात कमीत कमी एका महिलेला तरी वाचता आले पाहिजे.
v) प्रकाराणाभ्यासात दिलेल्या मुद्द्यांबाबत प्रत्येक गटात कमीत कमी अर्धा तसं चर्चा व्हावी.
vi) नंतर सर्व गट एकत्र येऊन गटप्रमुखांनी प्रत्येक गटाच्या चर्चेच्या सारांश सदर करावा व हे करत असतांना गरिबीच्या दुष्टचक्राच्या मुद्द्यांची नोंद घ्यावी. दुष्टचक्राच्या मुद्द्यांवर भर दयावा.
vii) गरिबीच्या दुष्टचक्राचा तक्ता आता सदर करावा आणि प्रकारणाभ्यास, गरीबीचे दुष्टचक्र व गावातील परिस्थिती यांची सांगड घालावी.
लेखक : वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट
स्त्रोत : थेंबे थेंबे तळे साचे - पुस्तिका
अंतिम सुधारित : 8/13/2020
महिलांनी जंगलात कोष उत्पादनच केले नाही तर त्यापासू...
कानापुरच्या महिला बचत गटांनी पुढाकार घेऊन स्वादि...
एकदा काय झाले, गुंजाळवाडीतल्या तीन स्वयंसाहाय्य गट...
माझे नाव शबाना युनिस शेख आहे.सर्व प्रथम मी वाटरशेड...