1) संतुलित कोंबडी खाद्यातील पौष्टिक तत्त्वांमध्ये प्रथिने, कार्बोहायड्रेट्स, चरबी, खनिज पदार्थांचा समावेश असतो. आपल्याला कोणत्या प्रकारचे खाद्य तयार करावयाचे आहे, याचा निश्चित आराखडा तयार केला पाहिजे. कारण कोंबडी खाद्य चिक, ब्रॉयलर व लेयर अशा तीन प्रकारचे असते. कोंबडीच्या खाद्यात वापरावयाचा कच्चा माल कमी खर्चात चांगल्या दर्जाचा मिळेल, याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे.
2) पोल्ट्री खाद्य तयार करताना किंवा खरेदी करताना काळजीपूर्वक तपासणी करणे आवश्यक आहे, त्यामुळे कुक्कुटखाद्य ताजे व ओलावा कमी असणे आवश्यक आहे. खाद्याची गुणवत्ता व रासायनिक चाचणी प्रयोग शाळेत तपासता येते.
3) खाद्य सूत्र तयार करण्याच्या अनेक पद्धती आहेत; परंतु हिट अँड ट्रायल पद्धत कुक्कुटखाद्य सूत्र तयार करण्याची सर्वांत सोपी पद्धत आहे. खाद्य सूत्र तयार करताना आपण कोणकोणती धान्ये मिसळून खाद्य तयार करणार आहोत, हे निश्चित करावे लागते. त्यानंतर खाद्यामध्ये आवश्यक ती पौष्टिक तत्त्वे, प्रमाणानुसार, तसेच प्रोटिन व ऊर्जा निश्चित करतात. त्यानंतर कॅल्शिअम, फॉस्फरस, मीठ, सूक्ष्म खनिज मिश्रण, जीवनसत्त्वांचे मिश्रण व औषधांचे मिश्रण निश्चित करतात. हे प्रमाण प्रति 100 किंवा 1000 किलोच्या संख्येत निश्चित करतात.
4) सर्वप्रथम खाद्यसूत्रात निश्चित केलेल्या पदार्थांचे वजन ग्राइंडरमध्ये दळतात. हे खाद्य कोंबड्यांच्या श्रेणीनुसार जाड-बारीक असे तयार करतात. चिक स्टार्टर स्मॅश तयार करावयाचे असेल तर हे खाद्य बारीक असणे आवश्यक आहे. मोठ्या कोंबड्यांना थोडे जाडे भरडे खाद्य असावे. सूक्ष्म तत्त्व म्हणजे खनिज पदार्थ, जीवनसत्त्वे, अमिनो आम्ल व औषधांचे मिश्रण एक किलो मका या प्रमाणात घेतात. हे मिश्रण पाच-सहा किलोपासून तर 100 किलो खाद्याच्या प्रमाणात असावे.
5) वजन केलेले सर्व साहित्य सुमारे सहा मिनिटे मिसळतात, त्यामुळे जीवनसत्त्वे खाद्यात चांगल्या प्रकारे मिसळतात. ज्या कुक्कुटपालकांकडे ग्राइंडर व मिक्सर नाही, ते साफ केलेल्या फरशीयुक्त जमिनीवर खाद्यपदार्थ टाकून ते फावड्याने चांगल्या प्रकारे एकजीव होतील असे मिसळतात. हे मिश्रण हातानेही तयार करता येते. याशिवाय व्हिटॅमिन ए, बी-2, डी-3, व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स यांचेही योग्य प्रमाण खाद्यात असावे लागते. यासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्याने खाद्यनिर्मिती करावी.
संपर्क - 02169- 244214
क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, जि. सातारा
स्त्रोत: अॅग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
इंधन ही एक ग्रामीण भागाची मुख्य गरज असून, इंधनामध्...
कृषिक्षेत्रातील उत्पादनादी नानाविध प्रक्रिया व क्र...
आजारपणामध्ये माणसांची प्रतिकारशक्ती कमजोर होत असते...
गावातील आरोग्य, पोषण व स्वच्छता समिती, या समितीत स...