समतोल आहारामध्ये ओली वैरण, कोरडी वैरण आणि अंबोण यांचा योग्य प्रमाणात वापर महत्त्वाचा आहे. अंबोणामध्ये प्रथिने आणि ऊर्जा यांचे प्रमाण अधिक असते. अंबोण मिश्रणाचा 100 किलो तत्त्वावर नमुना बनवावा. जनावरांना ऊर्जा पुरविण्याकरिता अंबोणामध्ये मका, ज्वारी, बाजरी यांसारखी तृणधान्ये वापरली जातात.
प्रथिनांचा स्रोत म्हणून सरकी, भुईमूग, जवस, तीळ, सूर्यफूल, खोबऱ्यापासून मिळणारी पेंड वापरण्यात येते. याचबरोबरीने भात किंवा गव्हाचा कोंडा, भाताचे पॉलिश, तूरचुणी, उडीद चुणी, मूग चुणीचा समावेश होतो. पशुखाद्यात खनिज मिश्रण, मिठाचा समावेश करावा. पशुतज्ज्ञाच्या सल्ल्यानेच खाद्यमिश्रण तयार करावे.
संपर्क : 02452-229000
कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र,
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
जनावरांची उत्पादकता टिकवण्यासाठी, तसेच त्यांचे आरो...
हा खूप महत्वाचा आहे. त्यादृष्टीनेच शेतक-यांनी दुभत...
पशुधनाला क्षार आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये यांच्या अभा...
सध्याच्या काळात उपलब्ध हिरवा चारा विशिष्ट पद्धतीने...