स्थानिक बाजारपेठेचा अभ्यास करूनच कोरफड लागवडीचा विचार करावा. हे पीक हलक्या, वालुकामय, उत्तम निचऱ्याच्या जमिनीत चांगले येते. लागवडीसाठी योग्य आकाराचे सपाट वाफे किंवा 60 ते 75 सें.मी. अंतरावर सरी-वरंबे तयार करावेत. कोरफडीची अभिवृद्धी मुनव्यांपासून करतात. पावसाळा सुरू होताच लागवड करावी. या पिकास माती परीक्षणानुसार खतमात्रा द्यावी. पिकाला गरजेनुसार पाणी द्यावे. लागवड केलेल्या वाफ्यात किंवा वरंब्यावर पानांच्या वजनामुळे कोरफड कोलमडू नये म्हणून वेळोवेळी गरजेनुसार मातीचा आधार द्यावा. लागवड करण्यापूर्वी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे.
संपर्क - 02426 - 243292
औषधी व सुगंधी वनस्पती योजना,
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. अहमदनगर
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
वनस्पती औषधी व क्षुपे (झुडपे) असून त्यांचा प्रसार...
अळूच्या लागवडीसाठी भरपूर सेंद्रिय पदार्थ असणारी, म...
सध्याच्या काळात मीठा बहराच्या अंजीर फळांच्या वाढीक...
मनीषा व देवनाथ जाधव या दांपत्याने तुती लागवड आणि र...