অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

आधार - युआयडी

दळणवळण व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या, माहिती तंत्रज्ञान विभागाने ०३ मार्च २००६ साली “गरिबी रेषेखालील (बीपीएल) कुटुंबांसाठी विशिष्ट ओळख क्रमांक” या प्रकल्पास मंजूरी दिल्यानंतर २००६ साली विशिष्ट ओळख या संकल्पनेविषयी पहिल्यांदा चर्चा झाली व काम सुरू झाले. राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र (एनआयसी) १२ महिन्यांच्या कालावधीत हा प्रकल्प राबविणार होते.

त्यानंतर, बीपीएल खालील विशिष्ट ओळख प्रकल्पासाठी तयार करायच्या मुख्य डाटाबेसमधून डाटा क्षेत्र सुधारित करणे, बदलणे, समाविष्ट करणे व नष्ट करणे यासाठीच्या प्रक्रियांच्या सूचना देण्यासाठी ०३ जुलै २००६ रोजी एक प्रक्रिया समिती स्थापन करण्यात आली. नियोजन आयोगाचे सल्लागार, डॉ. अरविंद वीरमणी यांच्या अध्यक्षतेखाली ती स्थापन करण्यात आली.

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाची (युआयडीएआय) निर्मिती नियोजन आयोगांतर्गत संलग्न कार्यालय म्हणून निर्मिती करण्यात आली आहे. भारतीय निवासींना विशिष्ट ओळख क्रमांक देण्यासाठी आवश्यक असलेल्या संस्थात्मक, तांत्रिक व कायदेशीर पायभूत सुविधा विकसित करणे व कार्यान्वित करणे ही त्याची भूमिका आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाने २५ जून २००९ रोजी युआयडीएआयच्या अध्यक्षपदाची निर्मिती केली व त्यास मंजूरी दिली, व श्री नंदन नीलकेणी यांची पहिले अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली, त्यांना कॅबिनेट मंत्र्याचे पद व दर्जा देण्यात आला. श्री. राम सेवक शर्मा यांची महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली.

बोध चिन्ह

लाल व पिवळ्या रंगाचा सूर्य ही रचना “आधार” चे बोध चिन्ह म्हणून निवडण्यात आले आहे. हे बोध चिन्ह “आधार” ची दूरदृष्टी प्रभावीपणे व्यक्त करते. ते प्रत्येक व्यक्तिसाठी समान संधींची नवी पहाट दर्शवते, ही पहाट प्रत्येक व्यक्तिला क्रमांकाद्वारे देण्यात आलेल्या विशिष्ट ओळखीतून उगवली आहे.

स्पर्धा

युआयडीएआयने फेब्रुवारी २०१० साली “आधार” साठी राष्ट्रव्यापी बोध चिन्ह स्पर्धेस सुरुवात केली. पुढील काही आठवड्यात देशभरातून २००० च्या वर प्रवेशिका आल्या.

विजेती प्रवेशिका ठरविण्याचे निकष पुढीलप्रमाणे होते:

  • बोध चिन्हाद्वारे युआयडीएआयचा हेतू व उद्दिष्टांचे सार दिसले पाहिजे
  • बोध चिन्हाने, “आधार” ही देशभरातील व्यक्तिंसाठी परिवर्तनाची संधी आहे, व त्यामुळे गरिबांना समान सेवा व स्रोत उपलब्ध होतील हे कळविले पाहिजे
  • बोध चिन्ह देशभर सहजपणे समजेल व कळवता येईल असे असले पाहिजे

या स्पर्धेमध्ये बोध चिन्हासाठी आलेल्या बऱ्याच रचना अतिशय नाविन्यपूर्ण व अत्यंत उच्च दर्जाच्या होत्या. सादर करण्यात आलेल्या रचनांचे जागरुकता व संज्ञापन धोरण सल्लागार मंडळाने (अवेअरनेस अँड कम्युनिकेशन स्ट्रॅटेजी ऍडवायजरी काउन्सिल- एसीएसएसी) मूल्यमापन केले, हा युआयडीएआयसाठीचा सल्लागार गट आहे ज्यामध्ये संज्ञापन तज्ञांचा समावेश आहे.

या मंडळाने वर नमूद केलेल्या निकषांच्या आधारे अंतिम स्पर्धकांची निवड केली. मंडळाचे एक सदस्य श्री. किरण खलप म्हणतात, "अंतिम स्पर्धक व शेवटी विजेता निवडणे हा आमच्यासाठी अतिशय अवघड निर्णय होता. सुदैवाने, आम्ही निवडीसाठी काही निकष निश्चित केले होते ज्यामुळे व्यक्तिनिष्ठपणा किंवा पक्षपात झाला नाही."

अंतिम स्पर्धक पुढील प्रमाणे होते:

  • मायकेल फोले
  • सॅफ्रॉन ब्रँड कन्सल्टंट्स
  • सुधीर जॉन होरो
  • जयंत जैन व महेंद्र कुमार
  • अतुल एस. पांडे

खाली दाखवण्यात आलेली विजेती रचना पुण्याच्या श्री. अतुल एस. पांडे यांनी सादर केली होती:

logo

ब्रेंड मार्गदर्शिका

आधार लोगो युनिट हा पूर्णपणे चौकोनी आकारामध्ये नाही. लोगोची रूंदी ही उंचीपेक्षा थोडीशी जास्त आहे. ब्रण्ड इमेजसाठी हा आकार योग्य ठरत नसल्यामुळे आधारचा लोगो तंतोतत आकारामध्येच तयार करणे आवश्यक आहे. नेहमी खाली दिलेल्या आकाराच्या मोजमापाशी लोगोचा आकार असल्याचे तपासून पहा.

ब्रैन्ड बाबतच्या मार्गदर्शक सूचना

 

स्त्रोत : आधार - युआयडी

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate