खरं तर वीज पडते तेव्हा आपल्याला ती दिसत नाही, हे वाचून तुम्हाला कदाचित आश्चर्याचा धक्का बसेल. विजा नेहमी कमीत-कमी रोध म्हणजेच विरोध असलेला मार्ग निवडतात. थोडक्यात कोणता मार्ग सोयीचा आहे, याचा अंदाज घेऊनच वीज पडते. विजेचे मार्ग साधारणपणे खालील प्रकारचे असतात.
अ) एका ढगाकडून दुसऱ्या ढगाकडे
ब) एकाच ढगात एका भागातून दुसऱ्या भागाकडे
क) ढगातून हवेकडे
ड) ढगातून जमिनीकडे
इ) अ ते ड यांच्या दोन किंवा अधिक मिश्रणातून बनणाऱ्या विजेच्या शलाका प्रमाणे असतो.
एका सेकंदाच्या दहा हजाराव्या भागामध्ये वीज चमकण्याची प्रक्रिया पूर्ण होते. विजा कोसळतानाची पूर्ण क्रिया वेगाने मुख्यतः पाच उप-क्रियांच्या टप्प्यांत विभागली जाते. त्यातून आपल्याला विजेचा लखलखाट दिसून गडगडाट एेकू येतो.
पहिल्या क्रियेत शिडीप्रमाणे अंदाज घेत हवेतल्या विद्युत भारीत (चार्जड्) आयन्सचा मार्ग तयार होतो. याला ‘स्टेप लॅडर’ म्हणजे विजेच्या ‘शिडीच्या पायऱ्या’ असे म्हणतात.
पहिली क्रिया होतांना विशिष्ट अंतर पूर्ण करेपर्यंत दुसरी क्रिया सुरू होते. जेव्हा ढगाकडून हवेत ‘स्टेप लॅडर’ बनत खाली येऊ लागते तेव्हा जमिनीकडून तशाच प्रकारे ‘आयन्सची श्रंखला’ तयार होऊ लागते. आयन्सच्या या श्रृंखलेला ‘स्ट्रिमर’ म्हणजे विजेसाठीची ‘मार्गिका’ असे म्हणतात.
जमिनीकडून वर जाणारी ‘स्ट्रिमर’ तसेच ढगाकडून खाली येत असलेली ‘स्टेप लॅडर’ यांचा ‘शेकहॅंड’ झाला की वीज पडली असे समजावे. ‘स्टेप लॅडर’ व ‘स्ट्रिमर’चा मिलाप होतो तेव्हा ढगाकडून जमिनीकडे विद्युतधारा वाहून नेली जाते.
‘रिटर्न स्ट्रोक’ म्हणजे विद्युतधारेचा ‘परतीचा टोला’ होय. ढगात असलेल्या चार्जचे पूर्ण उदासीनीकरण घडण्यासाठीच्या प्रयत्नात ‘रिटर्न स्ट्रोक’मध्ये जमिनीकडून ढगाकडे विद्युतधारा वाहते. वीज पडल्यावर आपल्याला जो लखलखाट दिसतो तो विजेचा परतीचा मार्ग असतो.
एकदा वीज पडते तेव्हा एकापेक्षा जास्त ‘रिटर्न स्ट्रोक’देखील पाहायला मिळतात. यांची संख्या अनेकदा ३५ इतकी मोजली गेली आहे. जेव्हा हे अनेक रिटर्न स्ट्रोक हवेबरोबर जागा बदलत सरकतात तेव्हा त्यांना ‘डार्ट लॅडर’ असे म्हटले जाते.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
ढगाळ हवामानामुळे मावा किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची...
नैसर्गिक आपत्तीने अनेक वेळा दस्तक दिल्यानंतर आता र...
पूर्वहंगामी ऊस लागवडीत पिकाची वाढ होत असताना थंडीच...
आफ्रिकेच्या पश्चिमभागी ९० ३०' ते १५० उ. अक्षांश व ...