विदर्भ, शेतक-यांच्या आत्महत्यांचा प्रदेश, पण त्याच प्रदेशात सुदैवाने काही शेतकरयांनी सेंद्रीय पद्धतीने मातीचा कस यशस्वीपणे परत आणला आहे. सुभाष शर्मा हे त्यापैकीच एक.
आपल्या सगळ्या आयुष्याचा व अन्नाचा स्त्रोत असूनही मातीकडे कायमच दुर्लक्ष झाले ही किती आश्चर्याची गोष्ट आहे! महाराष्ट्र राज्यातील विदर्भात अनेक शेतकऱ्यांनी रासायनिक खते व कीटकनाशकांच्या माऱ्याने नापीकते बरोबरच शेतातील अपयश पुनः पुन्हा अनुभवले आहे. विदर्भ, शेतक-यांच्या आत्महत्यांचा प्रदेश, पण त्याच प्रदेशात सुदैवाने काही शेतक-यांनी सेंद्रिय पद्धतीने मातीचा कस यशस्वीपणे परत आणला आहे. सुभाष शर्मा हे त्यांच्यापैकीच एक. विदर्भाच्या यवतमाळ जिल्ह्यातील सेंद्रीय शेतकरी सुभाष शर्मा ह्यांनी 1975 पासून रासायनिक पद्धतीने शेती करण्यास सुरुवात केली. त्यांना सुरुवातीला चांगले उत्पन्न मिळाले असले तरी 1986 नंतर त्यांच्या जमिनीची उत्पादकता वेगाने घसरत गेली आणि त्यांना मोठे नुकसान झाले. 1996 पासून त्यांनी बीज, माती, पाणी, पीक पद्धती आणि मजूर व्यवस्थापन यांकडे विशेष लक्ष देऊन नैसर्गिक शेतीला सुरुवात केली. गाई, वृक्ष, पक्षी आणि वृक्ष-वनस्पती या चार प्रमुख घटकांमुळे शेतीची शाश्वतता टिकून राहते यावर त्यांचा दृढ विश्वास आहे. श्री. सुभाष शर्मा मातीचा कसा वाढवण्यासाठी काही तंत्रांचा वापर करत आले आहे त्यामुळे पिकांची उत्पादकताही वाढली आहे.
श्री. शर्मा यांच्या म्हणण्यानुसार एक गाय तीन एकर जमिनीची गरज पूर्ण करते. तीन टन शेणखत व 800 किलो तळ्याचा गाळ किंवा झाडांखालची सुपीक माती ह्याचे मिश्रण म्हणजे हे शेणखत. झाडांचा पालापाचोळा कुजल्यामुळे व पक्षांची विष्ठा पडल्यामुळे झाडांखालची माती सूक्ष्म वनस्पती व पोषक द्रव्य ह्यांनी परिपूर्ण बनते.या मातीत १०० किलो तुरडालीच्या कारखान्यातील भुसा,, दोन लिटर शेगदाना तेल घालून मिश्रण व्यवस्थित ढवळले . मग त्यात २५ किलो गुल मिसळला . हे मिश्रण पाण्यात भिजवले व त्याचा ढीग तयार करून दोन महिने ठेवला .अशा रीतीने एक महिन्यानंतर पूर्ण खत होते. मुठभर खत प्रत्येक झाडाच्या मुलाशी किंवा बिजयंत्राने बिजापाशी घातल्यास माती सेंद्रिय द्रव्या सह , सूक्ष्म वनस्पतीजात ह्यांनी परिपूर्ण होते. डाळींचे पीठ व गुल घातल्याने प्रथिने व साखर मिळून सूक्ष्मजीवांची कार्क्षमता वाढते.
सुपिकतेसाठीचे त्यांचे दुसरे तंत्रज्ञान म्हणजे गो-संजीवक हे द्रावण होय. हिवाळ्यात हे खत पाटाच्या पाण्याबरोबर झाडांना दिले जाते. 10 किलो ताज्या शेणात 10 लिटर गोमूत्र, 1 किलो डाळींचे पीठ,250 ग्राम गूळ एकत्र करून हे मिश्रण 50 लिटर पाण्यात घालून 8 ते10 दिवस आंबवले जाते. हे द्रावण पाणी घालून 200 लिटरपर्यंत पातळ करून ते पाटाच्या पाण्याखरोखर जमिनीवर सोडले जाते. हे मिश्रण एक एकर जमिनीसाठी पुरेसे ठरते. मातीतील सूक्ष्मजीवाणूंची क्रियाशीलता वाढल्याने माती ताजी टवटवीत होऊन रोपांना पुरेशा प्रमाणात, पाण्यात मिसळल्यामुळे द्राव्य स्वरुपात पोषण मिळते शर्मा यांच्या मुठभर मातीत शेकडो गांडूळे दृष्टीस पड़तात.
श्री. शर्मा यांनी आपल्या अवनत जमिनीवर पहिल्यांदा तुरीची लागवड केली ,तुरीच्या दोन रांगांमध्ये अँरोग्रीनच्या मिश्रणाची लागवड केली अँरोग्रीनमधील बियांची संगती पुढील प्रमाणे आहे.
ह्या सर्व प्रकारच्या बिया व्यवस्थित एकत्र करून पावसाळ्यात तुरीच्या दोन रांगांच्या मध्ये पेरल्या. साधारण 50 ते 55 दिवसांच्या वाढीनंतर मातीमध्ये वाढलेला मिश्र जैवभार कापून तुरीच्या रांगांमध्ये आद्रतारोधक म्हणून पसरवण्यात आला.
एक-दोन महिन्यांनंतर हा जैवभार अर्ध कुजल्यावर कल्टीवेटर ने मातीत कालवायचे. याने मातीला सेंद्रीय खत मिळते तसेच तण वाढण्यापासून संरक्षण होते व मातीची जास्त काळ आद्रता टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते.
श्री. शर्मा यांनी द्विदलांच्या पिकांची पीक आवर्तन पद्धती अंगीकारून मातीची सुपीकता वाढवली. चवळी हे त्यांनी मोसमातले पहिले पीक घेतले. झाडाची सुकलेली पाने मातीमध्ये मिसळून सेंद्रीय खत तयार होते आणि मुळाला असलेल्या गाठींतून मातीला नायट्रोजन मिळतो. त्याच जमिनीवर त्यांची पीक घेण्याची पद्धत पुढील प्रमाणे आहे.
पीक पेरणी | उत्पादकता प्रति एकर | किंमत रु. | अंदाजे एकूण मिळकत रु. | खर्च |
---|---|---|---|---|
चवळी शेंगा | ३० क्विंटल | ३०/किलो | ९०,000 | २५% |
कांद्याची पात | १५० क्विंटल | १०/किलो | १,५ लाख | ४०% |
मेथी | ३० क्विंटल | १०-२०/किलो | ६०,००० | ३०% |
पालक | ३० क्विंटल | २०-३०/किलो | ७५,००० | २५% |
कोथिंबीर | ६० क्विंटल | १०/किलो | ६०,००० | ३०% |
बी-बियाणे | ०४ क्विंटल |
१५०/किलो बिया म्हणून |
६०,००० | २५% |
गहू | १४-१५ क्विंटल | ४०/किलो | ६०,००० | ३०% |
हरभरा | १० क्विंटल | ३,५००/क्विंटल | ३५,००० | १०% |
भोपळा | १० टन/एकर | १५/किलो | १.५ लाख | २०% |
श्री. शर्मा दरवर्षी एक किंवा दोन एकरांवर तुरीची लागवड करतात. त्यांच्या म्हणण्यानुसार रोपांची पाने गळून मातीवर 1-2 इंचांचा जैवभार जमा होतो त्याने मातीत सेंद्रीय द्रव्य मिसळले जाते. कोथिंबीरीची पीक म्हणून लागवड केल्याने त्यांच्या शेताचा पर्यावरणीय समतोल जपला जातो. कोथिंबीरीची पानांचा ताजा वास कीटकांना पळवून लावतो. दुसरे म्हणजे कोथिंबीरीची भरघोस पांढरी फुले मधमाशांना आकर्षित करतात आणि त्यामुळे परागीकरण सुकर होऊन, चांगली बीजे तयार होण्याच्या प्रक्रियेला मदत होते.
शेतीची शाश्वतता टिकवण्यासाठी अनेक प्रयोग केले. उदाहरणार्थ, पेरणीसाठी त्यांनी उतारा पद्धतीचा अवलंब केल्याने मातीची धूप रोखली गेली आणि मातीची आद्रता टिकून राहिली. शेतात जलसंधारण करण्यासाठी त्यांनी चर खोदले, कीटकांना दूर ठेवण्यासाठी त्यांनी झेंडू व कोथिंबिरीची लागवड केली, वारा अडवून जमिनीची धूप रोखण्यासाठी शेताच्या बांधावर मोठ्या झाडांची लागवड केली इ.. त्यांच्या 13 एकर जमिनीतून अंदाजे 18-20 लाखांची उलाढाल होते, ज्यामध्ये पन्नास टक्के त्यांचा फायदा होतो. (तक्ता 1 पहा)
आजच्या जागतिक शेतीच्या काळात, जिथे रासायनिक शेतीचाच प्रसार सगळीकडे झालेला आहे अशा काळात सुभाष शर्मासारखे शेतकरी अनेकांना प्रेरणादायी ठरले आहेत. जमिनीचा पोत लक्षात घेऊन, अशा मातीचे स्वास्थ्य व शेतीची शाश्वतता वाढवतात हे जगाला दाखवून देत आहेत.
स्त्रोत - लिजा इंडिया
अंतिम सुधारित : 10/7/2020
या विभागात गावाचा सुपीकता निर्देशांक कसा काढतात तस...
६८ व्या युनाईटेड नेशन जनरल असेंब्लीमध्ये 20१५ हे ...
फक्त रासायनिक खते वापरल्यास जमिनीचे आरोग्य चांगले ...
जमिनीतील मुख्य, दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचे ...