অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

बनमाली दास, एक शेतकरी

बनमाली दास, एक शेतकरी

प्रस्तावना

बनमाली दास पश्चिम बंगालच्या दक्षिण २४ परगणाच्या गयाधाम गांवी रहतो. त्याच्या बरोबर एकात्मिक शेती करण्यासाठी ५ सभासद आहेत. त्याने प्रथम ०.२५ एकराच्या जमिनीवर तळे व परसबाग आणि ०.३३ एकराची सखल जमीन अशामधून सुरुवात केली.

हे शेत सुंदरबन त्रिभुज प्रदेशांत येते, म्हणून तेथील माती चिखलाची आणि खारट अशी आहे. त्याची जमीन देखील कायम पाण्याने भरलेली असायची कारण ती नदीच्या पात्राशेजारी येते. खाली उतारावर, बनमाली खरीफात बटाटे आणि रबीमध्ये लँथीरसचे पीक घ्यायचा. त्याच्या परसबागेत,तो पालेभाज्या आणि फळे लावायचा, पण तरी ते अपुरे पडायचे व त्याला बाजारातून भाज्या व फळे खरेदी कराव्याच लागत. तो तळ्यात मासेमारी देखील करायचा, पण उत्पन्न काही जास्त नव्हते. शेतीतून उरलेले पालेपाचोळे आणि शेण खत म्हणून वापरायचा.

बदल

त्याच्या जागेत एका कोप-यात एक छोटे तळे खोदण्यात आले आणि जी माती खोदकामात निघाली ती जागेची उंची वाढवण्यासाठी भर म्हणून वापरण्यात आली. जागेत आतमध्ये नाल्या बनवल्या गेल्या जेणे करुन पाण्याचा सतत पुरवठा होईल. बाहेरच्या कुंपणात निलगीरी, निंब, सुबाभूळ इ. सारख्या उंच झाडांचा वापर केला गेला.

त्याच्या परसबागेत केळी, पेरु, डाळिंब, लिंबू, आंबा आणि नारळ ह्यांसारख्या बारमाही वृक्षांची लागवड करण्यात आली. आता तो वर्षभरात २५-३० भाज्या काढतो, विविध प्रकारच्या एकत्रित पिकाचा वापर करुन बनमाली दासने हल्लीच त्याच्या परसात बायोडायजेस्टर बनविला आहे ज्यात त्याने खत व बायोगॅस च्या निर्मितीसाठी बायोगॅस प्लँट टाकला आहे.

त्याच्याकडे गाय,बदके आणि कोंबड्या आहेत. त्याने खरिफात भाताबरोबर उपयुक्त कृषि डिजाइन वापरले ज्यात मासे-बदके आणि अझोला घेतले. त्याची ही शेती कोणत्याही रसायनांपासून मुक्त आहे. तो आता त्याच्या तळ्यात रोहू, कोटला, बाता, छोटे खेकडे आणि मांजरमाशासारखे मासे वाढवतो ज्यामुळे उत्पादन वाढले आहे.

माशांना तो फक्त पाळीव प्राण्याचे शेण, तिळाची ढेप आणि उरलेला पाला पाचोळा खाऊ घालतो. त्याच्या कडे ५ गायी, ८ बदकाची पिल्ले आणि १४ कोंबडीची पिल्ले आहेत. त्यांना खाऊ घालण्यासाठी तो गवत, ढेपा आणि शेतीतून उरलेल्या पालापाचोळ्याचा वापर करतो. कोंबड्यांना आणि बदकांना तो भात, भुसा, उरलेला पालापाचोळा आणि तळ्यातील छोट्या गोगलगायींचा आहार देतो.

तो वर्मीकंपोस्ट म्हणजे गांडूळखत आणि कंपोस्ट खते स्वतः तयार करतो. तो त्यासाठी तिळाची ढेप आणि बायोगॅसच्या खड्यातील माती वापरतो. तो कडुनिंब, आल्याची पेस्ट आणि रॉकेलच्या मिश्रणाचा वापर कीटकनाशक म्हणून करतो. साधारणपणे, तो मागील हंगामात काढलेल्या झाडांच्या बिया जपून ठेवतो व त्या पुढील वर्षी पेरणी करता वापरतो.फक्त तो कोबी, नवलकोल आणि फ्लावरसारख्या काही भाज्या बाजारातून विकत घेतो. तो आपल्याकडे साठलेल्या बिया काही काळानंतर विकतो देखील. त्याची शेत जमीन आणि परसबाग फार भव्य असून व्यवस्थित रचलेली आहे. त्याने त्याच्या शेतात मिश्र भाज्या लावण्यास सूरुवात केली आहे (म्हणजे वांगी, मुळा, पालक आणि बटाटा + भोपळा, कांदा+ नागवेल). त्याच्या बागेला व शेताला पुरविण्यासाठी त्याने वर्मीकंपोस्ट खताचा खड्डा तयार केला आहे.

त्याने एकात्मिक शेतीचा वापर देखील केला आहे जसे तो आपल्या शेतात बदकांना फिरु देतो ज्याने हवा जमिनीत खेळती राहते, आणि कोंबड्यांनादेखील. कोंबड्या शेतातील कीटकांना खाऊन टाकतात व कीड नाहीशी होऊन पीक हसत राहते.

आता तो २००४ सालामधल्या एका खरीप पिका वरुन २००५ पर्यंत ९ पिकांच्या मिश्रित लागवडीवर येऊन पोहोचला आहे. त्याने कुक्कुटपालनाची जाळी आता त्याच्या तळ्यावर बसविली आहे म्हणजे कोंबड्यांची विष्ठा आता सरळ तळ्यात जाते. कोंबड्यांच्या विष्ठेत झूप्लँक्टन आणि फायटोप्लँक्टन असल्य़ाने त्यांची विष्ठा ही माशांना खाद्य म्हणून उपयूक्त स्त्रोत आहे.

तळ्याच्या काठावर पालेभाज्यांची लागवड करण्यात येते आहे उदा. आयपोमिया एक्वॅटिका वगैरे. त्याच्या रु.१२२३५.७५/- ह्या संपूर्ण खर्चामध्ये (ह्यात कामगारांची किंमत धरलेली नाही) आतील कामाची किंमत रु. ९४९७.७५/- इतकी आहे. याचा असा अर्थ होतो की जवळजवळ ७७.६२% ही आतील कामाची किंमत एकूण निवेशातून आहे. मागील काही वर्षांमध्ये, मातीतील ऑर्गेनिक कार्बनची टक्केवारी वाढली आहे. जर आपण बनमालीच्या शेताची इतर पारंपारिक शेतांच्या जीवाश्म इंधनावर अवलंबून असण्याची तुलना केली तर असे दिसते की जीवाश्म इंधनावरचा त्याचा खर्च जवळजवळ शून्य आहे कारण ही जीवाश्म इंधने शेतातूनच शेताला पुरवली जात आहेत. शेतीकामासाठीचा खर्च तो स्वतः कुटुंबासहित शेतात काम करुन वाचवतो आहे. पण त्याने त्याचे शेत अशा प्रकारे बनविले आहे की त्यामध्ये अति परिश्रमाची कामे कमी झालेली आहेत. आज बनमालीने आपले शेत असे घडविले आहे की ज्यामुळे त्याला शेतापासून आर्थिक,पर्यावरण आणि सामाजिक लाभ मिळतो आहे. आज बनमालीच्या यशाकडे पाहून ब-याच शेतक-यांनी एकात्मिक शेतीचा वापर शेतीच्या आत आणि शेताच्या बाहेर असा दोन्हीकडे करण्यास सूरुवात केला आहे. बनमालीने फक्त त्याचे परिश्रम आणि त्याचे बाजारावर अवलंबून राहणे कमी केलेले नसून त्याने त्यापासून आपल्या कुटुंबाच्या गरजा पुरवून नफा देखील कमावलेला आहे.

अशा एकात्मिक शेतीच्या वापराने त्याने कुटुंबाच्या अन्नाच्या गरजेची सोय केलेली आहे. त्याच्या शेतातील थोड्याशा बदलांमुळे त्याचे बाजारावर अवलंबून राहणे कमी झाले आहे कारण त्याला लागणा-या शेतीच्या गरजा आता तो शेतातूनच उत्पादित करतो.

 

स्त्रोत: डीआरसीएससी,कोलकाता

अंतिम सुधारित : 7/15/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate