অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

हरितगृह तंत्रज्ञानाबाबत माहिती..

दर्जेदार व अधिक उत्पादनासाठी हरितगृहातील शेती फायद्याची

हरितगृह उभारताना लवकर न गंजणारे जीआय पाइप वापरतात, त्यावर पॉलिथिन फिल्म बसविली जाते. या सांगाड्याच्या आतील वातावरण बाह्य वातावरणापासून वेगळे होते. आतील वातावरण विविध घटकांच्या साह्याने नियंत्रित केले जाते. हरितगृहामध्ये सूर्यप्रकाश, तापमान, कार्बन डायऑक्‍साईड, आर्द्रता, वायुविजन पाच प्रमुख घटक नियंत्रित केले जातात. व्यापारी तत्त्वावर हरितगृहाचा प्रकल्प करताना कमीत कमी 10 गुंठे जागा असली पाहिजे. जास्तीत जास्त एक एकर/प्रति युनिट हरितगृह प्रकल्प असावा.

हरितगृहामधील पीकउत्पादन

  1. फुलपिके : हरितगृहामध्ये प्रामुख्याने दांड्याच्या फुलांचे उत्पादन घेतले जातात. त्यात गुलाब, जरबेरा, कार्नेशन, ऑर्किड, लिलीनियम, शेवंती यांसारख्या फुलांचा समावेश होतो.
  2. भाजीपाला : रंगीत ढोबळी मिरची, हिरवी ढोबळी मिरची, टोमॅटो, काकडी, कारली, घोसावळी इ.
  3. पालेभाज्या : कोथिंबीर, मेथी, पालक, फुलकोबी, कोबी इ.
  4. परदेशी भाजीपाला : ब्रोकोली, झुकेनी, लॅट्युस, लिक, पार्सेली इ.
  5. फळे : स्ट्रॉबेरी, टरबूज इ.

 

संपर्क - 02452-229000 
कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, 
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate