অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

डाळींब लागवड पध्दती

डाळींब पीक पोषण


बहरासाठी खताची पहिली मात्रा

अ.नं.

डाळींब पिकाचे बहर

सेंद्रिय खते

रासायनिक खते

 

 

कंपोस्ट/शेणखत/लेंडी खत

कोंबडी खत

निंबोळी खत

सिंगल सुपरफॅस्पेट

पहिला बहर

१५ किलो

१० किलो

अर्धा किलो

अर्धा किलो

दुसरा बहर

२० किलो

१५ किलो

एक किलो

७५० ग्रॅम

तिसरा बहर

२५ किलो

२० किलो

दीड किलो

एक किलो


डाळींब पिकाला बहरासाठी खालीलप्रमाणे रासायनिक खते द्यावीत

अ.नं.

पिकाची अवस्था

पहीला बहर

दुसरा बहर

तिसरा बहर

 

 

नत्र ग्रॅम

स्फुरद ग्रॅम

पालाश ग्रॅम

नत्र ग्रॅम

स्फुरद ग्रॅम

पालाश ग्रॅम

नत्र ग्रॅम

स्फुरद ग्रॅम

पालाश ग्रॅम

पहिले पाणी देण्याआधी

५०

१५०

२५

७५

२००

५०

१००

२५०

५०

फळधारणा अवस्था

७५

१००

२५

१२५

१५०

५०

१५०

२००

७५

लिंबुच्या आकाराती फळे

१००

१५०

--

१५०

२००

--

२००

२५०

--

पेरूच्या आकाराची फळे

५०

२००

५०

१००

२५०

१००

१५०

३००

१५०

रंग येण्याची अवस्था

७५

५०

७५

१५०

१००

१५०

२००

१५०

२००

गोडी व वजनवाढीचा काळ

७५

--

१२५

१५०

--

२००

२००

--

२५०

  • डाळींब झाडाच्या मुळीक्षेत्रात किंवा ड्रीपरखाली वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी रासायनिक खतांचा डोस दिल्यामुळे त्या जागेवरील जमिनीचा सामु मोठ्या प्रमाणात वाढतो. यावर उपाययोजना म्हणून दर वर्षी मुळी क्षेत्रातील माती बदलून तेथे सुपीक माती टाकल्यास सामू निंयत्रित होतो.

 

संजीवकांचे कार्य

डाळींब पीकवाढीच्या प्रत्येक अवस्थेमध्ये मुख्य अन्नद्रव्य, सुक्ष्म अन्नद्रव्य यांचा जसा महत्वपूर्ण वाटा असतो तेवढाच संजीवकांचाही असतो. डाळींब पिकासाठी संजीवकांचा वापर हा फवारणीच्या माध्यमातून केला जातो. पानांच्या माध्यमातून संजीवके पिकात शोषली जाऊन त्यांचा परिणाम लवकर मिळू शकतो. संजिवके निर्माण करण्याची क्षमता निसर्गत: पिकात असते, त्यासाठी जमिनीची उपजक्षमता परिणामकारक असणे आवक्ष्यक असते. झाडांमध्ये संजीवके ही जमिनीचा सामू, जिवाणूंची संख्या, सेंद्रिय कर्ब व नत्राचे प्रमाण यांच्यामुळे निर्माण होण्यास मदत होते.

डाळींब पिकासाठी उपयुक्त संजीवके

संजीवके (Harmons)

सक्रिय घटक

फवारणीचा कालावधी

प्रमाण

पिकाची अवस्था

वाढ रोधक

इथेफॅन

झाडास ताण बसण्यास चालना देण्यासाठी

१०० लि. पाण्यासाठी ५० ते १०० मि.लि.

ताणाची अवस्था

आक्झिन्स

अल्फा नॅप्थील अँसेटिक असिड

पाणी लावल्यानंतर १ ते दीड महिन्याने

१०० लि. पाण्यासाठी १० ते २५ मि.लि.

फुलोरा अवस्था

जिबेरॅलिन्स

प्रोजीब (GA)

पाणी लावल्यानंतर २ ते अडीच महिन्यांनी

१०० लि. पाण्यासाठी अर्धा ते चार ग्रॅम

निंबू आकाराची अवस्था

सायटोकायनिन्स

6-BA

पाणीलावल्यानंतर ३ ते साडेचार महीन्यांनी

१०० लि. पाण्यासाठी १०० मि.लि.

पेरू आकाराची अवस्था

वाढनियंत्रण

क्लोरोमेक्वाट क्लोराईटड

पाणी लावल्यानंतर ५ ते ६ महिन्यांनी

१०० लि. पाण्यासाठी १५० मि.लि.

पक्वतेची अवस्था

पालवीची वाढ रोखणे व कार्यक्षमता वाढविण्याच्या फवारण्या

 

कालावधी

संजीवक/अन्नद्रव्ये

फवारणीचा हेतू

डाळींबाची फळे लिंबाएवढी असताना पालवी फुटल्यास

वाढनियंत्रण (सीसीसी)

झाडाची फाजील वाढ रोखण्यासाठी

पहिला फवारणीनंतर ७ ते १० दिवसांनी

मुख्य अन्नद्रव्य – 00:52:34

पालवी परिपक्व होण्यासाठी

दुस-या फवारणीनंतर ७ ते १० दिवसांनी

सूक्ष्म अन्नद्रव्य + अमिनो अँसिड

पालवीची कार्यक्षमता वाढविण्यासाठी

रोपांची निगा

  • दर १५ दिवसांनी एक वेळा दहा ग्रॅम युरीया, दहा ग्रॅम सिंगल सुपर फॅस्फेट, दहा ग्रॅम म्युरेट आँफ पोटॅश प्रति झाडाला द्यावे, दर तीन महिन्यातून एकदा पाच किलो कंपोस्ट खत + ट्रायकोडर्मा + जिवाणू खते + अर्धा किलो निंबोळी पेंड प्रति झाड टाकावे. दर सहा महिन्यांतून एकदा सूक्ष्म अन्नद्रव्य व दुय्यम अन्नद्रव्यांचा डोस प्रति झाड २५ ग्रॅम इतका द्यावा.
  • रोपे लावल्यानंतर पहिल्या पावसाळ्यात बागेत हिरवळीचे खत (धैंचा, सन) पेरावे व ते फुलो-यावर येण्याआधी झाडाच्या मुळी क्षेत्रात गाडावे.
  • बागेत वाढणारे तण बाहेर फेकू नये, असे तण मुळी क्षेत्रात तयार होणा-या गादीवाफ्यांवर सतत टाकावे, यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब सुधारतो. जमिन आच्छादली गेल्यामुळे पांढरी मुळी, जिवाणू व गांडुळांची वाढ जलद गतीने होते, मात्र पावसाळ्यात आच्छादन करू नये.

बहर

डाळींब पिकाला योग्य नियाजन केल्यास वर्षभरात केव्हाही बहर धरतो, म्हणुन त्याला सदाबहार पीक म्हटले जाते. तरीही मुख्यतः तीन बहारात डाळींबाचे नियोजन करतो येते. १) मृग बहर, २) हस्त बहर, ३) आंबे बहर.

  • मृग बहरः पावसाळा सुरू झाल्यानंतर जो बहर धरला जातो, त्याला मृग बहर म्हणतात. हा मुख्यतः पावसाच्या पाण्यावर पोसला जातो. मृग बहर हा जिरायती व जिथे पाण्याची कमतरता असते तिथे मोठ्या प्रमाणात धरला जातो. ह्याचा कालावधी जून-जुलै किंवा पावसाच्या आगमनावर अवलंबून असतो. मृग बहरात डाळींब पिकावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळतो, म्हणून मृग बहरात बुरशीजन्य व विषाणूजन्य रोगांचे काटेकोर नियोजन करावे.
  • हस्त बहरः पावसाळा संपल्यानंतर जो बहर धरला जातो त्याला हस्त बहर म्हणतात. ज्या ठिकाणी अत्यंत मुरमाड व पाण्याचा जलद निचरा होणा-या जमिनी असतात, अशा ठिकाणी डाळींब झाडाला लवकर ताण बसुन हस्त बहर धरणे सोपे जाते. सप्टेंबर – आक्टोंबर महीन्यात हस्त बहर धरला जातो.
  • आंबा बहर – आंब्याबरोबर घेतल्या जाणा-या डाळींब बहराला आंबा बहर म्हणतात. हलक्या व मुरमाड जमिनीत तीनही बहर घेणे शक्य असते, कारण कमी कालावधीत अशा जमिनींना ताण बसु शकतो, परंतू ज्या जमिनी जाड व भरपूर दळ असणा-या असतात, अशा जमिनीत आंबा बहर चांगला पर्याय आहे.
  • झाडावर १०० टक्के पानगळ झाली तर उत्तम; पण ब-याच वेळा अशी परिस्थिती निर्माण होत नाही. काही शेतकरी झाडांवरील सर्व पाने निपसून टाकतात, पानांच्या बगलेत म्हणजेच देठाजवळ फुल निघण्याची क्षमता असते. पाने निपसल्यामुळे तेथे इजा होऊन फुल निघण्याची क्षमता नष्ट होते, तर काही शेतकरी झाडे हलवून पाने झटकण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे डाळींब झाडाची मुळी हलते व तिला हवा लागते, त्यामुळे काही प्रमाणात ताण नाहीसा होऊन झाडांना पालवी फुटते, याला झाड चिगरणे असही म्हणतात.
  • छाटणीआधी करावयाची कामे
    • बहर धरण्याची तारीख निश्चित करणे.
    • त्यासाठी लागणा-या खर्चाचा तपशील तयार करणे. त्याची पूर्तता करणे.
    • छाटणीआधीच सेंद्रिय कंपोस्ट खते दोन महिने आधी मागविणे, कंपोस्ट खतांमध्ये खते कुजविणारे जिवाणू, स्फुरद विरघळणारे जिवाणू ट्रायकोडर्मा, ई एम द्रावण, अझोटोबॅक्टर, पोटॅश माँबिलाइझर, स्पॅसिलोमायसिस आदी टाकुन खते तयार करणे, जिवाणू खतांचे प्रमाण एका ट्रॅलीसाठी पाचशे ग्रॅम/मि.लि. इतके असावे. एकावर एक तीन थर रचुन त्यावर सतत पाणी टाकत रहावे व त्या ढीगाला गवताने किंवा तत्सम वस्तुंनी झाकुन ठेवावे. ही खते उच्च प्रतीची, पोषणमूल्य असणारी व जमिनीचा पोत सुधारणारी बनतात.

    झाडाची छाटणी

    पानगळीनंतर दुसरा महत्वाचा टप्पा म्हणजे झाडांची छाटणी होय. छाटणीवर डाळींबाचा बहर अवलंबून असतो. झाडाची कोणती काडी फळ देणारी आहे, हे अनुभवाअंती आपण ओळखू शकतो. झाडाची छाटणीच केली नाही तर जाड काडीवर आपण फळे घेऊ शकत नाही. अशा बिगर छाटणीच्या झाडांवर काडीच्या टोकाकडे फुले लागतात, त्यामुळे फळांना अपेक्षित फुगवण मिळू शकत नाही.

    पोट छाटणी

    डाळींब झाडाच्या आतील भागात म्हणजे पोटात फळे येण्यासाठी केलेली छाटणी म्हणजे पोट छाटणी. या छाटणीत झाडाच्या आतील भागात फळ देणा-या काड्या ठेवण्यात येतात, त्यामुळे फळ सावलीत राहतात.

    पंजा छाटणी

    हाताच्या पंजासदृश्य दिसणा-या छाटणीस पंजा छाटणी म्हणतात. या छाटणीत झाडाच्या पोटातील म्हणजे आतील फांद्यांचे जाळे काढून झाड पोकळ करण्यात येते, त्यामुळे प्रत्येक फांदीला मुबलक सुर्यप्रकाश मिळतो.

     

    स्त्रोत :अ‍ॅग्रीप्लाझा

     

अंतिम सुधारित : 6/9/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate