অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पारितोषिक विजेता शेतकरी, सिक्कीम

गंगटोक येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय पुष्प प्रदर्शन-महोत्सवातील भाजीपाला उत्पादन स्पर्धेत सिक्कीमच्या धनपती सप्कोता या शेतकऱ्याने दीड लाख रुपयांचे रोख पारितोषिक पटकावले. पूर्व सिक्कीमच्या या शेतकऱ्याला नुकताच मुख्यमंत्र्याच्या हस्ते रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. आसामच्या छोटा सिंग्ताम येथील या शेतकऱ्याने आपल्या शेतीत दहा प्रकारचे उत्पादन घेऊन दाखवले आहे.

फळ-भाजीपाला लागवड

सप्कोताने आपल्या पारंपारिक धान्य आणि मका उत्पादन क्षेत्रापासून फारकत घेऊन, दोन एकरावरील आपल्या शेतीमध्ये अनेक बदल घडवून आणले आहेत. त्याच्या शेतीत त्याने फळ-भाजीपाला लागवडीचे अनेक प्रयोग त्याने केले. त्यासाठी त्याला मर्चक येथे झालेल्या तीन प्रशिक्षणांचा चांगला फायदा झाला. याशिवाय सप्कोताने याशिवाय उत्तरांचल येथे झालेल्या राज्या फळ भाजीपाला विकास विभागाने आयोजित केलेल्या अकरा दिवसांच्या प्रशिक्षणातही सहभाग घेतला होता. या प्रशिक्षणाचा आणि स्वयंस्फुर्तीचा सप्कोताला शेती उत्पादनातही चांगला फायदा झाला आहे. त्याच वर्षी त्याने केवळ एकोणीसशे रुपयांच्या बियाण्यांपासून तब्बल एकोणीस-१९ क्विंटल मिरी (चेरी पेपर) चे उत्पादन मिळवले, त्याचे उत्पन्नही तब्बल एक लाख बावन्न हजार रुपयांत मिळाले. यामुळेच त्याने फळ-भाजीपाला शेतीमध्ये आणखी रस घेतला. त्यातूनच त्याने कोबी, टोमॅटो, फुलकोबी, ब्रोकोली यांचेही उत्पादन घेणे सुरु केले.

सप्कोताने एकाच झाडापासून तब्बल चाळीस किलो टोमॅटोचे उत्पादन मिळवण्याची किमयाही साधली. यावर्षीही त्याने बिगर मोसमी टोमॅटोच्या लागवडीसाठी तंत्रज्ञान विकास अभियानात रोमिओ जातीच्या टोमॅटोची लागवड केली आहे. त्यासाठीचे बियाणेही राज्याच्या फळ-भाजीपाला शेती विभागाकडून घेतले आहे. सप्कोताने सत्याण्णव-९७ क्विंटल टोमॅटोच्या या विक्रीतून तब्बल एक लाख चौ-याण्णव हजार (१,९४,०००) रुपयाचे उत्पन्नही मिळवले आहे.

याशिवाय आठ क्विंटल फुलकोबीच्या विक्रीतून ६४ हजार रुपये, बारा क्विंटल चेरी-पेपर (मिरी)च्या विक्रीतून ९६ हजार रुपये मिळवले आहेत. याबाबत सप्कोता म्हणतो, या शेतीतून आता मी वर्षाकाठी अडीच लाख रुपयांचे उत्पन्न मिळवतो आहे. तेही मजूर आणि इतर खर्चाची तजवीज केल्यानंतर. त्याने आता वैविध्यपुर्ण आणि मिश्र पद्धतीच्या भाजीपाला उत्पादनासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. यासाठी सप्कोताला बी-बियाणे, सेंद्रीय खते, किटकनाशके आणि इतर अन्य प्रकारची मदतही राज्य सरकारच्या या विभाकडून मिळते आहे.

यातूनच सप्कोताने दावा केला आहे, की त्याने पुन्हा एकदा जुकूनी फार्सी नावाच्या विशिष्ट अशा पद्धतीच्या भोपाळ्याचे वाण विकसित केले आहे. हा भोपळा काकडीच्या आकाराचा आहे. सिक्कीममध्ये अशा पद्धतीच्या भोपाळ्याचे उत्पादन घेणारा सप्कोता हा पहिला शेतकरी असल्याने स्थानिक लोकांनीही या भोपळ्याला सप्कोता फार्सी असे नाव दिले आहे. सप्कोता म्हणतो २००४ मध्ये या भोपाळ्याचे वाण मी काठमांडूमधून आणले. भक्तपूरमधल्या राणा यांच्या शेतात अशा प्रकारचे भोपळे पहिल्यांदा पाहिल्याचेही सप्कोता सांगतो. भोपळ्याच्या या उत्पन्नामुळे सप्कोताला नव्वद हजारांचे अधिकचे उत्पन्नही मिळाले.

पशुधन विकास आणि पशुपालन व्यवस्थापन

केवळ सेंद्रीय शेतीतच या शेतकऱ्याने वेगळे काही करून दाखवले आहे असे नाही तर पशूधन विकास आणि पशूपालन-व्यवस्थापनातही त्याने केरफेक्टर-जोरथँग येथे प्रशिक्षणही घेतले आहे. त्याच्याकडे आता पाच गायी आहेत. त्यापैकी तीन दुभत्या आहेत. यातून तो दररोज वीस लिटर दुध प्रतिलिटर वीस रुपये दराने विकतो आहे. सप्कोताला आता या गायींच्या शेणापासून खतही मिळते आहे. याशिवाय त्याने गांडूळ खताचा छोटा प्रकल्पही राज्याच्या या विभागाच्या मदतीने सुरु केला आहे. उत्पादनाच्या बाजारपेठेविषयी आणि विपणनाविषयी सप्कोता म्हणतो, हे खरं आहे, की अजूनही बाजारपेठेत उतरण्यासाठी शेतकऱ्याला त्रास होतो आहे. पण हा प्रश्न जोवर शेतकरीही बाजारपेठेच्या मागणीइतके उत्पादन घेत नाही, तोवर सुटू शकत नाही.

सप्कोताच्या या आदर्श पद्धतीने प्रभावित होऊन राज्य सरकारच्या फळ-भाजीपाला विकास विभागाने आता फार्म हॅण्डलिंग युनीटची स्थापन केली आहे. तंत्रज्ञान विकास अभियानातून आता सप्कोताला त्याच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवणे सोपे जाते आहे. यामुळेच त्याला आपले उत्पादन बाजारात नेण्याचीही गरज भासत नाही.

स्त्रोत: http://isikkim.com/dhanpati-sapkota-award-winning-farmer-from-sikkim/

अंतिम सुधारित : 4/23/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate