मी राधाबाई. कोनोशी गावाची. आमच्या गावात नुकतीच स्वयंसाहाय्य गटाला सुरुवात झाली होती बघा, मी पण त्या गटाची सभासद होते. प्रत्येक महिन्याला पंचवीस रुपये बचत करत होते.
माझे व माझ्या नवऱ्याचे स्वप्न होते की मुलाने खूप शिकून मोठा साहेब बनावे. त्या वर्षी तो मेट्रिक झाला होता. माझा नवरा चौथी शिकलेला आणि मी अडाणी असल्यामुळे मला किती तरी अडीअडचणी येत असत. त्या अडचणी माझ्या मुलाच्या वाटयाला येऊ नये म्हणून मी माझ्या मुलाला पुढील शिक्षण देण्याचे ठरविले.
त्याच्या पुढील शिक्षणाकरिता म्हणजे अकरावीला त्याला शेवगावच्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा होता. माझ्याकडेही काही पैसे होते, परंतु मला आणखी २००/- रु. ची निकड होती. आता कोणाकडे पैसे मागावे? हा प्रश्न उभा राहिला.
स्वयंसाहाय्य गटाकडे पैसे मागावे तर माझी बचत फक्त शंभर रुपये होती आणि स्वयंसाहाय्य गट सुरु होऊन चार महिने झाले होते, त्यावेळी स्वयंसाहाय्य गटाचा असा नियम होता की, सहा महिने पूर्ण झाल्यानंतर कर्ज वाटप करण्यास सुरुवात करायची होती. त्यामुळे मी गटाकडे कर्ज मागू शकत नव्हते.
माझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी माझी अडचण गटामध्ये सांगितली. गटामधील सर्व महिलांना शिक्षणाचे महत्त्व पटल्यामुळे महिलांनीगत्म्ध्ये चर्चा केली, पैशापायी मुलाचे शिक्षण थांबू नये असे महिलांना वाटले आणि त्या सर्वांच्या संमतीने मला गटाकडून दोनशे रुपये कर्ज मिळाले. नंतर त्याचे शेवगावच्या कॉलेजमध्ये नाव घातले. मुलगा कॉलेजला जाऊ लागला. मला आशा आहे की, माझा मुलगा अभ्यास करून स्वतःच्या पायावर उभा राहील. स्वयंसाहाय्य गटाच्या मिटींगच्या वेळी आरोग्य, शिक्षण, सामाजिक उपक्रम आणि व्यवसाय या विषयावर चर्चा होत असे. शिक्षणाविषयी देखील चर्चा झाली. शिक्षण हे कसे महत्त्वाचे असते त्यामुळे व्यक्तीची सामाजिक, आर्थिक, वैचारिक प्रगती कशी होते हे देखील सांगितले. तसेच गावात येणारे साहेब लोक पाहून त्यांच्यासारखेच आपल्या मुलाने शिक्षण पूर्ण करण्याचा प्रयत्न करते.
मी गटामधून घेतलेले कर्ज चार महिन्यात व्याजासह फेडले. मी विचार केला की मी जर स्वयंसाहाय्य गटाची सभासद नसते तर मला ऐनवेळी कुणी मदत केली असती का? सावकाराकडून जास्त व्याजदराने कर्ज घ्यावे लागले असते. तसेच इतरांपुढे हात पसरविण्याची वेळ आली असती.
लेखक : वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट
स्त्रोत : बोल अनुभवाचे - पुस्तिका
अंतिम सुधारित : 8/27/2020
दुरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात उर्जा म्ह...
आता तरी बायांनो बोलक्या व्हा !! चार गोष्टींचा विच...
मी कौसाबाई कांदे. माझे आयुष्यच ह्या स्वयंसाहाय्य ग...
१९९७ पासून आम्ही स्वयंसाहाय्य गट सुरु केले. आज ७ ग...